Skip to content

स्वतःपेक्षा चांगला सोबती कोणीच नाही….!!!

स्वतःपेक्षा चांगला सोबती कोणीचं नाही….!!!


मयुरी महाजन


आपल्या सर्वांना जेव्हापासून आपला जन्म होतो अगदी त्याहूनही जेव्हा आपण आपल्या आईच्या गर्भात होतो तेव्हा आपल्यासोबत आपली आई असते जन्म झाल्यापासून ते समज येईपर्यंत प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला कुणाची तरी सोबत असावी, कोणाचा तरी आधार शोधण्यात आपण सर्वच अवलंबून असतो… माणूस समाजशील प्राणी आहे समाजात राहणे माणसांच्या ठोळक्यात राहणे ही माणसाची एक खुप जुनी गरज आहे…

कुणाचा तरी हात पाठीशी असावा, असे वाटणे खरे तर चुकीचे नाही कारण ती मानवी स्वभावाची प्रेरणा आहे ,परंतु प्रत्येक वेळेस आपण जर आधार शोधत असाल तर मात्र अवलंबून राहण्याची सवय वाढीला लागते, आपल्या आईवडिलांनी आपल्याला बोट धरून चालायला शिकवले परंतु कुठपर्यंत जोपर्यंत आपल्याला चालायला जमत नाही तोपर्यंत ना!! नंतर त्यांनी शिक्षणासाठी म्हणा किंवा इतर आपल्याला एकटे सोडून आपली भरारी आपणच घ्यावी यासाठी पंखात बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं याप्रमाणे….

कुठेतरी आपल्या माणसांमध्ये आपला जीव गुंतलेला असतो, कोणीतरी सोडून गेल्यावर नको नको वाटते जगण स्वतः पेक्षा चांगला सोबत कोणीच नाही जेव्हा कोणी नसते तेव्हा आपणच आपल्या सोबत असतो, आपल्या प्रत्येक सुखदुःखाचे वाटेकरी आपण स्वतः असतो, कधीकधी आपली सोबत आपल्याला खूप काही शिकवते काहीही करत असताना सोबत नेहमी एक विश्वास जागवते, आपणच आपल्या सोबत असलो ना मग आपल्याला काय फरक पडत नाही कोण आपल्या सोबतीला आहे किंवा नाही..

सोबतीला घेतलेला हा जेव्हा न सांगता सुटून जातात तेव्हा होणारे दुःख शब्दांच्या पलीकडचे असते दुःख असते, राग असतो, दुखावलेल्या भावना मांडण्यासाठी शब्द नसतात परंतु सोबती म्हणून स्वतःचं स्वतःला दिलेली पुढे पाऊल टाकण्याची एक पायरी असते ,आपण सर्वांनी श्रीकृष्ण यांचा जर जीवनसार बघितला तर आपल्या लक्षात येईल लहानपणी आई सुटली नंतर वडील, नंतर गोकुळ सुटले नंतर मित्रपरिवार आणि ज्या राधेवर प्रेम केले ती प्रेयसी सुद्धा प्रत्येक टप्प्यावरती काही ना काही सुटत गेले तरी सुद्धा त्यांच्या आयुष्यात त्यांनी स्वतःवर असलेली निष्ठा आणि प्रेम कधीच कमी होऊ दिले नाही कारण त्यांना माहिती होते स्वतः पेक्षा चांगला सोबती कोणीच नाही…

अर्जुनाला युद्धाच्या प्रसंगी श्रीकृष्ण सांगतात तू स्वतः स्वतःला परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज करू शकतो परिस्थिती विपरित जरूर आहे परंतु न लढता पळून जाण्यापेक्षा युद्धात आलेले मरण पत्करणे कधीही चांगले परंतु न लढता स्वतःला कमजोर समाजाची भूल करणे म्हणजे मरणापेक्षा बेहत्तर असेल …नात्यांचे जाळे असो वा आपल्यांनीचं आपल्यासाठी आखलेली लक्ष्मण रेखा असो या सर्वांच्या मध्ये आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार आहोत कोणी किंमत देवो ना देवो परंतु आपणच आपली किंमत केली पाहिजे जेव्हा आपणच आपली किंमत जाणार नाही तर दुसऱ्यांकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे ,

कोणी आपल्याला आपली कितीही वाट चुकवण्याचा प्रयत्न केला ,तरी आपल्याला आपली सोबत नेहमीच वाटत होत असते आणि तीच वाट आपल्याला आपल्या योग्य दिशेने घेऊन जात असते आपण आपल्या सोबत असलो की बाकीच्यांची साथ पण आपल्याला मिळत जाते कोणी कितीही चांगले असले तरी कुणाची सोबत कधी दगा देईल सांगता येत नाही, त्यापेक्षा आपणच आपली सोबत करावी आणि निघावे आपल्या वाटेने कारण स्वतः पेक्षा चांगला सोबती कोणीच नाही कारण प्रत्येक सुखाचे वाटेकरी जसे आपण तसेच आपल्या दुःखाचे वाटेकरी सुद्धा आपणच असतो

जेव्हा चार जण नावेतून जात असतात तेव्हा त्यांना विसर पडलेला असतो ते बाकीच्यां ना तीन जण मोजत असतात परंतु स्वतःचा मात्र त्यांना विसर पडलेला असतो आणि प्रत्येकाने तीन जण आहोत असेच काऊंड करतात परंतु आपण स्वतः सुद्धा यामध्ये आहोत यावर लक्ष राहत नाही आपल्या सर्वांची सुद्धा अशीच परिस्थिती होते आपण बाकी सर्वांना तर गृहीत धरतो, मात्र त्यात आपण सुद्धा होते मात्र विसरून जातो त्यामुळे आपण आपल्या सोबत राहूया आणि त्याची चांगली सोबत करूया.. कारण आपल्या स्वतः पेक्षा चांगला सोबती कुणीच नाही….!!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!