Skip to content

ह्यावर नेहमी विश्वास ठेवा की माझी ही परिस्थिती बदलणार आहे.

ह्यावर नेहमी विश्वास ठेवा की माझी ही परिस्थिती बदलणार आहे.


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


जिंदगी इक सफ़र हैं सुहाना…यहाँ क्या होगा कल किसने जाना…….!! हे हिंदी चित्रपटातील गाणं सगळ्यांना माहीत आहे.आयुष्य हा एक प्रवास आहे. इथे कधी काय होईल कुणालाही माहीत नाही. त्यामुळे जे होईल जे घडतय त्यावर विश्वास ठेवा. विश्वास पुराव्यांवर आधारित असतो असं म्हणतात पण मग प्रत्येकवेळी पुरावे मिळेपर्यंत विश्वास ठेवण्यासाठी वाट पहायची का…?

काही ठिकाणी तरी पुराव्यांआधी विश्वास हा ठेवावाच लागतो.नाहीतर प्रत्येकवेळी अविश्वास दाखवला तर गणितं बिघडत जातात.आयुष्य म्हणजे एका अर्थाने खडतर प्रवास….! कुणाची परिस्थिती चांगली असते तर कुणाची परिस्थिती वाईट असते.पण आपण हे विसरतो की चांगल्या परिस्थिती चा जन्मसुद्धा वाईट परिस्थितीतून झालेला असतो.कारण दिवस हे बदलतात… हो , एक ना एक दिवस सगळे दिवस बदलत असतात.फक्त आपण त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं असतं.

जगण्याच्या आशा , जगण्यावरचा विश्वासच सोडून दिला तर काहीच बदलणार नाही. काहीच होणार नाही , काहीच होऊ शकत नाही या विचाराने वातावरण आणि परिस्थिती अजूनच गढूळ होत जाईल. काहीतरी निश्चितच चांगल होईल यावर विश्वास ठेवा. कुणी आर्थिक परिस्थिती बिकट असते तर कुणी अगदी वाईट विचीत्र परिस्थितीतून जात असतं.मनामनाने बांधलेली नाती तुटतात , कुणाला समाजात वेगवेगळ्या कारणांमुळे वाळीत टाकलं जातं तर कुणाला कुणाच्या परिस्थितीवरून हिनवलं जातं.

आज आर्थिक स्थिती बेताची आहे म्हणजे ती अजून दहा वर्षानंतर तशीच राहणार आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीच आहे. कारण आपण आपली वाईट परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतच असतो त्यामुळे थोडीफार तरी आपली परिस्थिती ही पूर्वीपेक्षा नक्कीच चांगली झालेली असते.

पण आपला आपल्या प्रयत्नांवर प्रामाणिक विश्वास हवा तरच हे साध्य होईल.आनेवाला पल जानेवाला हैं….. हे माणसाने लक्षात ठेवायला हवं.त्यामुळे आयुष्यात कितीही वाईट परिस्थिती आली तर ती एक ना एक दिवस जाणार आहे हे आपण स्वीकारायला हवं.कोणतीही वाईट गोष्ट फार काळ तग धरून राहू शकत नाही. त्यामुळे आले तर येऊद्यात वाईट दिवस…नजरेला नजर देऊन प्रत्येक दिवसाला भिडायची हिम्मत सगळ्यांनी ठेवली पाहिजे.

किती किती वाईटच परिस्थिती असते कित्येकांची…. अन्न – पाण्यावाचून अजूनही कितीतरी जण तडफडतायेत.शिक्षणापासून अगदीच लहान लहान मुलं वंचित राहतायेत.कुणाला खायला नाही तर कुणाला रहायला घर नाही. कुणाचा business मध्ये तोटा होतो तर कुणाचा ‘business’ थेट बुडतो. कुणाकडे सगळं असूनही जवळची माणसं नसतात.

आता मित्रांनो असे प्रसंग अशी परिस्थिती आपल्या सर्वांच्या ओळखीचीच आहे. एक लक्षात ठेवा ही परिस्थिती सुद्धा आल्यासरशी निघून जाईल फक्त प्रयत्न करणं सोडू नका.कारण आर्धी परिस्थिती बदलवण्याच सामर्थ्य निश्चितच आपल्या हातात , आपल्या प्रयत्नांमध्ये आहे. आणि एक तर माणूस हा असा प्राणी आहे की ज्याच्या अपेक्षा ह्या सतत वाढत जातात.त्यामुळे त्याला त्याच्या वाढत्या अपेक्षांनुसार त्याची लवकरात लवकर परिस्थिती बदलावी असं वाटत असतं.

पण काही माणसाकडे मात्र थोडा संयम कमी पडतो.आणि आहे ती परिस्थिती बदलेल यावर ते विश्वास ठेवायला तयार होत नाहीत.तर त्या सगळ्यांना एकच विनंती आहे की , आहे ती परिस्थिती बदलेल ह्यावर नक्की विश्वास ठेवा.त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला मात्र विसरू नका.आर्थिक परिस्थिती चांगली होईल , समाजातील लोक वाईट साईट बोलणार नाहीत , आहे ती स्वप्न , इच्छा-आकांक्षा एक ना एक दिवस नक्की पूर्णत्वास येतील.

आज परिक्षेत कमी गुण मिळाले म्हणजे उद्या परिक्षेत कमीच गुण मिळतील असं नाही. आज चुकलं म्हणजे पुन्हा चुकेलच असं नाही. त्यामुळे प्रयत्नांवर विश्वास ठेवायला शिका.अशी कितीतरी उदाहरणं आपल्या अवतीभवती आहेत. महेंद्रसिंग धोनी , चेतन साकरिया इतकच नाही तर अनेक कलाकार जे की एखादी परिस्थिती आपल्या अथक प्रयत्नांनी बदलू शकते याची उत्तम अशी उदाहरणं आहेत. So…एकदा तरी विश्वास ठेवा….परिस्थिती नक्की बदलेल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!