Skip to content

स्वाभिमान लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं केव्हाही चांगलंच!

स्वाभिमान लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं केव्हाही चांगलंच!


रोहिणी राधाकिसन


स्वाभिमान म्हणजेच self-respect आपण ज्याला म्हणतो. तो एक आपल्या स्वभावाचा भाग आहे. आपण ऐकतो ना की, तो खूप स्वाभिमानी आहे. त्याच्याशी नीट बोलायच बरं. नाहीतर त्याला राग येईल. प्रत्येक ठिकाणी स्वाभिमान असणं म्हणजे रागीटपणा असणं अस नसत बरोबर ना. पण जर आपण स्वतःला खूप स्वाभिमानी समजतो आणि आपल्याला कोणी काही उलट, चुकीचे, अपशब्द बोलले तर आपल्याला राग येतोच. आणि ते सहाजिकच आहे.

जर कोणी आपल्याशी काहीही बोलून जातंय, आणि आपण त्यांना काही प्रतिउत्तर नाही केलं. किंवा आपल्या होणाऱ्या अपमानाच उत्तर नाही दिले तर , आपल्याला लोक गृहीत धरतात. त्याला काय तो असाच आहे . त्याला कुठे फरक पडतो. अस बोलायला लागतात. आणि ज्यांची कुवतही नसते आपल्याशी बरोबरी करायची तेही येतात आणि आपल्याला ज्ञान देऊन जातात, हो ना? मग आपणच आपला स्वाभिमान जपला पाहिजे.

जगात प्रत्येक व्यक्ति एवढा स्वार्थी झाला आहे की, काय चूक काय बरोबर याच्याही पलीकडे आपला स्वाभिमान आपण राखतोय की नाही याचही भान राहत नाही. मग ही पळापळ कश्यासाठी, आपण आपल्या नजरेतही योग्य असलो पाहिजेत ना! जास्ती मिळण्याच्या नादात आपण आपली खूप अनमोल गोष्ट जी सर्वांसाठी अगदी जीवापलिकडे असते, ‘स्वाभिमान’ तोच गमावून बसतो.

जॉब मध्येही या मुळे खूप त्रास होतो. जे कर्मचारी बॉस च्या तोंडावर असतात, त्यांची कामे करतात, मागेपुढे करतात, त्यांना नेहमी बढती मिळते. आणि जे कर्मचारी स्वतःच्या कामात चोख असतात, तरी त्यांना अगदी त्यांच्या मेहनतीचा मोबदला देखील मिळत नाही.

स्वाभिमान हा प्रत्येकामद्धे वेगवेगळ्या प्रमाणात का होईना पण आहे. पण जर हाच स्वाभिमान अभिमानात बदलायला लागला की मग मात्र आपल्याला महागात पडू शकतो. बऱ्याचदा स्वाभिमान आपल्याला नडतो. खूप संधी आपल्या हातून जाऊ शकतात. कारण प्रत्येक वस्तुची एक किंमत असते. कधी-कधी ती किंमत आपल्याला स्वाभिमान डावलून मोजावी लागते. जे की स्वाभिमानी व्यक्तिला कधीच मान्य नसते. आणि ती संधी आपल्याला सोडावी लागते.

खूप लोक असे आहेत जे तरुण असूनही आपण बघतो काम करत नाहीत. आणि असेही खूप आहेत जे काम न करता भीक मागतात. याउलट असेही खूप लोक आहेत. जे वयापलीकडे काम करत असतात. मुंबई लोकल मध्ये खूप असे लोक बघायला मिळतात अगदी म्हातारी जे पेन, पेन्सिल अश्या वस्तु विकत असतात. त्यांना नक्की त्यांचा स्वाभिमान भीक मागू देत नसावा. म्हणून ते भीक न मागता काम निवडतात.

खूप तरुण घरची परिस्थिति नसल्या कारणाने आई-वडिलांकडे पैसे कसे मागावे म्हणून, part-time job, tuition, paper line अशी कामं करतात. आणि सोबत अभ्यासही करतात. हा त्यांचा स्वाभिमानच आहे. म्हणून ते एवढी मेहनत करतात. स्वाभिमान असणं हे खूप फायद्याच ही ठरत काही वेळा. अशी बरीच उदाहरण आपण बघितलीत ज्यांना हिनवल गेलं त्यांनी जिद्दीनी, मेहनतीने हिनावनारांची तोंड बंद केली. आयुष्याला योग्य वळण देऊन, यशाच शिखर गाठलय.


जसा आपला स्वाभिमान महत्वचा असतो, तसच आपण वावरताना आपल्याकडून इतरांच्या स्वाभिमानालाही ठेच पोहचणार नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. स्वाभिमान म्हणजे एक प्रकारे आपला गूण असतो. जसे आपल्या वयासोबत आपण वाढत असतो आपले कौशल्य वाढवत असतो तसेच स्वाभिमान ही आपल्यात develop होत असतो.




अगदी लहानपणा पासून, आपण आपल्या मुलांमध्ये सुद्धा स्वाभिमानाच मूल्य रुजवल पाहिजे. कळत नकळत आपण जे वागतो, म्हणजेच आपण एक पालक म्हणून, आपल्या पाल्यांच्या भावनांचा विचार न करता आपण त्यांना जसे प्रतिउत्तर देतो त्याचा परिणाम त्यांच्या स्वाभिमानवर होतो. त्यांच्या प्रश्न विचारल्यावर आपण चुकीचे react होतो. जस की, काय मूर्खा सारखे प्रश्न विचारतोस. तू तुझी कामं नीट नाहीका करू शकत. आणि आनखीनही बरेच.


आणि या गोष्टींमुळे त्यांचा स्वाभिमान नक्कीच खालावतो. आणि पुढे जाऊन त्यांच्या मध्ये स्वाभिमान राहत ही नाही. त्यांची धारणा बनते की काही केल कसही केल तरी आपल्याला हेच एकायला मिळणार आहे. या ऐवजी आपण त्यांना प्रोत्साहण दिले. चुका टाळण्यासाठी काय करावे. त्यांना कसे सुधारावे ही सांगितल तर त्यांचा स्वतःवरचा विश्वास वाढेल. स्वाभिमान वाढेल. चांगल, वाईट याच्यातला फरक कळेल.

शेवटी आपण कितीही यशाच शिखर गाठलं तरी आपण जर आपल्या स्वतःच्या नजरेत स्वाभिमानी नसलोत तर त्या यशाचा काहीच उपयोग नाही.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!