Skip to content

स्वतःच्या मनाची जेव्हा समजूत काढता, तेव्हा कारण वास्तव असू द्या.

स्वतःच्या मनाची जेव्हा समजूत काढता, तेव्हा कारण वास्तव असू द्या.


सोनाली जे


आपण अनेक वेळा स्वतच्या मनाची समजूत काढत असतो. लहान असताना या गोष्टी माहीत नसतात. अनुभव नसतात त्यामुळे तेव्हा मन खरेच खूप निरागस असते. एखादी गोष्ट आपल्या हातून चुकून घडली ,. तुटले फुटले तर आपण प्रामाणिकपणे सांगत असतो की माझ्याकडून असे घडले. पण जेव्हा असे हळूहळू अजून मोठ्या गोष्टी घडू लागतात आणि वेगवेगळे अनुभव येवू लागतात , तेव्हा मग आपणच आपल्या आणि इतरांच्या मनाचे समर्थन आपल्याला सोयीस्कर असेल त्या पद्धतीने करण्यास सुरुवात करतो.

पण आयुष्यात कायम लक्षात ठेवा स्वतःच्या मनाची जेव्हा समजूत काढता , तेव्हा कारण वास्तव असू द्या. तर उगीचच अवास्तव गोष्टी , किंवा कल्पना करू नका.

अपरिहार्यपणे ज्या भावनेचा सामना करायला लागतो त्याचे नाव दुःख (Pain). शरीरातला पाय मुरगळला किंवा जवळच्या व्यक्तीच्या वागण्यामुळे मनाचा अपमान झाला तर दुःख होते. ह्या दुःखाबद्दलच्या अनेक भावना मनात दाटून येतात. आता पुढे काय होणार ही असते भीती. ह्या सेटबॅकमुळे माझी लय गेली ह्याचे नैराश्य. ज्याच्या ‘मुळे’ हे घडले त्याबद्दलचा संताप. ह्या संतापाचे तीन पदर. स्वतःची चूक, दुसऱ्यांचे योगदान आणि परिस्थितीतील त्रासदायक घटक . . . ह्या सर्वांवरचा संताप. स्वतःच्या चुकीबद्दल स्वतःलाच गुन्हेगार मानणारी खंत . . . ह्या सार्‍यातून तयार होते ती वेदना (Suffering).

पण असे जेव्हा घडते तेव्हा आपण केवळ दुसऱ्या व्यक्तीला दोष देत असतो. आपण संतप्त होतो , वेदना होते याचे कारण काय तर आपल्यात ते सहन करण्याची क्षमता नसते .. आणि आपण नकारात्मक प्रतिसाद देतो. जी गोष्ट आपण कंट्रोल करू शकत नाही तो असतो संताप. पण आपण हे वास्तव कारण देत नाही.

तर जी परिस्थिती आपल्या हातात नाही, जी व्यक्ती आपल्या मनासारखे वागत नाही , आपल्याला अपेक्षा एक असते आणि तसे वागत नाही. तेव्हा आपली चूक , आपली अपेक्षा , आपली वर्तणूक याकडे बघत नाही परंतु समोरच्याच वर्तन आपल्या इच्छे , आपेक्षे प्रमाणे नाही म्हणून त्याला दोष देतो. पण वास्तवात कारण तुम्ही स्वतः आहात. हे आत्मपरीक्षण करा.

अगदी परवाचेच उदाहरण आमच्या ऑफिस मधला ऑफिस बॉय. सहज गप्पा मारत होतो. म्हणले उमेश आधी कोणत्या ऑफिस मध्ये होतास. त्याने सांगितले आर्किटेक्ट होते त्यांच ऑफिस.

मी : उमेश टायमिंग काय होते ऑफिस.

उमेश : सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पण कधीच सात वाजता जात नव्हतो . नेहमी ऑफिस मध्ये ८.३० व्हायचे.

मी : अच्छा म्हणून ऑफिस सोडले का ते.

उमेश : नाही . एकदा ऑफिस चे थोडे काम सुरू होते. वरच्या मजल्यावरून सामान खाली आणायचे होते. नेमकी जेवायची सुट्टी . सकाळी ९ ला पोहचायचे म्हणजे घरातून ८.३० वाजता निघायचो. जेवायच्या वेळी खूप भूक लागलेली असायची. जो काम करणारा carpenter होता त्याच्या माणसाला म्हणले तुला हे सगळे सामान लिफ्ट मध्ये ठेवायला मदत करतो आणि जेवायला जातो. तो बरं म्हणाला. मग सगळे सामान ठेवलें. आणि जेवायला गेलो. जेवून आलो तर साहेब माझ्यावर भडकलेले . मला समजेना मी काय केले.

साहेब : उमेश लिफ्ट तुझ्यामुळे बंद पडली तू काय केलेस. तुला समजत नाही का कशी वापरायची .आता नुकसान माझे झाले.

उमेश : साहेब मी कोणत्याच बटणाला हात ही लावला नाही. मी फक्त सामान जेवढे सांगितले तेवढे ठेवले आणि जेवायला गेलो.

साहेब काही केले तरी हे पटवून घेईनात. त्यांना सांगून ही उपयोग नाही. चिडले. तूच लिफ्ट खराब केलीस हेच धरून. तो carpenter राहिला बाजूला. त्याला काय झाले नक्की हे पण विचारले नाही.

शेवटी एव्हढे चिडले होते साहेब काही ही बोलत होते आणि म्हणले येवू नको कामाला असे नुकसान करायचे असेल तर. उमेश काही बोलल नाही आणि मी पगार ही घ्यायला गेलो नाही म्हणाला .पण त्यांना काही फरक पडला नाही.

आता इथे साहेबांनी त्यांच्या स्वतच्या मनाची समजूत करून घेतली की , लिफ्ट खराब झाली आणि याला कारण उमेश च आहे. आणि भले ती लिफ्ट म्हणजे मशीन आहे .कधी तरी खराब होणार च. मेन्टेन करावी लागणार , carpenter ने जास्त वजन भरले का ? असे कोणतेही विचार केले नाहीत. किंवा जे वास्तव आहे तिकडे दुर्लक्ष केले. आणि काही काल्पनिक किंवा अवास्तव गोष्टी च खऱ्या असे गृहीत धरून कारणे ही तशीच दिली.

स्वतःच्या मनाची जेव्हा समजूत काढता , तेव्हा कारण वास्तव असू द्या. तो असा वागला माझ्याशी , त्याने दुर्लक्ष केले माझ्याकडे , मला बघितले च नाहीं . मुलीच्या लग्नात खूप गर्दीत शेजारचे आले होते पण नंतर समजले ते नाराज झाले कारण काय तर मी लग्नात त्यांच्याशी बोललो नाही. बघितले नाही त्यांना. एवढ्या गर्दीत त्यांच्याकडे माझे लक्ष गेले नाही. जे समोर येवून बोलत होते त्यांच्या समवेत मी बोललो ही .पण एवढी गडबड सुरू होती की खरेच माझे ते जिथे बसले होते तिथे लक्ष गेले नाही.

मात्र शेजारी हीच गोष्ट किंवा कल्पना करून बसले की मी जाणूनबुजून दुर्लक्ष केले. खरे तर शेजाऱ्यांना ही वास्तव स्थिती , कारण माहिती आहे .त्यांनी लग्नातली गर्दी ही बघितली पण मी चुकलो , माझे दुर्लक्ष झाले याच गोष्टीवर अडून बसले ते.

जेव्हा तुम्ही वास्तवता बघायला शिकता. त्यांच्या भूमिकेत तुम्हाला ठेवून बघायला शिकता तेव्हा तुम्हाला जाणीव होवू लागते. आणि मग तुम्ही अवास्तव कारणे पुढे करणे बंद करता.

Dr आनंद नाडकर्णी यांनी खूप छान व्यक्त केले आहे. हळूहळू ओळखीच्या आणि अनोळखी अशा अनेकांच्या वेदनेला आपल्या मनात जागा द्या आणि तुमचा सद्भाव तुमच्या मनाने वाटत जा . . . विस्तारत जा . . . असे तुम्ही करत राहिलात तर ज्ञानेश्वरांचा विश्वभाव तुमच्या अनुभवाला येईल.

दुःख आणि वेदनेचे वैयक्तिक भाग तुटत जातील आणि सद्भावना आणि आस्थेचा विस्तार हळूहळू पर्यावरणापर्यंत पोहोचेल. आधी आणि नंतर ज्ञानोबांचे पसायदान मनातल्या मनात म्हणायचे. काय छान वाटते म्हणून सांगू . . . एकदा नाही अनेकदा करुन पाहा . . . सवय लागेपर्यंत ! . . . पसायदानाच्या शेवटच्या शब्दांचा अनुभव मला ह्या ‘कॉम्बो’मधून आला . . . सुखिया जाला ! सुखिया जाला ! . . . सुखिया जाला ! . . .

हे सांगायचे कारण काय चुकून आपला cup फुटला तर शेजारी जो होता त्याला आपण दोष देतो . तुझ्याकडे लक्ष होते म्हणून असे झाले. दोन मित्र एकत्र डॉक्टर कडे जातात. पहिला मित्र दुसऱ्याला म्हणतो अरे आपण चाललो आहे पण डॉक्टर असतील ना ? भेटतील ना ? दुसरा मित्र असतील रे.

आणि जेव्हा तिथे पोहचल्यावर समजते डॉक्टर नाहीत .तेव्हा दुसरा मित्र पहिल्या मित्राला दोष देतो की तू म्हणालास , तुझ्या मनात असे विचार आले म्हणून असे झाले. याउलट दुसऱ्या मित्राने वास्तव कारण बघितले असते की डॉक्टर urgency होती म्हणून गेले . तर त्याला आपल्याच मित्रावर कुरघोडी करावी लागली नसती. वास्तव कारण राहिले बाजूला मित्राने अशी शंका घेतली म्हणून असे झाले असे अवास्तव कारण दुसरा मित्र देवून रिकामा.

म्हणूनच स्वतःच्या मनाची जेव्हा समजूत काढता , तेव्हा कारण वास्तव असू द्या. खोटी समजूत काढण्यापेक्षा सत्य आणि वास्तव असू द्या.

आयुष्य सुंदर आहे .. आपल्या मनाची समजूत काढताना आपण आपल्यातले दोष लपवीत नाही ना ते बघा. आणि असे असेल तर वेळीच वास्तव कारणे देवून मनाचं समाधान करा. रस्ता चुकलो तर मान्य करा. नाही मागच्यावेळी इकडून गेलो होतो असे वाटते. हे असे समर्थन देवू नका. मला वाटले , असेल इकडे रस्ता ..असेही समर्थन नको. शंका आहे तिथे खात्री करा. Google आहे , आजू बाजूचे लोक त्यांना विचारा. वास्तवात काय आहे ते बघा आणि निर्णय घ्या. उगीच अवास्तव कारणे नंतर देवू नका.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!