स्वतःला Prove करण्याआधी स्वतःमध्ये Improve करता यायला हवं.
सोनाली जे
सहजगत्या रोजच्या वापरात येता जाता आपण म्हणत असतो मला prove करायचे आहे. शैक्षणिक दृष्ट्या prove करताना आपण खूप अभ्यास करतो, वेळेचे नियोजन करतो, आपल्या नोट्स काढणे , त्या वाचणे आणि लिखाण ही..कारण तुम्हाला सगळे येते आहे पण तुमचा लिखाणाचा स्पीड कमी पडला तर तुम्ही ते मांडू शकत नाही..त्याकरिता तुम्हाला लिखाण वेळेत पूर्ण करण्याकरिता तुमचा writing speed improve करावा च लागतो.
तसेच आहे अर्ध्या तासाचा वेळ तुम्हाला लेक्चर करिता दिला आहे आणि इतर गोष्टी सांगण्यात वेळ गेला तर तुम्हाला जे सांगायचे आहे ते राहून जाते म्हणून मुद्देशिर , कमी वेळात पण जास्त गोष्टी cover होतील याकरिता विचारांची दिशा योग्य दिशेनेच जाईल आणि तुमच्या बोलण्याचा स्पीड मेन्टेन राहील विचारांची सुसूत्रता राहील असे स्वतः ला develop करावे च पण ते सतत प्रॅक्टिस करत गेलात . विचारांना भरकटू न देता त्यांना line of direction मिळाली की आपोआप बोलण्याचे स्किल ही improve होते..
आपला जगण्याचा दृष्टिकोन कसा आहे , यावर आपण आहे तिथेच थांबणार का की जोमाने पुढे जाणार ..जसे संकट आले तर रडत बसणार का संकटांचा सामना करून त्यावर मात करून पुढे जाणार याकरिता इच्छाशक्तीच ठरविते की आजचा दिवस कसा जाईल.
जसे अंधारातही चालत राहिला तर कुठेतरी प्रकाशाचा किरण दिसेल. खोल बोगदा, काळाकुट्ट अंधार पण तुम्ही बोगद्यात गाडी घातली की तो अंधारातला रस्ता पार पाडताना बोगद्यातून येणारा शेवटचा उजेड जेव्हा दिसतो तेव्हा आपल्याला आत्मविश्वास येतो , की चला बोगदा आणि काळाकुट्ट अंधार संपून उजेड आणि प्रकाशाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे .
हाच दृष्टिकोन आपल्याला आपल्यातल्या नकारात्मक भावना काढून म्हणजे स्वतःला सकारात्मक विचार , भाव , दृष्टिकोन हे improve करून जीवनाची वाटचाल करत असताना स्वतः ला सकारात्मकरित्या prove करून पुढे जाण्यास मदत करत असते. आणि एकदा का आपण या चांगल्या विचारांची सकारात्मक दृष्टिकोनाची सवय लावली की कोणत्याही प्रॉब्लेम्स असतील , संकटे असतील त्यांचा सहज सामना करू शकतो.
रोजच्या जीवनात आपल्या अवती भवती , आसपास अनेक प्रकारची माणसे आपण बघतो.काही माणसे अगदी लहानशा संकटाने , दुःखाने , अपयशाने मग ते अपयश कोणतेही असो जसे नात्यामध्ये असो किंवा शैक्षणिक , व्यावसायिक अपयश असो यातून लगेच कोलमडून जातात. तर काही मात्र मोठमोठ्या संकटा मध्ये ही जसे उंच वाढलेले वृक्ष पण मुळे जमिनीत खोलवर रुतलेली..पसरलेली ते वादळ वारे आले तरी तटस्थ असतात..
त्याचा सामना करतात तसेच काही व्यक्ती ही तटस्थ राहून , भावना आणि वर्तन यावर नियंत्रण ठेवून परिस्थिती चा सामना करतात , येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला धीराने तोंड देतात. त्यावर मात करतात आणि सगळी संकटे अडचणीतून बाहेर पडतातच पण तितक्याच जोमाने आपले आयुष्य जगतात हे म्हणजे काय तर स्वतः ला prove करण्याकरिता स्वतः मध्ये घडविण्यात आलेले बदल म्हणजे improve करणेच ना !!!
नात्यामध्ये झालेले बिघाड कोणामुळे झाले हे आपण prove करत बसतो म्हणजे कायम समोरच्याला दोष देत असतो ..त्याची / तिची चूक दाखवून देत असतो..पण हे सगळे विसरून ..कोण चूक किंवा कोण बरोबर हा मुद्दा विसरून जेव्हा चूक झाली त्यात सुधारणा करण्याकरिता तोडगा कोणता याचा विचार करतो का ? तो जेव्हा विचार करू , आणि नाती अजून जास्त घट्ट होण्याकरिता प्रयत्न करू , त्याकरिता चे मार्ग अवलंबून पुढे जावू तेव्हा ती healthy relations निर्माण होतील.. टाळी एका हाताने वाजत नाही कधी..अरे ला का रे केले तर नाते नक्कीच बिघडते पण जर शांत राहून मार्ग शोधले तर नक्कीच नाती ही improve होतात.
स्वतः ला improve करण्याकरिता काही गोष्टी जरूर करा..
१. शांतपणे विचार करा..वेळ द्या स्वतः करिता –
जसे स्वतः मध्ये कोणत्या गोष्टींची कमतरता आहे ..उणीव आहे ती जाणून घ्या आणि त्यात improve कसे करता येईल, मार्ग कोणते , काय करावे लागेल , स्वतः ची वैचारिक बुध्दी आणि व्यावसायिक असेल तर स्किल कशी develope करता येतील यातून आपला परफॉर्मन्स मग जीवनातला असेल ..मनाचा..विचारांचा असेल किंवा व्यावसायिक नक्कीच improve होईल.
२. निश्चित आणि दूरदृष्टीने दीर्घ मुदतीचे ध्येय ठरवा. :
घोड्याला झापड लावली की तो कसा सरळ बघून किंवा खाली मान घालून इकडे तिकडे न बघता पुढे वाटचाल करतो तसे रोजच्या धावपळीत रोजचे प्रश्न कसे सुटतील एवढेच बघून दिवस काढतो आपण..त्यातून आपल्याला आनंद मिळतो का, समाधान शांतता मिळते का ? आणि आपण आज जे काम करतो आहोत त्याचा उपयोग दीर्घकालीन होणार आहे का ? किंवा एकावेळी अनेक कामे करत असताना कशातच एकाग्रता होत नाही आणि स्किल develop होत नाही. जसे too many cooks spoil the curry ही म्हण आहे तसेच एकच व्यक्ती एकाच वेळी अनेक ठिकाणी involve होवू शकत नाही..
अनेक कामे एकाचवेळी करू शकत नाही..एक ना धड भाराभर चिंध्या होतात तसे..आपल्या आयुष्याचे निश्चित ध्येय ठरवा.आपल्याला हवे ते लगेच मिळणे अशक्य असते पण जर आपण आपल्या मनाची तयारी केली , निर्धार पक्का केला तर योग्य दिशेने पावूल टाकू शकतो.
आपल्या शरीरात इन्फेक्शन होते म्हणजे काय तर बाहेरचे जंतू आपल्या शरीरात असणाऱ्या पेशींवर अटॅक करतात.तेव्हा आपल्या शरीरातले फायटर सेल्स त्यांची सैन्य संख्या वाढविते आणि बाहेरच्या जंतुंवर अटॅक करते. म्हणजे काय करतात तर स्वतः ला सिध्द करण्याकरिता ..prove करण्याकरिता fighters ची संख्या वाढवितात आणि आपली immune system improve करतात आणि बाहेरील जंतूंवर हल्ला करून त्यांना हरवितात.
तसेच आपल्या आयुष्यात ही आहे..संकटे , अपघात, विचारांचे थैमान , अपयश यासारख्या गोष्टी दूर करून आपली मानसिक आणि शारीरिक ताकद वाढविण्याकरिता ..improve करण्याकरिता आपली ध्येय निश्चिती मदत करत असते.
३. ध्येयाने प्रेरित लोकांच्या सानिध्यात रहा..
आपण ज्या मोठ्या लोकांच्या सोबत असतो त्यांच्या अनुभव , विचार , मते , निर्णयक्षमता यांचा अभ्यास आपोआप आपण करत असतो आणि आपल्या प्रगती करिता त्याचा वापर करून घेत असतो आणि वेळ येईल तेव्हा योग्य ठिकाणी वापर करून स्वतः ला prove करत असतो.
४. भविष्यातील आव्हानां करिता तयार रहा :-
रोजच्या जगण्यात सकारात्मकता तर पाहिजेच पण कालचा दिवस संपला सोडून द्या त्यातल्या अनुभवांचा उद्याच्या दिवसाकरिता वापर करून घ्या..आजच्या दिवसात कालच्या पेक्षा काही तरी बदल, नाविन्यता पाहिजे. शिकणे गरजेचे, शिवाय रोज येणाऱ्या प्रॉब्लेम्स चा , अडथळ्यांचा विचार करणे गरजेचे आहे.
आपल्याला आधी आलेले प्रॉब्लेम्स त्यात आपण जे वागलो , जी प्रतिक्रिया दिली ती आणि पुढे जर असे प्रॉब्लेम आले तर आपली तयारी , विचार असतील, निर्णय क्षमता असेल, त्यात improve करणे गरजेचे असते. जसे मागच्या वेळी एखादा विषय अवघड गेला आणि त्या विषयात अपयश आले..नापास झालो तर पुढच्या वेळी चांगला अभ्यास करून चांगल्या मार्कने पास होवून आपला रिझल्ट improve करता येतो..
पण म्हणजे च काय त्याकरिता प्रयत्न करणे जरुरी..
५. स्वतः ला reward किंवा punishment द्या..
खेळाडू जसे आपले मागचे रेकॉर्ड मोडण्या करिता सतत practice करत असतात..तसेच प्रयत्न आपण ही केले पाहिजेत..ती जिद्द निर्माण केली पाहिजे. आणि जर आपण चांगल्या गोष्टी, चांगले विचार आपल्याच क्षमता अजून improve करू शकलो तर स्वतः ला reward द्या..काही ही..मग एखादी गरजेची वस्तू स्वतः करिता घ्या नाही तर छोटे चॉकलेट..
तसेच जर आपण आपल्यात सुधारणा करण्याकरिता कमी पडलो तर मग punishment द्या..जसे एवढ्या वेळ अजून काम करेन पण त्यात perfection कसे चांगले असेल आणि परफॉर्मन्स कसा सुधारता येईल हेच प्रयत्न..
६. स्वतः ला ओळखा..
आपण इतरांच्या विषयीं लगेच आपले मत मांडतो.त्यांच्यातले दोष , उणिवा .पण आपल्यात काय कमी आहे , कुठे सुधारणा करण्याची गरज आहे हेच आपल्याला माहिती नसते.त्यामुळे स्वतः ला prove करताना स्वतः चा अभ्यास करणे गरजेचे आहे ..आणि त्यानुसार बदल , सुधारणा करणे स्वतः ला improve करणे गरजेचे..
जसे भाषा आपण सगळेच बोलतो..आपली मातृभाषा जी बोली भाषा असते..पण लिखाणात , व्याकरणात अनेक वेळा चूक होते ..तेव्हा आपण कुठे चुकतो याचा अभ्यास करून ती improve करतो तसेच आपले विचार, उणिवा , दोष याबाबत ही..राग येत असेल तर त्याचे मूळ शोधून त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे…मागच्या वेळी या गोष्टीवरून राग अनावर झाला होता पण पुढच्यावेळी मागची चूक स्वतः ला ओळखून सुधारली गेली तर ती खरी improvement ना !!!
७. भीती , चिंता यावर मात :-
प्रत्येकाला कसली ना कसली भीती ही असतेच. भीती नसलेला माणूस दुर्मिळच..भीती , चिंता याचे कारण समजून घेवून ती दूर केली की आत्मविश्वास निर्माण होतो आणि हाच आत्मविश्वास आपल्या स्वतः ला improve करण्यास मदत करतो.
८. पौष्टिक आहार :
शरीर सुदृढ राहावे याकरिता जसे पौष्टिक आहार घेतला जातो तसेच मन सुदृढ राहावं याकरिता मनाचा सुदृढ आहार जरुरी असतो जसे motivational videos, webinars, you tube, विवीध ॲप आहेत.किंवा काही कार्यशाळा असतात , पुस्तके वाचन ज्यातून ज्ञान, अनुभव मिळतो तसेच मोठ्या व्यक्तींचा सहवास त्यांचे अनुभव , ज्ञान यातून स्वतः ला improve करता येते..
९. शांती
व्यायाम , योगा , मेडीटेशन यातून शरीर आणि मन दोन्ही ही फ्रेश होते आणि चालना मिळते…त्यातून उत्साह वाढतो आणि विविध गोष्टी improve करण्याकरिता मदत होते.शरीर स्वस्थ तर मन ही स्वस्थ राहू शकते..आणि मन स्थिर असेल , चंचल नसेल तर निर्णय क्षमता वाढते.. सर्वांगीण वैचारिक दृष्टिकोन वाढतो.
या जगात आपण सध्या सगळेच स्वतः ला prove च तर करत असतो..जसे शिक्षण असेल, आर्थिक , कौटुंबिक किंवा सामाजिक स्थैर्य असेल , यात आपले स्वतः च एक स्टेटस निर्माण व्हावे आणि ते टिकविले जावे याकरिता प्रत्येक जण स्वतः मध्ये बदल घडवून आणत असतात..आणि ज्या उणिवा आहेत, कमतरता आहेत त्या भरून काढण्याचा improve करण्याचा प्रयत्न करत असतात..
जसे सध्याची technolgy ..mobile , laptop , यात नवनवीन मॉडेल्स येतात..modifications केली जातात ते तरी काय आहे आधीच्या मॉडेल चा विचार करून अजून त्यात नवीन कोणत्या गोष्टी पाहिजे आहेत याचा विचार करून त्या त्रुटी भरून काढण्याकरिता केलेली सुधारणा म्हणजेच improve केली गेलेली मॉडेल्स च ना ..!!
आपण ही पहिली मध्ये असताना जसे बालिशपणे वागलो , विचार केले , ड्रॉइंग काढले तसेच आता करतो का ?? नाही ना तर आपल्यात पहिली पेक्षा वेळच्यावेळी सुधारणा घडवीत जातो..बदल करत जातो म्हणजेच improve करत असतो स्वतः ला.आणि तसे नाही केले तर आपण आहोत तिथेच थांबू किंवा मागे पडू.. विचार , मानसिकता, निर्णय क्षमता , स्किल, इतरांचे विचार , अनुभव यांची मदत घेवून, या सगळ्या गोष्टीत योग्य ते बदल घडवून improve करा तरच या स्पर्धेच्या युगात कामाच्या ठिकाणी असेल तर तिथे , मैत्री असेल किंवा नाती तुम्ही स्वतः ला prove करू शकाल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



प्रेरणा मिळनारा लेख आहे