Skip to content

स्वतःला बदलता यायला हवं, रडण्यासाठी तुमच्या आयुष्यात हजार कारणे आहेत.

स्वतःला बदलता यायला हवं, रडण्यासाठी तुमच्या आयुष्यात हजार कारणे आहेत.


हर्षदा पिंपळे


Start changing yourself……..हो,प्रत्येकाने स्वतःला बदलायला सुरुवात करायला हवी. बदल हा तर निसर्गालाही चुकलेला नाही. एका ऋतू नंतर एक ऋतू येतोच.निसर्ग बदलत राहतोच.आपणही निसर्गाचा भाग आहोत.आपणही काळानुसार , वेळेनुसार बदलायला हवं. भोवतालच जग सुंदर व्हावं असं वाटत असेल तर त्याची सुरुवात आधी स्वतःपासून करायला हवी.अर्थात पहिला बदल स्वतःमध्ये करता आला पाहिजे.

मित्रांनो, आयुष्य आलं की रडगाणी ही येतातच.मग काय आयुष्यभर असं रडतच रहायच का…?तर नाही. पहा,रडायला कारणं हजारो आहेत पण स्वतः बदलायच की रडतच रहायच हे मात्र आपल्याला ठरवता आलं पाहिजे.आपण कायमच जर असं रडत राहिलो तर आपल्या आयुष्यात केवळ अश्रूंचा, दुःखाचा महापूरच असेल.अर्ध आयुष्य या रडण्यातच जाईल.पुढे आयुष्यात काहीतरी चांगल करण्यासारख असतं हे यामध्ये आपण विसरून जाऊ शकतो.

साधारणपणे आपल्या आयुष्यात नाती,पैसा, पद-प्रतिष्ठा,नोकरी,व्यवसाय, आरोग्य या संबंधित समस्या असतात.आणि कुणावर अन्याय, अत्याचार झालेला असतो.कुणी एखाद्या मोठ्या संकटात अडकलेला असतो.अशा वेळी आयुष्यात काय करायच काही समजतच नाही. अशी हजारो कारणं असतात ज्यामुळे आपण सतत दुःखीकष्टी असतो.सतत रडत कुढत बसलेले असतो.पण सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे येणारच असतं.ते चक्र असच निरंतर चालू असतं.येणारी संकटं,ताणतणाव आजपर्यंत कुणाला चुकलेत…?या जगात आपण एकटेच असे नसतो की ज्याच्याकडे केवळ दुःखच दुःख आहे.जरा बाहेरच्या जगात डोकावून पाहिलं तर या परिस्थितीचा नेमका अंदाज आपल्याला येऊ शकतो.आपलं रडगाणं इतरांपेक्षा किती मोठ आहे नी किती नाही हे आपल्याला समजू शकतं.पण त्यासाठी एकदा स्वतःच्या विश्वातून आपण बाहेर पडायला हवं नं…?

रडायला हजारो कारणं असली तरी हसायला काही कारण लागतं का…?कधी कारण नसतानाही हसून पहा , हसण्याने जगायला किती ऊर्जा मिळते ते कळेल.कायमच रडायला हवं असं काही नाही. याऊलट हे रडणं कसं थांबवता येईल याचा विचार आपण करायला हवा.हजार कारणांमधील किमान एक तरी कारण आपण delete करायचा प्रयत्न करायला हवा. आपल्या समस्यांवर आपणच उत्तरं शोधायला हवी.आयुष्य जर सुंदर हवं असेल तर सर्वात आधी आपण स्वतःमध्ये change करायला हवा.परिस्थिती बदलत नसेल तर काय झालं आपण ती परिस्थिती नक्कीच बदलवू शकतो.स्वतःमध्ये बदल करून परिस्थिती बदलवणं अवघड नसतं.

छान डोळे आहेत तर
छान पहायला हवं….
कायमच डोळे मिटून बसण्यात काय अर्थ…?

पाऊस पडत असेल तर
कधी कधी भिजायला हवं….
नेहमी लांबूनच पाऊस पाहण्यात काय मजा…?

कुणी हसवतं असेल तर
बिंधास्त थोडं हसून घ्यावं…
सारखं मुसू मुसू रडण्यात काय आहे…?

परिस्थिती बदलत नसेल तर
थोडं स्वतःला बदलून पहावं…
घोंगडी भिजत ठेवून काय होणार…?

आयुष्य मस्त जगायच असेल तर
क्षणाक्षणाला हसत-खेळत जगून घ्यावं…
एक एक क्षण निसटून गेला तर….?

पहा, आयुष्य असच असतं. कधी दुःख तर कधी सुखाचा पाऊस..! आयुष्यात तुम्हाला रडवणारी कारण पावलापावलावर भेटत राहतील.अशावेळी परिस्थितीशी दोन हात करणं जमायला हवं.हातपाय गाळून, विचार करून करून थकून जायच नसतं.असं म्हणतात विचारांना कृतीची जोड दिली की सारं काही सुफळ संपूर्ण होतं.आयुष्य एकाच ठिकाणी अडकून पडलं की अडकूनच राहतं.आणि मग आपण रडत बसतो.एकामागोमाग सगळी रडगाणी गिरवत बसतो.आयुष्य असच जगत राहतो.

कंटाळा नाही येत का त्याच त्याच जगण्याचा….?रोज पालकची भाजी खाल्ली तर कसं होईल….?रोज कुणाशी तरी भांडण झालं तर कसं होईल…? या गोष्टींचा विचार करून पहा.आयुष्यात एकदा तरी वाटेल की आपण स्वतः बदलायला हवं.स्वतःमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे याची जाणीव होईल.एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायच असेल तर दिशा बदलावी लागतेच.म्हणून स्वतःला बदलायला शिका.केवळ इतरांसाठी म्हणून नाही तर स्वतःच्या आयुष्यासाठी बदल हा तितकाच महत्त्वाचा असतो.

Change हा compulsory नसला तरी तो necessary नक्कीच आहे.so, think about change…and change yourself… आयुष्य एका सुंदर वळणावर पोहोचत असेल तर आणि काय हवं…?


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “स्वतःला बदलता यायला हवं, रडण्यासाठी तुमच्या आयुष्यात हजार कारणे आहेत.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!