Skip to content

खोटेपणाने एखाद्याचे आयुष्य उध्वस्त कराल, तर त्याचा परतावा इंटरेस्ट सोबत तुम्हाला भरावाच लागणार.

खोटेपणाने एखाद्याचे आयुष्य उध्वस्त कराल, तर त्याचा परतावा इंटरेस्ट सोबत तुम्हाला भरावाच लागणार.


अपर्णा कुलकर्णी


निशा नात्यांची जपणूक करणारी मुलगी. आजकालच्या कलियुगात पण पैसा महत्त्वाचा न मानता नाती आणि माणुसकी किती महत्त्वाची ठरते याची जाणीव तिला पहिल्या पासूनच होती. माणूस मेल्यावर त्याला खांदा द्यायला चार माणसेच लागतात पैसा उपयोगी पडत नाही ही तिच्या बाबांनी दिलेली शिकवण कायम तिने लक्षात ठेवली होती. आणि लग्नानंतरही वागण्यातून जपत होती.

प्रणवची आर्थिक बाजू फारच जेमतेम होती. पण त्याच्या पैशांचा विचार न करता, रूप न पाहता त्याचा स्वभाव बघून निशाणे आणि तिच्या घरच्यांनी त्याला निवडले होते. प्रणवची आई त्याच्या लहानपणीच वारली असल्याने त्याच्या मोठ्या बहिणीकडे तो रहात होता. त्यामुळे आईच्या प्रेमाची तसेच कुटुंबाची जाणीव त्याला नक्कीच असेल असा विचार निशाने केला होता.

शिवाय निशाची ही पहिल्या लग्नाच्या बाबतीत फसवणूक झाली होती. पण सुदैवाने लग्नाच्या आधीच चौकशीमुळे सगळा प्रकार उघडकीस आल्याने तिथेच लग्न मोडले होते. त्याचा खूप मनस्ताप करून घेतला होता निशाने आणि प्रणवसोबत लग्न जमावण्याआधीच सगळे त्याला स्पष्ट केले होते. तितक्याच सामंजस्याने प्रणवने समजून पण घेतले होते. त्यामुळे निशाचा प्रणववर चांगलाच विश्वास बसला होता. निशा आणि प्रणवच्या लग्नाला वर्ष पूर्ण झाले होते आणि निशा आई होणार असल्याची आनंदाची बातमी त्यांना मिळाली होती. त्यामुळे सगळेच खुश होते.

मुलगा झाला निशाला आणि निशा आई झाली. आईपण आल्याने परिपूर्ण झाली होती ती आणि मुलातच तिचे विश्व सामावले होते. जगातील सगळ्यात सुखी स्त्री असल्याचे तिला वाटायला लागले होते. पण तो तिचा गैरसमज ठरला.

प्रणवचे वागणे अचानक बदलले. मुलगा झाला म्हणजे मी जग जिंकले आणि म्हातारपणीचा आधार झाला त्यामुळे आता मला बायकोची गरज नाही असे त्याला वाटायला लागले. एकदा तो निशाला म्हणाला की तुझा भूतकाळ मला माहित असताना मी तुला स्वीकारले आहे आणि आता माझा मुलगा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे माझ्यासाठी.

आता तुझी मला गरज नाही तू निघून गेलीस तर चालेल मुलाला मी माझ्या ताब्यात घेणार आणि तुला कायमचे माहेरी सोडणार. हे ऐकून मात्र निशा आवाक झाली. काय बोलावे ते तिला कळेना. तिने वेगवेगळ्या प्रकारे प्रणवला समजावण्याचा खूपच प्रयत्न केला पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही उलट विपरीतच झाला. इतके बोलूनही निशा माहेरी गेली नसल्याने आपण काहीही बोललो तरी निशा काही आता आपल्याला सोडून जात नाही.

आता ती मुलात चांगलीच अडकून पडली त्यामुळे प्रणव वरचेवर बेफिकीर आणि उद्धतपणे वागू लागला. सतत खोटे बोलू लागला, वागू लागला. त्याच्या बाबांचे मिळालेले पैसे त्याने असेच बाहेर उधळून टाकले, घरात निशा हिशोब विचारत तेंव्हा खोटे सांगू लागला, नंतर नंतर तर त्याने तुझा काय संबंध ?? कोणत्या अधिकाराने तू हिशोब विचारत आहेस ??? असे बोलू लागला.

लग्नाआधी वागत बोलत असलेला प्रणव आणि आताचा खोटारडा, फसवणूक करणारा प्रणव यात खूप तफावत होती. पण आताचे त्याचे वागणे खरे होते कारण मुळातच तो खोटारडा होता. त्याने एकदा तर सगळ्याच गोष्टींची मर्यादा ओलांडली कारण त्याच्या खोट्या व्यवहारामुळे बँकेतील लोकांना त्याने सरळ सांगून टाकले की, माझी बायको मेली असल्याने मी तुमचे कर्ज फेडू शकत नाही, कारण तिच्याच आजारपनासाठी मी कर्ज घेतले होते आणि त्यातच ती मेली. हे जेंव्हा बँकेतील लोकांनी निशाला सांगितले तेंव्हा मात्र निशा मुलीला घेऊन माहेरी आली कायमची.

माहेरी तिला बरेच कष्ट करावे लागले पण ती डगमगली नाही. मुलीला स्वतःच्या हिमतीवर तिने शिकवले मोठे केले. इकडे मात्र निशाने घर सोडल्यावर प्रणवच्या मागे आजार तर लागलाच शिवाय त्याचा अपघात झाला आणि त्यात त्याचा डावा पाय खूपच दुखावला.

इकडे निशाची भरभराट झाली आणि प्रणवची अवस्था फारच वाईट होत गेली. त्याचाच बहीण भावाने त्याची साथ सोडली. त्याला त्याच्या वागण्याचा पश्चात्ताप झाला आणि निशाची माफी मागण्यासाठी तो परत आला. पण आता निशा त्याला कधीच माफ करणार नव्हती. ती प्रणवला म्हणाली, खोटेपणाने एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त कराल, तर त्याची परतफेड व्याजासाकट तुम्हाला करावीच लागणार.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!