Skip to content

विवाहबाह्य चौकटीतून….

संयोजिता बापट
येऊन पडतं बीज किंवा…. सहसा पेरल्याही जातं ते अंगणात आपल्या….
येतो अंकुर त्यालाही एक नवी उमेद घेऊन नैसर्गिकरित्याच सर्वसामान्य असल्यासारखा असेल त्या परिस्थितीतही….कारण बहरायचं असतं फुलायचं असतं थोडक्यात….थोडक्यात जगायचं असतं……रोपट्याला व्हायचा असतो वृक्ष आणि द्यायची असते सावली या अंगणात असलेल्या घराला…घरातल्या माणसांना….अट…अट मात्र एवढीच….अट नव्हे किंचीतशी अपेक्षा म्हणायला हरकत नाही ओलाव्याची…..पण होतं काय बघा नेमकं….अचंबित दुर्लक्ष केल्या जातं दुसर्‍याच्या बागेतल्या,दुकानातील टिचभर बादलीच्या पाण्यात बुडून टवटवीत दिसणार्‍या फुलांच्या मोहात पडून  आपल्याच अंगणातल्या हक्काच्या रोपट्यावर जे देणारं असतं कायम गारवा….सुगंध बहरलेल्या फुलांचा….आणि करणार असते आग शांत…..ह्रदयाची…आतड्याची…. आणि…..देहाचीही क्षणिक क्षणिक  कायमस्वरूपी असलेली जेव्हा जेव्हा उमळेल तेव्हा तेव्हा  मिळणार्‍या रसरशीत फळापासून….सावलीपासून याच रोपट्याच्या…..अट….अट नव्हे किंचितशी अपेक्षा मात्र एवढीच ओलाव्याची!!!
कारण हवा असतो ना उर्जास्त्रोत प्रत्येकालाच काही ना काही प्रज्वलित व्हायला आपआपल्या परीने.आणि तसही जैविक अजैविक सारं सारंच तर अवलंबून आहे इथे एकमेकावर.मग ना जाणे का पळतात माणसे अशी चक्राबाहेर….जिथे एक खिळा निसटला की अख्ख चाक कोलमडून पडतं आणि फरफटत जातो प्रवास, आयुष्य एक अपघात असल्यासारखा अशा कित्येक रोपट्यांचा….
ताकद असते प्रचंड तारूण्याची… ती तशी नंतर म्हणता येईल त्याआधी आंधळ्या खोचट पुरुषार्थाची….छे!! हा तरी कसला पुरुषार्थ?? पण असो त्याला सोडतो ना नेऊन तो बाहेरच्या दुनियेत लाथाळून घरच्या रोपट्याला उन्मळून झुरुन झूरुन सुकेपर्यंत….दोष….दोष नव्हे  किंचितशी अपेक्षा मात्र एवढीच ओलाव्याची…..
निसर्गचक्र प्रत्येकालाच लागू होतं इथे याला त्याला….त्याला….आणि तुमच्याआमच्यातल्या प्रत्येकाला. जातात फुलं आपआपल्या प्रवासावर अवतीभवतीची सारीच बागेतली.आणि आता बाजारातली???? क्षीण आलेला असतो ना  बादलीतल्या  टिचभर पाण्यातल्या टवटवीत तरीही झिंगलेल्यागत अवस्था असलेल्या त्या फुलांचाही ……
मग नाईलाजास्तव फिरतात पाय घराकडे…घर असलेल्या अंगणाकडे आणि हे सर्व सावलीत ठेवण्यात उन्हात तळमळत उभ्या असलेल्या त्या चेंगारलेल्या रोपट्याकडे….रोपटं कसलं ते  आता? झुरत झुरत वादळवारा,ऊनपाऊस एकट्यानेच झेलत आतल्याआत उन्मळून उन्मळून पडलेला तरीही  खंबीर  उभा असलेला वृक्ष…कल्पवृक्ष म्हणा ना हवं तर झालेला असतो तो एव्हाना आतापर्यंत.कारण याच्यासारख्या असंख्य निराधार झालेल्या स्वार्थी पुरुषार्थाला वाटत असतो तो आता हवा असलेला सर्व काही देणारा.मग सुरु होतो मिष्कील प्रयत्न गरज नसतांना गरज बनण्याचा, खतपाणी घालण्याचा, जिव्हाळा जिव्हाळा खेळण्याचा….ज्याची गरजच उरलेली नसते आता  कारण वेळ बराच झालेला असतो परत यायला नि तोवर  धरलेली असते पकड आता याच्या आधाराविनाही स्वतःच स्वतःशी.मिळविलेला असतो विजय सर्व इंद्रियांवर त्यागून त्यागून इच्छा सार्‍या.तरीही  कधी लाथाडून गेलेली याची वासना विकृती चाखत असते फळं आता अंगणातल्या हक्काच्या वृक्षाची…नुसतीच फळं नव्हे तर पिकलेली सुकलेली  पानं आणि अगदी अगदी अक्षरशः अंगाला खरचटविणारी ती ओबधधोबड सालसुद्धा  मोठ्या चवीने…..चव कसली…..  तोडत असतो लचके त्या निर्जीव देहाचे….एकच कारण….एकच अट… घेऊन….किंचितशी अपेक्षा ओलाव्याची…..त्यानी ओलांडलेल्या विवाहबाह्य चौकटीतून……..
आपलं मानसशास्त्र’ या अधिकृत फेसबुक समूहाला भेट द्या आणि सामील व्हा !
https://www.facebook.com/groups/aapall.manasshastra

आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!