Skip to content

स्वतःला जसं आहे तसं मांडलं की श्वास गुदमरत नाही.

स्वतःला जसं आहे तसं मांडलं की श्वास गुदमरत नाही.


संयोगिता महाजन


स्वरा जेमतेम सहा वर्षाची. पाहुण्यांच्या घरी आईबाबासोबत गेलेली.खूप दंगा मस्ती खोड्या सुरू होत्या.पाहुण्यांची ही मुले अगदी लहानच होती.त्यात तोपर्यंत आइस्क्रीम आणलं गेलं.सगळ्या मुलांनी एकच घोळका करून आईस्क्रीम आईस्क्रीम म्हणून ओरडा सुरू केला.स्वराची आई मात्र स्वराला डोळ्यांनी खुणावत होती.

पण स्वरा आपल्याच नादात अन जोशात स्कुप घेऊन चमचा बाजूला ठेवून बोटाने खात होती.स्वराची आई रडवेली होऊन कसनुस हसत पाहुण्यांना सांगत होती. “स्वराला खूप आवडतं हो ,पण बघा ना,आता वेड्यासारखं करतात मुलं.. कधी न खाल्यासारखं…मला तर सुचतच नाही ओ.” यजमानांना नेमकी मेख लक्षात आली.

अन म्हणाल्या स्वराची आई,जस आहे तस मुलांना प्रेजेंट करावं.मुलंच ती….तुम्ही खाऊ शकणार आहे का तस…?????लहान मुलांच्या बाबतीत कधीच मनावर घेऊ नये.जितकं त्यांचं वय तितकं आपल्या घराचं वय..तितकीच आपली जाण.जे आहे तेच पहावं.. त्यात वेगळं सुख शोधावं म्हणजे अस गुदमरल्यासारखे होत नाही.”

किती सोप्प आणि साधं सांगितले.. जस आहे तस स्वीकारा.स्वतः ला पटत नसताना,गरज नसताना का बदला???? जितकं झेपत,तितकं केलं की काम सोप्प होऊन जातं.आपल्या विचारात,आचारात विसंगती जाणवली की समोरचाही दुरावतो अन आपण ही आपल्या नजरेत उतरतो.

विश्वासार्हता गमावून बसतो.जे आहे ते बोलण्यात,करण्यात नेमकेपणा हवा.दुसऱ्याला चांगलं वाटावं,त्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून करण्यापेक्षा मला ,माझ्या मनाला समाधान वाटते म्हणून केलेल्या गोष्टी दीर्घकाळ टिकतात.काही गोष्टी जमत नसताना प्रयत्न करून करणे ठीक आहे पण मला सागळच्या सगळं येत…मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं..इतरांच्या तुलनेत माझं जास्त कौतुक व्हावं या ईर्षे पोटी कित्येक आनंदी क्षणांची आपण माती करतो.

जे ,जस आहे तस वागायचं म्हटलं तर त्रास कमी आपल्यालाच होतो.बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो एटिकेट्सच्या नावाखाली काहिही सुरू असत.मनमोकळ्या गप्पा, रमतगमत चालायला, गाड्यावर पाणीपुरी खायला,टपरीवर चहा प्यायला ही मन असून जायचं होतं नाही..अरे मग खड्यात गेली असली जिंदगी…जी मनासारखे जगायला देत नाही.

खुल के,अन कधी कधी बेफिकीर जगायलाही मनाला परवानगी द्यायला हवी ना…!!!जस पावसात भिजणं, समुद्राच्या रेतीत किल्ला बांधन, ऑफिसला दांडी मारून तिच्यासाठी गजरा घेऊन सरप्राईज देणं,कधी आईला ही मस्त फिरायला घेऊन जाण.. अस बरचं काही हा..!!!मनात खूप असतं हो…कळत ही पण वळतच नाही…मग काय करावे बर या बावळट मनाला….????

त्या मनालाही ठणकावले पाहीजे न….जे जे वाटतं ते ते कर…ज्यात आनंद मिळतो तो हळूच चोरून घे.आयुष्यात कधी कोणतं पान कस येईल ते माहीत थोडंच असतं???म्हणून हळुवारपणे ते क्षण चोरून आनंदाच्या डबीत जपून ठेवता आले पाहिजेत. मग श्वासांना व्हेंटिलेटरवर ठेवायची गरजच नाही.

जे नाहीं ते दाखवण्याची धडपड का.?????ऋण काढून सण साजरे करण्यात काहिच अर्थ नाही.त्यानं केलं मग मलाही हवंच हा अट्टहास ऱ्हासाला कारणीभूत ठरतो.

स्वभावाचे ही तसंच…. ओठांत अन पोटात वेगवेगळे… मग त्याचा त्रास कुणाला. जे आहे ते स्पष्ट मांडावे.,कधी कुणाच्या भावना दुखावल्या जाणार असतील तर हळुवारपणे सांगावे पण स्वतः ची घुसमट करून घेऊ नये.सगळं ओझं आपल्या डोक्यावर घेऊन जग फिरायला जाण्यात काही मज्जा नाही.आणि सगळं मीच करतोय,माझ्याशिवाय काही खरं नाही,यांचं पान ही हलणार नाही हा जो अविर्भाव आहे तोंही बरोबर नाही…..

आर्थिक, सामाजिक, परिस्थितीत राहणीमान आहे ते स्वीकारून त्यामध्ये आपल्या कष्टाने भर घालणे वेगळे अन त्याचा नुसताच दिखावा करून रंगरंगोटी करणे वेगळं.जे दिसतं तस नसतं म्हणून जग फसतं अस म्हणायला वेळ नाही लागत.काही गोष्टींची सवय आपल्या मनाला विचारांना लावणे खूप गरजेचं असतं.

जसा शरीराला व्यायाम आवश्यक तसा मनालाही व्यायाम गरजेचा आहे.त्याला सतत सांगा.. जे आहे, जस आहे तस वाग,स्वतः ला खर प्रेझेंटेशन करण्यात कुठेही कमी पडू नको.स्वतः च्या भावना,गरजा…त्याही फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक,सामाजिक जाणिवांच्या,भावनिक गुत्यांच्या वेळीच ओळखून स्वतः ला मनाच्या कोंडमारीला व्हेंटिलेटरवरून कसे काढता येईल हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे.

किती दिवस असे आपण व्हेंटिलेटरवर जगणार????फक्त दवाखान्यातच व्हेंटिलेटर लागत अस नाही हो…..रोजच्या आयुष्यात ही लागत…. दुःख ,ईर्षा,लोभ,मत्सर या रोगांनी किती भरलेले आहे हे मन…त्याला थोडं खट्याळ, नटखट,हसरे,गोडी गुलाबीचे,प्रेमाचे, वात्सल्य या मानवी स्वभावस्तील ऑक्सिजनचा पुरवठा होणे गरजेचं असतं….

मग कस लाईफ आपोआप खुदकन हसून स्वतःच्या कोशातून बाहेर पडत.कोणा कोणाला आवडेल अस व्हायला…????मला तर खूप आवडतं…. स्वच्छ निरागस जस आहे तसच प्रेझेन्स ठेवायला…. नेहमी श्वासात भरभरून सांगायला की ऑल इज वेल बच्चा….सब ठीक हो जायेगा…..बस खुल के जिले…..👍मग तुम्हाला ही आवडेल ना!!!!

मी जशी मी अशी,मी जसा मी तसा
कळलो मी कुणा कसा अन असा
जे जे असेल ते ते असेल खरेच सारे
नसेल माझ्या अंतरी मुखवट्याचे वारे
असतील माझ्या श्वासात आता खरे चंद्रतारे.

म्हणूनच स्वतःला थोडं श्वासात भरूया अन स्वतःचीच नवी ओळख करून घेऊया…👍


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

5 thoughts on “स्वतःला जसं आहे तसं मांडलं की श्वास गुदमरत नाही.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!