Skip to content

‘सेक्स’ ची एक अद्वितीय परीभाषा !

अभिनव ब. बसवर


‘सेक्स’ ची एक अद्वितीय परीभाषा !


सेक्स ही गोष्ट इतकी तुच्छ लेखली गेलीये की जेवणाचे फायदे एकवेळ सांगावे नाही लागत पण सेक्स बद्दल पाटी कोरी आहे. वासनेचं अंतिम  रूप म्हणजेच सेक्स हेचं मनात बसलं आहे. त्यामुळे दोन व्यक्ती सेक्स करतात तेव्हा ते वासना बाहेर काढत असतात हि ढोबळ समजूत.
सेक्स हा उत्कृष्ट व्यायाम आहे हे डोकं आपटून सांगितलं तरी तोंडावर रुमाल ठेवून हसलं जातं. व्यायाम म्हणजे पळणं आणि डंबेल्स उचलणं तर प्रेम म्हणजे त्याग करणं या व्याख्या आम्हाला तोंडपाठ आहेत. खरं प्रेम आहे ना तुमच्यात मग तुम्ही सेक्स कसं काय केलं ?भूक लागल्यानंतर चपाती खाणं जितकं स्वाभाविक आहे तितकंच लैंगिक गरज निर्माण झाल्यानंतर सेक्स करणं. तरुणवयात सेक्स सोडून बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत ही कायमची रड. सेक्स ची सुरुवात तरुण वयापासूनचं होणार हे स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. भूक मारून जगता येतं का ? मग सेक्स ची गरज तितक्या सहजतेने मारून कसं जगता येईल ?

प्रजनन करण्यासाठी निसर्गाने शरीरात लिंगाची निर्मिती केली असली तरी  प्राण्यांसमान कोणत्याही वार्षिक सायकल सारखी माणसाची सेक्स ही गरज नाहीये. तिला कोणत्याही ऋतुचं बंधन नाहीये की वेळेचं. स्त्री आणि पुरुष सहमतीने एकत्र आल्यानंतर सेक्स हि स्वाभाविक गोष्ट आहे.

वासनेच्या गलिच्छ दृष्टिकोनातून पाहण्यापेक्षा स्त्री पुरुष संबंधाच्या निकोप दृष्टिकोनातून सेक्स कडे पाहणं जास्त उपयुक्त आहे.

***
            लिहून आणि वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात             
आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “‘सेक्स’ ची एक अद्वितीय परीभाषा !”

  1. फारच सुंदर व उपयुक्त लेख आहे आपला

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!