स्वतः मधल्या गुणांना ओळखा, आपले व्यक्तिमत्व अजून उठावदार करा.
सोनाली जे.
प्रत्येक वस्तू , गोष्टीत काही गुण दोष असतातच. जसे प्लास्टिक ची खूप सुंदर वस्तू कालांतराने प्लास्टिक नाजूक होते आणि तुटते. लोखंड कितीही अवजड असेल तरी कालांतराने ते गंजतेच.
प्रत्येक व्यक्ती मध्ये गुण आणि दोष असतातच. पण सतत आपण आपल्यातले दोष च मोजत बसलो , माझ्यात हे कमी आहे. मी हुशार नाही. मी काळी च आहे. एखादा मुलगा मी बारीक च आहे. एखादी मुलगी मी नकटी आहे. माझी उंची कमी ..जाड च आहे. असे जार दोष सतत सतत काढत बसलो . तर मानसशास्त्रीय दृष्ट्या आपल्या तक्रारी मुळे आपले मनोबल कमी होते. आपल्या आतल्या आत ग्रंथी निराशावादी विचार करत राहतात. त्यामुळे आपल्या विचारांची दिशा आणि वातावरण ही नकारात्मक होते.
स्वतः चे गुण ओळखण्यासाठी , आपल्यातली खासियत ओळखण्यासाठी , किंवा वैशिष्टय ओळखण्यासाठी स्वतः ची ओळख स्वतः ला होणे गरजेचे. त्याकरिता स्वतः चे परीक्षण म्हणजेच आत्मपरीक्षण करणे अत्यंतिक जरुरीचे आहे.
जेव्हा तुम्ही आत्मपरीक्षण करता तेव्हा मनाचा गोंधळ उडू लागतो. म्हणूनच चक्क एक कागद घ्या. पेन घ्या. त्यावर दोन भाग करा..गुण आणि दोष.. अगदी प्रामाणिकपणे प्रत्येक गुण आणि दोष लिहीत जा. सगळे झाले की जे गुण आहेत जसे memory खुप छान. Drawing छान. Skills कोणती सगळे सगळे. मग आवडते छंद कोणते आहेत. तुमची प्रोब्लेम solving capacity किती हे बघा.
एखाद्या कठीण प्रसंगी इतरांना सांभाळून , समजावून पुढे situation कशी हाताळायची. तुम्हाला बोलण्याची कला असेल, लिखाणाची आवड असेल , leadership खूप वेळा करावी लागते. जमते ही .परंतु आपल्याला स्वतः ला हा गुण माहिती ही नसतो. कधी आपण tour ., Picnic plan करत असतो आणि आपल्याला आपण कमी खर्चात खूप छान ट्रीप arrange करू शकतो हे माहिती नसते.
आपल्याला हौस म्हणून पदार्थ करण्याची आवड असते. खूप उत्कृष्ट करत असतो आणि आपल्याला आपण बेस्ट chef आहोत हा गुण माहिती नसतो. त्यात काय आवडते म्हणून करतो असे होत असते. पण त्यातले नावीन्य , नवनवीन प्रयोग करण्याची आवड आणि पदार्थ अजून चविष्ट बनविण्या साठी चे प्रयत्न . प्रयोगशीलता आणि सातत्य . मेहनत आपण करतो हेच आपल्याला माहिती नसते. आणि ते पदार्थ मिटक्या मारत लगेच संपविनारी आपली लोक.
ऑफिस work मध्ये आपण एक्स्पर्ट असतो. कॉम्प्युटर मास्टर mind असते.
बरेचवेळा आपलेच लोक आपल्याबद्दल नकारात्मक गोष्टी पसरवतात त्यामुळे आपल्यातली नकारात्मकता अजून वाढत जाते.
जसे काळी च आहेस , नकटी आहेस , माठ च आहेस.
तर यागोष्टी मधून आपल्या मनात नकारात्मकता वाढते. आणि सतत जर हे निराशावादी विचार मनात येवू लागले तर आपण असेच आहोत याची खात्री होते. आणि मग आपला आत्मविश्वास ही कमी होतो.
त्यामुळे इतरांच्या बोलण्याकडे , त्यांच्या मता कडे लक्ष देवू नका. याउलट स्वतः मधल्या गुणांना ओळखा . आणि ते वाढवा. आपले व्यक्तिमत्व अजून उठावदार करा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



लेख आवडला