Skip to content

हरलेल्या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी या सोप्या पद्धती वापरा.

हरलेल्या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी या सोप्या पद्धती वापरा.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


लागली आत्म बळाला ओहोटी
आली नैराश्याला भरती
वैफल्याचे दाटे मळभ
निरसतेचे काळे सावट
न साथ देई निद्रा
गवसे ना सुखी माणसाचा सदरा
खचला पाय मनाचा
पडझडल्या या धैर्याच्या भिंती
कोसळल्या आशेच्या तुळई
कसलीच ना वाटे शाश्वती

प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ राजेंद्र बर्वे यांनी नैराश्यात असणाऱ्या माणसाच्या या कवितेच्या रूपाने अगदी तंतोतंत वर्णन केले आहे. नैराश्यात जाणाऱ्या व्यक्तीचं असच काहीस होत. आपण सर्व काही हरवून, हरून बसलोय अशी एक मानसिकता यात तयार होते. कोणाकडूनही आशा राहत नाही. ना स्वतःकडून, ना इतरांकडून ना परिस्थिती कडून. अश्या वेळी एरवी आवडणाऱ्या गोष्टी पण आवडत नाहीत.

स्वतःच्या कुवतीवर, क्षमतांवर विश्वास राहत नाही. आपण काहीतरी करू शकतो हेच व्यक्ती विसरते. आपल्याला हातातून सर्व निसटून गेलय, आता आपण काही करू शकत नाही असं वाटल्याने जात त्रास होतो. एकदा माणूस नैराश्याच्या गर्तेत गेला तर त्यातून बाहेर पडण खूप मुश्किल असत. योग्य वेळी योग्य ती मदत नाही घेतली तर एखाद्याचा चांगलं आयुष्य पण खराब होत. म्हणून याची जेव्हा सुरुवात होते तेव्हाच यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काढले पाहिजेत. काही पद्धती वापरल्या पाहिजेत.

१.स्वतःवरचा विश्वास पुन्हा मिळवा: असं कधी होत की आपण नेहमी वाईट परिस्थितीमधून जात नाही. असं कधी होत नाही की आपण कधीच काही केलेलं नसत. आपण बऱ्याच प्रसंगात चांगली कामगिरी केलेली असते. आपल्यात तेव्हढ्या क्षमता असतात. फक्त आपली एक मानसिकता असते की आपल्याला सगळ्यातल सगळं यायला पाहिजे, सर्व गोष्टी नीट झाल्याचं पाहिजेत. आणि त्या जेव्हा होत नाही आपण कुठेतरी कमी पडतो तेव्हा स्वतः च्या क्षमता, कौशल्य नेमकी कुठे कमी पडली ती कशी सुधारायची याचा विचार न करता आपण आपणच पूर्ण हरलो असा विचार करतो. ज्याला all or nothing thinking म्हणतात.

म्हणजे झालं तर पूर्ण चांगलं नाहीतर पूर्ण वाईट. पण असं होत नाही. आपलं आयुष्य याच्यामध्ये पण असत. चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी होतात. त्यामुळे काहीतरी मनाविरुद्ध झालं तर हरल्याची भावना किंवा आपल्याला काहीच येत नाही असं न समजता आपल्याला काय काय येत हे जाणीवपूर्वक लिहून काढा. आपली बलस्थाने काय आहेत, अश्याच प्रसंगात आपण मागे कसं उभ राहिले होतो हे सर्व आठवा. असं केल्याने आपल्याला समजेल की आपण कमी नाही. आपण यावर मार्ग काढू शकतो. या विचाराने तुम्ही परत स्वतःवरचा विश्वास परत मिळवू शकता.

२. आपला दृष्टिकोन बदला: एकदा आपल्यासोबत काही झालं तर यापुढे तसच होणार असं पण आपल्याला वाटत जेव्हा आपण निराश होतो. आपण यातून कधीच बाहेर पडणार नाही असं वाटूनच हे हरलेपण येत. म्हणून आधी हे लक्षात घ्या आणि स्वतःला सांगा की कोणतीही परिस्थिती कधीही चिरकाल टिकत नाही. ती बदलत राहते. ऊन वारा पावसा सारखे हे दिवस येतात जातात. म्हणून स्वतःला सांगा की हेही दिवस जातील. महाभारतात पण पांडवांनी सर्व हरून परत सर्व साम्राज्य मिळवलं होत. हातातून सर्व गेलेलं असताना, पत्नीची इतकी विटंबना झालेली असताना देखील त्यांनी परत सर्व मिळवू हा विश्वास ठेवला आणि सर्व मिळवलं. तसच आपणही आपल्या वर विश्वास ठेवून आपल्याला हे सांगून की हे सर्व क्षणिक आहे सर्व परत नीट होऊ शकत बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

३. काही दिवस सुट्टी घ्या: कसलही टेन्शन न घेता काही दिवस सुट्टीवर जाणं, निसर्गात फिरणं हे मनाला आणि शरीराला खूप आनंद आणि शांती मिळवून देत. आपण एकाच मनस्थिती तून जात असतो. अश्या वेळी आपल्याला चेंज ची गरज असते. म्हणून काही दिवस घरातल्या व्यक्तीसोबत बाहेर जाणं, फिरणं हा खूप चांगला उपाय आहे.

४. वाचन करा: सर्व जण आपल्यासारखे परिस्थितीतून गेलेलं असतात. त्यांनी त्यातून मार्गही काढलेले असतात. म्हणूनच त्यांच्या आत्मकथा प्रेरणा देणाऱ्या ठरतात. आपल्याला पण समजत की यातून मार्ग कसा काढायचा आणि खंबीर कस राहायचं. म्हणून अस जेव्हा वाटेल की आपण आता काही करू शकत तेव्हा मोठ्या लोकांच्या जे आता लोकांसाठी प्रेरणा आहेत त्यांच्या कथा वाचा. Man search for meaning हे पुस्तक त्यापैकीच एक आहे.

या काही पद्धती वापरून तुम्ही स्वतःला मदत करू शकता.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “हरलेल्या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी या सोप्या पद्धती वापरा.”

  1. खुप छान लेख आहे खुप आवडला 👌🏼👍

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!