Skip to content

हे शक्य नाही” ही एका पराभुताची मानसिकता आहे.

हे शक्य नाही” ही एका पराभुताची मानसिकता आहे.


टीम आपलं मानसशास्त्र


“हे शक्य नाही” ही नकारात्मक भावना . बरेचदा एखादी गोष्ट सुरुवातीला खूप सहज वाटणारी असते. परंतु प्रत्यक्षात जेव्हा सुरुवात करतो तेव्हा ती खूप अवघड आहे ही जाणीव होत असते. तरी जमेल ही आशा असते आणि अजून प्रयत्न करतो. पण जस जसे अजून खोलात जावू , पुढे जावू तस तसे ती गोष्ट खूपच अवघड आहे आणि आता ती जमणार च नाही. आपल्याला हे शक्य नाही असे जाणाविते.

माझ्याकडे सल्ला मागायला शिवानी आली होती. बारावी पर्यंत अतिशय हुशार. म्हणून engineering admission घेतली. First year मध्ये चांगले मार्क्स मिळाले. आणि second year मध्ये पहिल्याच सेमीस्टर मध्ये दुसरा paper अवघड गेला. घरी आली खूप upset. ओक्साबोक्शी रडत होती. आता नापास होणार .सगळे संपले .. हेच डोक्यात. नेक्स्ट पेपर चा अभ्यास राहिला बाजूला सतत अवघड गेलेल्या पेपर चा विचार.

आई बाबा समजून सांगत होते काही फरक नाही. आता माझे आयुष्यात काहीच शिल्लक राहिले नाही. आता माझे engineering चे स्वप्न पूर्ण होणारच नाही. आता engineering ही गोष्ट अशक्य च आहे .मी हारले. पराभूत झाले. आता मला अभ्यास पण शक्य नाही. माझा आत्मविश्वास गेला. आता सगळे संपले आयुष्यात काही उरले नाही ..हेच विचार कारण आतापर्यंत कायम अतिशय चांगल्या मार्क्स नी पास होण्याची सवय. कायम ९२ टक्के घेण्याची सवय. हार , मागे पडणे , नापास होणे हे माहितीच नाही. असे काही पेपर अवघड जाणे माहितीच नाही. नोट्स काढल्या असून ही पेपर अवघड का गेला त्यातच विचारचक्र फिरत होती.

हीच गोष्ट डोक्यात ठेवून दुपारी तिने चाकूने हातावर वार करून घेतला.. भळाभळा रक्त वाहू लागले. घरात आई होती एकदम आईचे लक्ष तिच्याकडे गेले. चाकू काढून घेतला पटकन . जखम , रक्त थांबविले.

आईने फोन केला मला ताबडतोब भेटायचे आहे . माझ्याकडे दोघी आल्यावर शिवानी ला म्हणले बस समोर. आईला बाहेर जायला सांगितले. नजर अपराधी असल्यासारखी .. निराश. आत्मविश्वास हरवलेला.

मी विचारले नाव ..खाली बघून शिवानी .. मी म्हणले तू माझ्याकडे बघून बोल. आधी डोळ्यात डोळे घालून बोल. तरच आपण पुढे बोलू. खूप शांत .पाच दहा मिनिटे तशीच बसली. मग हळूच बघितले माझ्याकडे म्हणले अशीच अशीच बघ. आणि मी हसले मग ती ही हसली. हळूहळू मोकळी होवू लागली. नक्की काय झाले ..तिनेच सांगितले. पेपर अवघड गेला ..आता engineering पूर्ण करणे शक्य नाही .म्हणून मानसिक दृष्ट्या खचली. पराभूत झाली. लोक काय म्हणतील, माझ्या बरोबरचे मित्र मैत्रिणी पुढे जातील, मी एवढी हुशार असून असे का झाले. ? आता सगळेच संपले हेच डोक्यात. नापास झाले तर मागे पडेन .

मग तिला समजावले अग हे सगळे विचार डोक्यातून काढून टाक. एका विषयाचा पेपर अवघड गेला. नापास झालीस तर पुढच्या सेमीस्टर ला सोडविता येईल. त्या पेपर मुळे तू बाकीचे पेपर का दुर्लक्षित करते. आहेत त्या पेपरच्या अभ्यासावर focus कर. आणि लोक काय म्हणतील , मित्र मैत्रिणी पुढे जातील , नातेवाईक या कोणाचा ही विचार करू नकोस.

तुझ्याकडे notes काढलेल्या तयार आहेत आता या पेपरच्या अनुभवातून कसा अभ्यास केला पाहिजे याचा अंदाज आला आहे. अजून एक चान्स मिळाला चांगले अभ्यास करण्याचा , विषय खूप खोलात जावून अभ्यास करण्याची संधी मिळाली असा विचार कर. एक सेमीस्टर ही वाया नाही गेले. पुढच्या सेमीस्टर ला चांगला अभ्यास कर.

आणि या एका पेपर करिता बाकी पेपर दिले नाहीस तर नक्की हे सेमीस्टर पूर्ण परत द्यावे लागेल त्यापेक्षा एक पेपर देणे सोपे ना. लोकांचे काय विचार करतेस . आज चांगले आहे तर ते चांगले म्हणणार. वाईट झाले तर वाईट. त्यांना काय फरक पडतो. ते कुठे येणार आहेत का मदतीला. खूप समजावले. पंधरा दिवस रोज ती येत होती माझ्याकडे.

Engineering , माझे स्वप्न पूर्ण करणे “हे शक्य नाही” ही एका पराभुताची मानसिकता होती तिची .परंतु तिच्यातला आत्मविश्वास परत जागा केला. आपल्या आयुष्याचे निर्णय आपण घेणार आहोत एक वर्ष मागे राहिलो म्हणून काही फरक पडत नाही उलट अजून एक संधी आणि अनुभव मिळतो. तू हुशार आहेस स्वतः चे टाईम टेबल सेट कर ..आणि आपण कोणत्या रेस चे घोडे नाही ..

आपण पहिले आलो तरच हुशार असे नसते. पहिला दुसरा नंबर अगदी दहावा number आलेला ही हुशार च असतो. अभ्यासू असतो. नंबर इकडे तिकडे झाला तर काही फरक पडत नाही. किती तास अभ्यास केला या पेक्षा किती समजले हे महत्वाचे. दुसऱ्या number वाला त्याचा एक मार्क गेला आणि तो दुसरा आला म्हणजे तो हुशार नाही त्याचा अभ्यास नाही असे नसते ना. त्याला ते योग्यप्रकारे मांडता आले नसेल. काही ही होवू शकते.

“हे शक्य नाही” ही एका पराभुताची मानसिकता आहे.ही नकारात्मक गोष्ट आहे. म्हणून त्याविरुद्ध विचार केले पाहिजेत ते म्हणजे सकारात्मक .
आयुष्य सुंदर आहे . “हे शक्य नाही” ही एका पराभुताची मानसिकता निर्माण होते तीच खरी सुरुवात आहे असे लक्षात ठेवा आणि पराभूत न होता . हार न मानता आता आपली जिद्दी ने खरी सुरुवात करा , आता यश फार दूर नाही हे लक्षात ठेवा. जेव्हा आपण निराश होतो , हताश होतो , सगळे संपले असे वाटते . तीच परत नवीन गोष्टी ची सुरुवात असते. क्षणभर वाटले तर विसावा घ्या. पण परत चौप्पट जिद्दीने उभे रहा आणि पुढे वाटचाल करा. बघा तेव्हा जाणवेल की अरेच्चा यश तर फक्त हाताच्या अंतरावर होते. आणि मी उगीच च शक्य नाही म्हणून गप्प बसलो. / बसले.

रेल्वे ट्रॅक बदलण्यापूर्वी खडखडाट होतो. Slow होते. पण ट्रॅक बदलला की परत स्पीड पकडते आणि in time पोहचते.

तसेच आयुष्यात ही आहे. स्पीड ब्रेकर , आला की स्पीड कमी होणारं, परत gear बदलून स्पीड पकडताना वेळ जाणार. तो द्यावा लागणार. गाडी असो , जीवन असो , नाती असोत , किंवा शिक्षण असो किंवा नोकरी . होणारे बदल स्वीकारून पटकन त्यात प्रगती करायची असेल तर स्वतः ला update करावे लागेल . कधी कधी pause , restart करावे लागेल. आणि negative गोष्टी recycle bin मधुन कायमच्या delete कराव्या लागतील .त्या जागी positive गोष्टी स्टोअर कराव्या लागतील.

आयुष्य सुंदर आहे. हताश , निराश होवू नका. आयुष्यात चढ – उतार , यश – अपयश, हार – जीत होतच राहणार. म्हणून पराभव पत्करून पुढे जाणे सोडू नका. उलट आपल्याला ते प्रेरणा देत असते. आपल्याला नवीन नवीन मार्ग शोधता येतात, नावीन्य मिळते. आयुष्यात पुढे जाण्याची जिद्द आणि नवे रस्ते मिळतात.सापडतात.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!