हसती-खेळती बायको आज ‘Stressful’ आयुष्य जगते आहे….
टीम आपलं मानसशास्त्र
हसतीखेळती बायको म्हणजे संपूर्ण कुटुंब , घर आनंदी, हसते खेळते. घरातल्या सगळ्यांचे मूड , घरातले वातावरण हे सगळे घरच्या स्त्रीवर अवलंबून असते.
प्रिया कायम हसत खेळत असायची. घरच्या सगळ्यांना ही ती असेच कायम ताजे तवाने आणि उत्साही ठेवायची.
दरवर्षी मंगळागौरी चे खेळ खेळण्यास प्रिया आणि तिचा group जात असत. अतिशय उत्साहाने प्रिया ने हा ग्रुप स्वतः तयार केला होता. आणि जिथे जात तिथे असणाऱ्या उपस्थितांना यांचे हे खेळ आनंदी आणि उत्साही करत. सगळ्यांना त्यात involve करून घेत. म्हणण्यापेक्षा सगळे आपसूकच त्यात involve होत. काल ही असेच या सगळ्या एके ठिकाणी कार्यक्रम करण्यास गेल्या होत्या.
कार्यक्रम नेहमी प्रमाणे छान झाला पण सगळ्या जणी नंतर प्रिया ला विचारू लागल्या की का ग प्रिया काय झाले आज तू नेहमी सारखी फॉर्मात नव्हतीस. काही तरी बिघडले आहे , काय झाले ग ?
प्रिया : – नाही , कुठे काय ?
घरात मुले : आई काय ग , अशी का आज ? काही होते आहे का ?
प्रिया : नाही मुलांनो , काहीच नाही.
वरचेवर असे जवळच्या सगळ्यांना जाणवू लागले की प्रिया मध्ये काही तरी बदल होत आहेत. एवढी स्वतः हसती खेळती आणि इतरांना ही हसते खेळते करणारी प्रिया सध्या काही तरी लपवत आहे. तिच्या वागण्यावरून , शांत बसण्या वरून , कोणत्या तरी वेगळ्याच विचारात असलेली , चेहऱ्यावर सतत काही तरी चिंता असल्यासारखी .. मन आणि आयुष्य दोन्ही ही खूप stressful situation मध्ये आहे असेच वाटत होते.
शेवटी प्रिया ची एक जवळची मैत्रीण आणि मानस शास्त्र विषयातली सल्लागार असलेली केतकी तिला म्हणाली मला तुला निवांत भेटायचे आहे. बाहेर भेटू.
दुसरे दिवशी सगळी कामे आटोपल्यावर दोघी दुपारी एक वाजता भेटल्या. छान पैकी पूर्वी ज्या हॉटेल मध्ये भेटायच्या त्याच हॉटेल मध्ये भेटल्या. तिथले वातावरण ही नेहमीचे . हॉटेल मधले वेटर आणि काउंटर वरचे मालक ही चांगले परिचित . त्यामुळे नेहमी सारखा मोकळेपणा ही मिळाला दोघींना.
केतकी : प्रिया , अग बरेच दिवस झाले तुझ्यातला बदल सगळ्यांना जाणवत आहे. तेवढ्यात अभी आला. प्रिया ला आश्चर्य वाटले. हा कसा आता इथे.
केतकी : हो हो प्रिया cool , अग अभी नेच सांगितले तू हल्ली खूप स्ट्रेस मध्ये असतेस.घरात , बाहेर ही . त्याला तुझी खूपच काळजी वाटू लागली , मुलांच्या समोर बोलायला नको म्हणून तो मला म्हणाला आपण बाहेर भेटून प्रिया सोबत बोलूच.
केतकी : प्रिया तू एवढी आनंदी , हसत खेळत असायची असे काय झाले की तू आज ‘Stressfull’ आयुष्य जगते आहे….??
प्रिया : – केतकी , अग माझे आणि अभिचे खरेच खूप छान सुरू होते. घर , मुले , मिळणारा पगार , येणारे जाणारे या सगळ्यांचे पाहुणचार ही उत्तम करत होते मी. घर छोटे होते पण तरी त्यात ही नीट नेटकेपणा होता. कोणी आले गेले तरी adjustment करत होतो. त्यातही मजा असायची. मग पत्ते खेळा , गाण्याच्या भेंड्या , कॅरम असे विविध खेळ खेळत असायचो.
प्रिया पुढे सांगू लागली…
अभी ची ईच्छा होती मोठे घर घ्यायचे. कारण आता मुले ही मोठी होवू लागली होती. त्यांना जागा , त्यात अभी ला दोन वर्षापूर्वी चांगल्या मोठ्या कंपनी मध्ये जॉब मिळाला आणि financially ही थोडे loan आणि पुढच्या भवितव्याचा विचार करता मोठा फ्लॅट घेतला. अर्थात खर्च एकदमच वाढला. घराचे हप्ते , सोसायटी , लाईट बिल , घर थोडे लांब त्यामुळे मुलांचे शाळेत जाणे येणे याकरिता Van चे खर्च , मुलांचे classes , फी हे वाढतच होते. पण नवीन घर ही सजविताना थोडा खर्च वाढत होता. सगळे manage करणे अवघड जात होते. त्यात हे घर मोठे . घराची साफ सफाई करता करता प्रिया खूप दमून जात होती. वेळेत सगळी कामे होणे ही गरजेचे त्यामुळे सतत नकळत तिच्यावर पडणारा स्ट्रेस हा आता जाणवू लागला होता.
त्यात अभी loan कमी करण्याकरिता प्रयत्न करत होता. कंपनी तर्फे तो onsite जाणार हे फिक्स झाले होते. सगळी तयारी सुरू होती. जाण्याचा दिवस जवळ येवू लागला तसे प्रिया म्हणाली माझे हसणे खेळणे विसरून गेले मी . सतत stressful life वाटू लागले. कारण काय तर आता अभी तिकडे परदेशी एकटा जाणार , ती आणि मुले च इकडे राहणार. मुले लहान आहेत .कसे होणार . काही झाले आपल्याला ,मुलांना तर अभी चा आधार तरी असायचा. तो पटकन मदत करायचा .आता सगळी जबाबदारी माझ्या एकटी वर पडणार. तो स्ट्रेस नकळत माझ्या मनात वाढत गेला. वेळेत तिकडून पैसे पाठवेल ना ? आपल्याला वाऱ्यावर सोडणार का ? असे अनेक प्रश्न पडत होते आणि त्यांची उत्तरे शोधताना चिंता वाढत होती. असुरक्षितता वाढत होती.
त्यापुढे प्रिया सांगू लागली , त्यात अभी परदेशात एकटा कसा राहणार , त्याचे जेवणाचे काय , कपडे धुणे , घरातले , स्वैपाक हे सगळे तिकडे आपले आपल्याला करावे लागते. शिवाय तिकडे आपली गाडी काढली गेलो असे नाही . इकडे त्याला गाडी ची सवय . जवळ पास जायचे झाले तरी गाडी शिवाय जात नाही आणि आता तिकडे चालत , बस कसे जाणार तो .. हे सगळे विचार तिला सतत त्रास देत होते. चिंता वाढवत होते.
नवीन घराला ही दोष देवू लागली. आधीच घर च छान होते. ते lucky होते. इथे नको राहायला .जुन्या घरी जावू. असेही अनेक मुद्दे मांडत गेली.
शेवटी प्रिया ने अजून एक मुद्दा मांडला तो ऐकून अभी आणि केतकी ही चाट पडले. तो म्हणजे परदेशात स्त्रिया स्वतः ला खूप छान मेन्टेन करतात. आणि तिकडे स्त्री पुरुष असा भेदभाव ही करत नाहीत. बिनधास्त असतात सगळे.
मग जर अभी तिकडे जावून कोणाच्या प्रेमात पडला , कोणाच्या relation मध्ये अडकला तर ? आणि आम्ही कोणी तिकडे नसणार त्यामुळे ते समजणार ही नाही. मग माझे कसे होईल , मुलांचे कसे होईल. अशी चिंता तिला सतावत होती. तिचे मन खात होते. आणि सगळ्यात तिला insecure फील होत होते.
अभी ने असे कधी विचार ही केले नव्हते. तो फक्त त्याला मिळणारी कामाची संधी आणि त्यातून कमी होणारे कर्जाचे हप्ते याच गोष्टींचे विचार करून परदेशी जाण्याची संधी हसत हसत स्वीकारत होता. त्याला ही घरापासून ,बायको पासून मुलांच्या पासून दूर राहणे अवघड होते.
आपल्या लोकांना सोडून जाताना त्यालाही त्यांची काळजी वाटत होती . पण तरी काही त्याग करून तो पुढच्या चांगल्या भविष्य कालीन गोष्टींसाठी जाणार होता. आणि अचानक त्याला आज साक्षात्कार झाला की त्याची हसतीखेळती बायको आज ‘Stressfull’ आयुष्य जगते आहे…. आणि का तर ज्या गोष्टी अजून घडलेल्या ही नाहीत. किंवा कधी घडणार ही नाहीत त्यांचे विचार करून ?
अर्थात तिची जबाबदारी वाढणार होती हे नक्की. एकटी ने मुलांकडे बघणे. सगळे करणे ,गरजेच्या वस्तू घेवून येणे, काही लागले सवरले तर धडपडण . तशी तिची जबाबदारी ही मोठी होती. हे समजू शकत होता अभी. त्याने तसे केतकी समोर प्रियाला सांगितले ही.
आणि प्रिया ला हे पटवून ही दिले की तिकडे तो केवळ कामासाठी जात आहे. त्याला त्याचे कुटुंब महत्वाचे आहे. आणि मुलंच , प्रिया चा ही व्हिसा केलेला आहे. तो थोडा तिकडे सेटल झाला की त्यांना ही बोलवणार आहे तिकडे याची खात्री ही करून दिली तिला. केतकी समोर तसे त्याने आश्वासन ही दिले.
पण नको ते विषय डोक्यात घेवून प्रिया आपली हसतीखेळती बायको आज ‘Stressfull’ आयुष्य जगते आहे….याचा धक्का बसला.
आपल्या ही अनेकांच्या आयुष्यात अचानक काही. बदल घडत असतात. अनेकांची हसतीखेळती बायको आज ‘Stressfull’ आयुष्य जगू लागते. त्याला काही तरी कारणे असतात. थोडे जागरूक रहा. छोट्या पण वेळीच महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आणि त्यावर उपाय काढणे जरुरी असते.
आयुष्य सुंदर आहे. हसतीखेळती बायको आज उद्या आणि कायमच तशी राहील. ‘Stressfull’ आयुष्य तिच्या आजू बाजूला ही फिरकणार नाही. याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. बायको ही घराला घरपण देणारी आहे. ती स्वस्थ तर कुटुंब स्वस्थ. ती आनंदी तर कुटुंब ही आनंदी.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Very nice real fact
👍Nice
Abhi la kay vatal yacha pan lekh banavale na tras fakat bayakana hoto ka puruhsna hot nahi ka
सुरेख
Khupach chhan… bhavnik aahe, aani satya aahe…
1 number