Skip to content

अशा १० गोष्टी ज्या पाहिल्यानंतर इतरांना सहज सांगणं खूप अवघड होतं.

अशा १० गोष्टी ज्या पाहिल्यानंतर इतरांना सहज सांगणं खूप अवघड होतं.


मेराज बागवान


आयुष्यात आपण अनेक प्रसंग अनुभवतो, पाहतो.पण त्यातील काही गोष्टी अशा असतात की ,त्या इतरांना सांगणं खूप अवघड होतं. या लेखात आपण अशाच काही १० गोष्टी पाहणार आहोत, ज्याचा संबंध मानवी मनाशी आहे.

१) अपमान झालेला पाहणे : कधी कधी आपल्या समोर एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा चारचौघात खूप अपमान करीत असते.खूप बोलत असते त्या व्यक्तीला, ज्यामुळे त्या दुसऱ्या व्यक्तीला खूप मानसिक वेदना होत असतात.आणि अनेकदा आपण तिथे हस्तक्षेप करू शकत नाही. तसेच हा झालेला प्रसंग आपण इतरांना देखील सहज सांगू शकत नाही.

२) नाते-संबंध तुटताना पाहणे : अनेकदा कलह,भांडणे, छळ , गैरसमज, संशय इत्यादी गोष्टींमुळे अनेक घटस्फोट होतात.कायदेशीररित्या घटस्फोट नाही झाले तरी देखील विभक्त होण्याची वेळ येते.आणि असे काही नाते संबंध तुटलेले पाहिले की मनाला नकळत वेदना होतात आणि अशा गोष्टी आपण पटकन कुणाला सांगू देखील शकत नाही.

३) बिकट आर्थिक परिस्थती पाहणे : कधी कधी आपल्या संपर्कात अशा काही व्यक्ती असतात, त्या आर्थिक रित्या खूप कमकुवत असतात. काहींना तर एक वेळच्या जेवणाची मारामार असते. प्रचंड आर्थिक झळ त्या कुटुंबाला भोगावी लागत असते.जणू त्यांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहते.पैसे नाहीत म्हणून त्यांच्या कित्येक इच्छा काळाच्या ओघात कायमच्या विरून जातात.मग अशी परिस्थिती आपण जेव्हा पाहतो, तेव्हा खरेच ही गोष्ट आपण सहज कुणाकडे व्यक्त करीत नाही.

४) मोठे आजारपण : आपल्या घरात किंवा परिचयात कोणीतरी दुर्धर आजाराने ग्रासलेले असते.त्यांचे दुःख पाहून आपण देखील खूप दुःखी होतो .पण तरी देखील ही गोष्ट आपण सहज कोणाला सांगू शकत नाही.

५) प्रेम-प्रकरण – ‘प्रेम’ ही गोष्टच खूप निराळी आहे.ते एक वेगळेच प्रकरण आहे. एखाद्याचे काही प्रेम-प्रकरण चालू आहे.हे आपल्याला माहीत असते. पण आपण ते फक्त आपल्या मनात ठेवतो. समाजात अशा गोष्टी सहजरित्या आपण नाही बोलून दाखवत.

६) नोकरी जाणे किंवा व्यवसायात तोटा – नोकरी किंवा व्यवसाय हे आर्थिक उत्पन्नाचे एक साधन आहे.उपजीविकेसाठी ते आवश्यकच आहे.पण अचानक कधीतरी आपण पाहतो की आपल्या मित्राची नोकरी गेली , किंवा त्याला व्यवसायात प्रचंड तोटा झाला आहे.मग अशा गोष्टी आपण जरी रोज पाहत असलो तरी देखील इतरांकडे बोलायला मन लगेच धजावत नाही.

७) परीक्षेतील अपयश – काही मुले-मुली परीक्षेत अपयशी होतात.अनेकदा प्रयत्न करून देखील त्यांना फारसे यश मिळत नाही.पण आपण ही गोष्ट समाजात, इतरांकडे सहज बोलून नाही दाखवू शकत.

८) आत्महत्तेमुळे झालेला मृत्यू – समाजात अनेक आत्महत्या होतात.कारण कोणतेही असले तरी देखील अनुपम उघड उघड ही गोष्ट इतरांकडे बोलून नाही दाखवू शकत.

९) कौटुंबिक कलह/भांडणे- अनेक घरात, आपल्या शेजारी आपण अनेक भांडणे झालेली पाहतो.काही ठिकाणी ही भांडणे रोजचीच असतात.पण इतरांकडे आपण हे सहज बोलून नाही दाखवत.

१०) मानसिक रुग्ण /आजार – आजकाल मानसिक आजार बळावत आहेत.नैराश्य, अति-ताण, ओढाताण , भीती यामुळे अनेकजण मानसिक आजारांना बळी पडत आहेत.यामुळे काही नाजूक मनाची माणसे वैफल्यग्रस्त होऊन जणू जिवंत असूनही मेल्यासारखी आयुष्ये जगत आहेत.त्यांची ही स्थती पाहून आपले मन देखील खूप दुःखी होते.आणि यामुळेच आपण इतरांकडे हे पटकन बोलूं नाही दाखवत.

या काही गोष्टी आहेत , ज्या पाहिल्यानंतर आपण सहज त्या इतरांना सांगू शकत नाही.याला अनेक कारणे असू शकत.अर्थात व्यक्तिपरीत्वे ह्या गोष्टी बदलू शकतात.पण सहसा अशा काही गोष्टी आपण नाही उघड उघड बोलू शकत.कारण काही गोष्ट व्यक्त होण्यापेक्षा अव्यक्तच राहिलेल्या चांगल्या असतात.

ज्या काही गोष्टी पाहून आपण त्या इतरांना सांगू तर शकत नाही, पण त्या गोष्टींसाठी आपल्या परीने जी काही थोडी मदत त्या व्यक्तीला करता येईल , किंवा मदत कशी , कोणत्या प्रकारे करता येईल हे पाहिले पाहिजे.

कारण फक्त हळहळ व्यक्त करून काही होत नाही.मात्र मदतीचा हात पुढे करून देता आला पाहीजे आणि मानसिकरित्या एखाद्या व्यक्तीला पुन्हा खंबीरपणे उभे राहण्यासाठी मदत करता आली तर आपल्या जन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले असे म्हणता येईल.

एकमेकांची कठीण काळात साथ द्या.आज परिस्थती चांगली आहे म्हणून उद्या पण ती तशीच असेल असे नाही.तसेच आज खूप दुःखदायक परिस्थिती आहे म्हणून ती कायमच असेल असे नाही.म्हणूनच एकमेकांचा आधार बना, एकमेकांना पाठिंबा द्या.यामुळे आयुष्यात नक्कीच फरक पडतो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!