Skip to content

स्वतःला इतरांच्या विचारांनी बांधून ठेऊ नका!!

स्वतःला इतरांच्या विचारांनी बांधून ठेऊ नका!!


प्रत्येक व्यक्ती हि वेगळी आहे. तिचे विचार, भावना, कृती, निर्णय घेण्याची पद्धत, चार-चौघात वागण्याची पद्धत हि कायम इतरांपेक्षा वेगळीच आहे. सूक्ष्म निरीक्षण केले असता, आपल्याला ते पटकन कळेल.

आपल्या सगळ्यांना असाही अनुभव कायम येत राहिलेला आहे कि, एखाद्याची वागण्याची, बोलण्याची, मत व्यक्त करण्याच्या पद्धतीवरून आपण एखाद्याची ओळख बनवतो. त्या व्यक्तीमधले ते गुणधर्म आपल्याला भावलेले असतात, जे इतरांपेक्षा काहीसे निराळेच असतात.

याला आपण उमदं व्यक्तिमत्व म्हणू. जे इतरांना काहीतरी वेगळं पाहण्याची, अनुभवण्याची संधी देते. अशा व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिगत समस्येमध्ये फार काळ अडकून राहत नाहीत. ते लगेचच स्वतःला निसटून पुढे सरकतात.

असं जरी असलं तरी हे उमदं व्यक्तिमत्व कोणाच्यातरी प्रेशरमध्ये असतंच. जसं कि, वडीलधारे माणसं असतील, शिक्षक असेल, नोकरीतील वरिष्ठ कर्मचारी असतील अशा वातावरणातूनही व्यक्तिमत्व उमदं ठेवणं आवश्यक असतं. जर अशा २-३ वातावरणाच्या आपण खूपच आहारी गेलो तर आकर्षणाच्या नियमानुसार आपल्यासमोर सतत तशाच व्यक्ती आणि प्रसंग येत राहतील. आणि हे वर्तुळ सुरूच राहतं.

आज या लेखात आपण अशाच व्यक्तींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी स्वतःला इतरांच्या विचारांनी बांधून ठेवलंय. कधीतरी स्वतःचे असे ठराविक विचार बाळगणाऱ्या व्यक्ती अशा अचानकच स्वतःला इतरांना जणू आंदनच देऊन टाकतात.

स्वतःचे असे काही विचार या व्यक्तींमध्ये उरलेलेच नसतात. व्यक्तिगत आयुष्यातले निर्णय सुद्धा ते इतरांना विचारून करतात. निर्णय घेण्याची अशांना प्रचंड भीती वाटत असते आणि त्यामागे लोकं आपल्याबद्दल काहीही विचार करतील, माझा निर्णय चुकला तर म्हणून त्यापेक्षा ते इतरांचं जास्त ऐकताना दिसतात.

इतरांसाठी या व्यक्तीसुद्धा केवळ सांग कामेच असतात. केवळ अशा व्यक्तींकडून कामे करून घेणे, कोणत्याही महत्वाच्या प्रसंगात त्यांना सहभागी करून न घेणे. यामुळे त्या व्यक्ती पूर्णतः दुखावलेले असतात. तरीही ते कोणालाही दुखवताना दिसत नाहीत. अत्यंत कमालीची नम्रता या व्यक्तिंमध्ये आढळून येते.

या चौकोनातून बाहेर पाडण्यासाठी काही टिप्स पाहूया..

१) आपल्यात सुद्धा एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आधी हे ओळखून त्याचा स्वीकार करा. त्यामुळे कोणाचेही विचार जेव्हा स्वतःवर लादण्याची वेळ येईल त्यावेळी नक्कीच तुम्ही प्रतिकार करू शकाल.

२) तुमच्यातील अशी गुणवैशिष्ट्ये शोधा जी इतरांपेक्षा वेगळी आहेत. ती गुणवैशिष्ये विकसित करण्यासाठी त्यावर काम करण्यासाठी स्वतःचा एक वेळ शोधून ठेवा. म्हणजे त्यावेळेत तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही.

३) ज्या-त्या क्षणी तुमचे विचार, तुमची बाजू, तुमचं मत मांडण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सवयीनुसार सुरुवातीला तुम्हाला गृहीत धरले जाईल पण हळूहळू तुम्ही तुमचं मत मांडण्याचा प्रयत्न कराल तर काही ठिकाणी तुमची स्पेस स्वतः निर्माण होईल.

४) तुमच्याबद्दल इतरांनी एक लेबलंच चिटकवलेला असतो. त्यामुळे तुम्हाला तशीच वागणूक मिळत असते. त्यामुळे तुमची पहिली स्टेप हीच आहे कि त्या-त्या व्यक्तींबद्दल तुम्हाला मन मोकळेपणाने बोलायचे आहे.

५) तुम्हाला आवड असणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही बोलले पाहिजेत. अवतीभवती नेमकं काय घडतंय याचा कानोसा घ्यायला हवा. जेणेकरून तुम्हाला संबंधित विषयावर आधीच माहिती असल्याने तुम्हाला बोलावेसे वाटेल.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “स्वतःला इतरांच्या विचारांनी बांधून ठेऊ नका!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!