Skip to content

एखाद्याशी कन्सिस्टन्सी एकच फिलिंग ठेवू नका, कारण दररोज आपण वेगळ्या फिलिंगसोबत उठत असतो. 

एखाद्याशी कन्सिस्टन्सी एकच फिलिंग ठेवू नका, कारण दररोज आपण वेगळ्या फिलिंगसोबत उठत असतो.


हर्षदा पिंपळे


प्रिया आणि मारिया दोघी चांगल्या रूममेट होत्या.दोघीही वेगवेगळ्या शहरातून शिक्षणासाठी मुंबईत आल्या होत्या.आणि विशेष म्हणजे रूम शोधता शोधताच या दोघी एकमेकींना भेटल्या. मग काय दोघी मिळून त्या मुंबईमध्ये रुम शोधू लागल्या.रूम शोधता शोधता त्यांच्यामध्ये साधारण मैत्री झाली होती.आणि त्यांना रूमही मिळाली होती.आणि अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे दोघींच ऍडमिशन हे एकाच कॉलेजमध्ये झालं होतं.दोघीही मास कॉम करत होत्या.हळुहळू त्यांच्यातील ही नवी मैत्री फुलत गेली.बहरत गेली.दोघी रूमवर अगदी प्रेमाने राहत होत्या.एखादं कुटुंब ज्याप्रमाणे काळजी घेत तसचं त्या दोघी एकमेकींची काळजी घेत होत्या.

प्रिया तशी मारियापेक्षा हट्टी स्वभावाची होती.आणि तिला एखाद्या गोष्टीची जशी सवय लागायची ती तिला कायम हवीहवीशी वाटायची. म्हणजे तिच्याशी आज कुणी प्रेमाने वागत असेन तर उद्याही त्या व्यक्तीने तिच्याशी प्रेमानेच वागावं असा तिचा अट्टाहास असायचा. आज प्रेमाने वागलं आणि उद्या थोडा फार रागराग झाला तर ते प्रियाला अजिबात सहन व्हायचं नाही आणि आवडायचही नाही.

मारिया मात्र तशी समजूतदार होती.सगळ्या भावभावनांच ती मिश्रण होती.

एक दिवस असचं मारिया प्रियाला कोणत्या तरी गोष्टीवरून रागावली. अर्थात मारियाने प्रियाला स्पष्ट भाषेत खडसावलं होतं.आणि प्रियाला ते सहन झालं नाही. रोज प्रेमाने, मायेने वागणारी मारिया आपल्याशी असं वागूच कसं शकते ?असा प्रश्न प्रियाला पडला.प्रियाला मारियाचा फार राग आला होता. ती मारियाशी बोलायलाही तयार नव्हती.प्रियाला काय झालं ते मारियाला कळतच नव्हतं.

नंतर मात्र मारियाच्या सगळा प्रकार लक्षात आला.’आपलं रोजचं वागणं,नेहमीच्या फिलींग्स या काल वेगळ्या होत्या.आणि प्रियाला ते सहन झालं नसावं.’ असं स्वतःशी म्हणत तिने शेवटी प्रियाची समजूत काढली.आणि पुन्हा एकदा तिने प्रियाला नॉर्मल केलं.तेव्हा कुठे मारियाला जरा बरं वाटलं.

एखाद्या व्यक्तीशी कन्सिस्टन्सी एकच फिलिंग ठेवली की काय होऊ शकतं आणि काय नाही.या गोष्टीची तिला चांगलीच जाणीव झाली होती.

तर हे एक उदाहरण म्हणून आपण पाहिलं.

आता ‘कन्सिस्टन्सी’ ज्याला आपण सातत्य वगैरे म्हणतो.आयुष्यात कन्सिटन्स राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे यात अजिबात शंका नाही.म्हणजे आयुष्यात कुठलीही गोष्ट करायची असेल किंवा एखादं स्वप्न पूर्ण करायचं असेल,एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर सातत्य खूप महत्वाची भूमिका बजावते.

सातत्याशिवाय या गोष्टी सहजशक्य नाहीत. पण हे जरी खरं असलं तरी फिलींग्स आणि कन्सिस्टन्सीचं गणितच जरा वेगळं आहे.आणि ते असायला हवं.कारण काय आहे माणसाला एखाद्या गोष्टीची सवय लागली नं तर ती त्याला सहजासहजी बदलणं शक्य होत नाही.आपल्या फिलींग्स रोज काही आहे त्याच अवस्थेत नसतात.

आज शांत बोलणारी व्यक्ती उद्या शांत,नम्रपणे बोलेलच अशी शाश्वती देता येत नाही. कारण काल घडलेल्या अनेक घटनांचा त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो.कुणाशी भांडण झालेलं असतं,काही कामं पूर्ण झालेली नसतात, टेन्शन आलेलं असतं तर कधी याच गोष्टी विरुद्धही असतात. म्हणजे चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी घडत असतात.

आणि दुसरं म्हणजे आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीशी कन्सिस्टन्सी एकच फिलिंग ठेवतो,त्यावेळेस ती व्यक्ती आपल्याकडून कायम तीच अपेक्षा ठेवते.त्याच दृष्टिकोनातून पाहते.त्यामुळे त्याचे परिणाम फारसे चांगले होत नाही. त्या सगळ्याचा अनेकदा त्रासच होतो.म्हणूनच एखाद्या व्यक्तीशी ठरवूनही कन्सिस्टन्सी एकच फिलींग ठेवू नका.त्यावेळी एकच लक्षात ठेवा की आपण दररोज वेगवेगवेगळ्या फिलिंगसोबत उठत असतो.कन्सिस्टन्सी असली तरी त्यालाही थोडी फार मर्यादा असावी.तरच गोष्टी व्यवस्थित हाताळल्या जातील.

अशा वागण्याने प्रिया आणि मारियाच्या बाबतीत काय झालं याचा विचार करायला हरकत नाही.प्रत्येकाने एकदा असा विचार करून पहा.त्याचे आपल्यावर काय परिणाम होऊ शकतात याचाही विचार अवश्य करा.

आयुष्यातील असे प्रसंग आठवून पहा.जर,तुमच्याही बाबतीत असं घडलं असेल, घडत असेल तर वेळीच त्याकडे लक्ष द्या.

येतयं नं लक्षात ?


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!