Skip to content

अहो, आजूबाजूला तर पहा…आपणच दुःखी नाही आहोत!!

“इतरांची दुःखे वाचता आली तरंच, आपल्याला स्वतःचे दुःख कमी त्रास देतं!”.


सचिन झरे


माणूस जितकं स्वतःच्या दुःखाचं लाड करतो, तितकं सुखाचं करत नाही, म्हणून तर सुखं कधीच, आपल्याला जास्त वेळ साथ देत नाही. तर याउलट दुःखं कधीच आपली साथ सोडत नाही. आपल्या अपयशाचं श्रेय द्यायला कित्येक साथीदार मंडळीत दुःखाची, ही भाऊगर्दी असते!, पण यशाची संधी देणाऱ्या प्रयत्नांना आपण वांझोटं ठरवतो. अन् आपला संसार चालावा म्हणून आपण लग्न करतो ते सहानुभूतीशी, ही तर दुःखाची सख्खी बहीणच असावी.

सहानुभूती मिळवायला म्हणून दुःखांबरोबर मैत्री करणं हेच समाजाचं खरं दुखणं आहे. इतरांनी स्वतःच्या दुःखावर आणि परिस्थितीवर कश्या पद्धतीने मात करून यश खेचून आणलं!, हे वाचायला आणि ऐकायला आपल्याला मनापासून आवडतं. पण जेव्हा स्वतः प्रयत्न करूनही यश मिळत नाही, तेव्हा मात्र आपलं दुःख आणि आपल्या बिकट परिस्थितीचे किस्से दुनियेला ऐकवायचे असतात. ‘आरे’ला, ‘का?रे’, बोलण्याची ताकत असतांना, ‘अरेरे!’, हे ऐकून घेण्यातच आपण, धन्यता का मानावी?, हेच मला समजत नाही. गगन भरारीचे वेड प्रत्येकालाच असतं!, पण पंखात बळ नाही म्हणून प्रयत्न सोडून देण्यासारखाच प्रकार झाला, हा!.

आकाशात झेप घेणाऱ्या प्रत्येक पक्ष्याची आपली स्वतःची एक ओळख असते, पण मला सर्वाधिक आवडतो तो, फिनिक्स पक्षीच!, भले हा इतरांच्या दृष्टीने काल्पनिक पक्षी असेल. गरूड सुद्धा याच पठडीतला पक्षी, आयुष्यातील ठराविक कालावधीनंतर हा स्वतःची चोच, नखे आणि पंख सगळं सगळं गमावूनही, पुन्हा नव्याने येईपर्यंत विरही जीनं जगतो!, पण ते फक्त स्वतःसाठीच. कारण त्याला पुन्हा गरूडभरारी घ्यायची असते!, आणि आपण जिवंत आहोत, हे दुनियेला दाखवायचं असतं!….

मग, फिनिक्स पक्षी वेगळा का? तर तो पुन्हा पुन्हा भरारी घेतो, अगदी स्वतः जळून झालेल्या राखेमधून सुद्धा, तो पुन्हा पुन्हा जिवंत होतो, आणि पुन्हा पुन्हा भरारी घेतो, पण स्वतःला संपवत नाही, किंवा कधी थांबत सुद्धा नाही. गरूडाप्रमाणे स्वतः साठी जिवन न जगता, इतरांसाठी झालेल्या राखेमधून जो भरारी घेतो!, तोच खरा फिनिक्स पक्षी!.

माझ्या मते, गरूड स्वतःची दुःखं कमी व्हावीत म्हणून जगतो, पण तेच फिनिक्स पक्षी इतरांची दुःखे कमी व्हावीत म्हणून भरारी घ्यायचा प्रयत्न करतो, आणि स्वतः जळून सुद्धा पुन्हा भरारी घेतो. कारण फक्त फिनिक्स पक्ष्यालाच सुख आणि दुःखाचा नियम माहित असतो. “इतरांची दुःखे वाचता आली तरंच, आपल्याला स्वतःचे दुःख कमी त्रास देतं!”…

एका फिनिक्स पक्ष्याची कथा मधून साभार



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

1 thought on “अहो, आजूबाजूला तर पहा…आपणच दुःखी नाही आहोत!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!