Skip to content

स्वतःजवळ रडून दुःख, पच्छाताप, टेन्शन या भावनांना मोकळं करा.

स्वतःजवळ रडून दुःख, पच्छाताप, टेन्शन या भावनांना मोकळं करा.


सौ. मयुरी महेंद्र महाजन


आपण सर्वजण जेव्हा माणूस म्हणून जन्माला आलो ,तेव्हा रडतचं आलो, बघा जन्म रडतांना झाला, मृत्यू रडवतांना म्हणजे रडण्याची गोष्ट साधी जरी वाटत असली, तरी त्यामागे खूप काही दडलेले असते ….मित्रहो वयाच्या प्रत्येक टप्प्यावर जेव्हा आपण पुढे जात असतो तेव्हा तेव्हा आपल्याला जाणीव होते ती आपल्या भावनांची बघा लहान असतांना रडणे आपल्याबद्दल चे संदेश पोहचवतात …त्यात बाळाला भूक लागली असेल… काही दुखत…. इत्यादी.

बालपणी रडणे हे मानवाचे जन्माला आल्यावर कॉमन समजले जाते… परंतु बालपण जेव्हा तरुणपणात येते… तेव्हा आपण समजदार झालो असे समजले जाते कारण दुसऱ्यांच्या भावना स्वतःच्या भावनांच्या बाबतीत व्यक्ती बऱ्यापैकी समजायला लागतो आणि त्या भावनांसोबत जगत राहतो …

असं म्हणतात की माणसापेक्षा त्याच्या भावना जास्त बोलक्या असतात.., माणसाने प्रगतीच्या कितीही वाटा तुडवल्या तरी भावना दुखावल्यावर होणाऱ्या त्रासाची भरपाई करणे सोपे नसते..,. कधीकधी खूप भरून आलेलं असतं अगदी अश्रूंचा बांध फुटावा आणि सर्व वाहून जावे इतपत …..त्या वेळेस खूप रडावेसे वाटते आणि त्याचे कारण सुद्धा कुणाला सांगू शकत नाही…..

अशी आपली परिस्थिती होते भरून आलेले मन मोकळे करण्यासाठी तशी जागा आणि हक्काचा खांदा कधी गवसत नाही…. आपल्याच खांद्यावर डोके ठेवून रडता येत नाही आणि दुःखाचे कारण कुणाला सांगता येत नाही पण आपण आणि आपला एकांत नेहमी खरे मित्र असतात ….आपल्या एकांतात जितके रडावसं वाटत आहे तिथे रडून घ्यावे… कारण सांगता न येण्याची दोन कारणे आपल्याला आपल्या इतके कोणी समजून घेऊ शकत नाही….

त्यामुळे आपले असणारे दुःख आणि त्यामुळे होणारा त्रास आपल्यालाच माहिती असतो… त्यामुळे आपण सांगितलेली कारणे याबद्दल आपल्या मनामध्ये नेहमी एक अनामिक भीती असते आणि निवड फक्त या भीतीपोटी आपण आपल्या रडण्याची कारणे कुणाला सांगू शकत नाही ….

कधी कधी आपल्याला आपल्या चांगुलपणाची इतकी शिक्षा भेटलेली असते की नंतर कुणाला काही सांगावस वाटणं ही ईच्छाचं …मरून जाते ..,,.मनातून तर खुप रडावसं वाटत असते परंतु चेहरा मात्र हसरा दाखवून जगण्याची वाट शोधावी लागते ..,,,परंतु जी तुमची जवळची माणसे आहेत जी तुम्हाला जवळून जाणतात… त्यांना तुमचे भाव कळतात …तुमचा चेहरा दर्शवतो तुम्ही खरच हसत आहे की त्यामध्ये स्वतःचे दुःख लपवत आहात…

तुम्हीचं तुमचे खरे आणि सर्वात जवळची व्यक्ती आहात… खूप रडावेसे वाटते ना रडून घ्यावे स्वतःसोबत स्वतःच्या भावनांसोबत आणि रडून मोकळे व्हावे… स्वतःजवळ जरं रडावेसे वाटतं आहे आणि त्याचे कारण कोणाला सांगू शकत नसालं…. तर स्वतः जवळ रडणे हे तुमच्यासाठी एक तुमची ताकद ठरू शकते… कारण रडून मोकळे न झाल्याने ,तुमचा त्रास तुमच्या आत मध्ये तुम्हाला हळू हळू पोखरु लागेल आणि जर हि गोष्ट सातत्याने होऊ लागली तर त्याचे रूपांतर विकृतीमध्ये सुद्धा होऊ शकते ….

कारण की काही गोष्टी दिसताना जरी छोट्या वाटत असल्या, तरी त्या गोष्टी जर एक एक करून साचत गेल्या तर मात्र त्या दमन अवस्थेत बसून त्याची असलेली स्पेस भरू लागतात…. आणि एखाद्या भांड्याची स्पेस जर एक बॉटल पाण्याची असेल आणि आपण मात्र त्यामध्ये दोन बॉटल इतके पाणी टाकणार असू तर ते ओव्हर फ्लो होईल.

तसेच माणसाच्या दमन प्रक्रियेची सुद्धा ठराविक स्पेस असते ,हे प्रत्येक व्यक्तीनुसार कमी जास्त असू शकते… ती जर ओव्हरफ्लो व्हायला लागली तर मग त्या व्यक्तीच्या वर्तणुकीतून बऱ्याच गोष्टी दिसू लागतात …..गोष्टी हाताबाहेर जाऊन त्यावर उपचार करण्यापेक्षा आपण जर वेळीचं ते खाली करत गेलो ….तर त्यामध्ये आपण वेळोवेळी भर सुद्धा टाकतचं असतो ….

त्यामुळे रडावेसे वाटत आहे आणि त्याचे कारण कोणाला सांगू शकत नाही तर नक्की…….. स्वतःला सांगा …..कारण रडून मोकळे झाल्यावर माणसाला जगण्याची नवी उर्मी मिळते …आपल्या जगण्याला आपण नक्कीच नवी उर्मी दिली पाहिजे..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!