Skip to content

स्वतःच्या नुकसानाला दुसर्‍यांना दोषी ठरविणे,म्हणजे पळपुटेपणा…!!!

स्वतःच्या नुकसानाला दुसर्‍यांना दोषी ठरविणे,म्हणजे पळपुटेपणा…!!!


मयुरी महेंद्र महाजन

पुणे.


जगाच्या बाजारात प्रत्येक जण फायद्याचाचं विचार करून चालतो, म्हणून नुकसान येत नाही, असे होते का ???कधी तरी नुकसानाशी सुद्धा आपला सामना होतोचं, आणि तो गरजेचा सुद्धा असतो, कारण त्यातून आपल्याला पुढे जाण्याचे धडे मिळतात, व्यवसाय असो, उद्योग असो, आपली छोटीशी किंवा मोठी नोकरी असो ,व्यवसायाचा विचार केला तर जेव्हा व्यक्ती त्या गोष्टीची सुरुवात करतो, तेव्हा अनेक गोष्टींची त्यासाठी जुळवाजुळव करावी लागते,

तेव्हा कुठे जाऊन त्या व्यवसायाची खऱ्या अर्थाने सुरुवात होते, आणि व्यवसाय भरभराटीला येतो, तेव्हा सर्वस्वी कितीतरी अडचणींचा सामना करून इथपर्यंतच्या त्या प्रवासाचे चीज होते, तेव्हा साहजिकच आपल्या होणाऱ्या फायद्याचे सूत्रधार आपण स्वतः असतो, आणि त्याचे सर्व क्रेडिट आपल्या मेहनतीने कमावण्याचा आनंदही असतो…

आयुष्याच्या प्रवासात जसे चढ-उतार आहेत, तसेच आपला फायदा किंवा नुकसान हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ,परंतु बऱ्याचदा असे बघायला मिळते, की माणूस हा असा प्राणी आहे, जो नेहमीच एक संरक्षण यंत्रणेचा वापर करत असतो, ज्यामध्ये स्वतःच्या चुका लपवण्यासाठी व्यक्ती संरक्षण यंत्रणेचा वापर करताना दिसते, मानसशास्त्र सांगतं की ,प्रत्येक व्यक्तीमध्ये संरक्षण यंत्रणा ही जन्मतःचं असते, जसे की लहान मुलाचे उदाहरण घेतले, तर जेव्हा दोघे भाऊ एकत्र खेळत असतीलं, तर त्यांना खेळतांना जरं काही वस्तू फुटली किंवा तुटली तर चूक आपली असूनसुद्धा संरक्षण यंत्रणेचा वापर करून, मी नाही याने केले, असे आपल्याला बघायला मिळते ,

याचे सर्वस्वी कारण हेच की आपण आपल्या नुकसानाला जबाबदार असतो, हेच आपण कधी मान्य करत नाही, जे काही चांगले होते ते फक्त माझ्यामुळे आणि जे काही चुकीचे, वाईट झाले ते फक्त दुसर्‍यांमुळे अशी धारणा माणसाला कधीच आयुष्यात पुढे जाऊ देत नाही, स्वतःवर घेता येत नाही, म्हणून दुसऱ्या वरती लोटायचं, यामध्ये आपली एॅनर्जी फुकट वाया जात असते, याऐवजी आपण जे काही काम करतोय, त्यात एॅनर्जी घालवली तर त्यात अजून प्रगल्भता लागेलं…..

आपल्या सर्वांच्या आजूबाजूला आपण अशी माणसे नक्कीच बघितली असतीलचं, जी की प्रत्येक वेळेस, याच्यामुळे माझे असे झाले, त्याच्यामुळे मला पुढे जाता आले नाही, माझ्या जीवनाच्या प्रवासात मी अजून खूप काही करू शकलो असतो, पण यांच्यामुळे जाता आले नाही, त्यांच्यामुळे असे झाले नाही…. अशीच बरीच कारणे जी व्यक्ती दुसऱ्यांना सतत आपल्या नुकसानाला जबाबदार आहे, असं म्हणून घोषित करते ,परंतु स्वतःच्या नुकसानाला दुसऱ्यांना दोषी ठरवणे म्हणजे केवळ पळपुटेपणा….

याचा अर्थ जर आपण समजून घेतला तर आपल्या लक्षात येईल, की ज्या गोष्टीपासून पण काढायचा आहे, आपली सुटका करायची आहे, परंतु ती करता येत नाही, म्हणून कुणावर तरी लोटून देऊन मोकळं व्हावं इतकचं….

व्यवसाय करणाऱ्या ला जेव्हा फायदा होतो ,तेव्हा त्या फायद्याचे क्रेडिट सहाजिकच तो स्वतःलाच देतो ,कारण त्यासाठी किती जणांनी जरी मदत केलेली असली, तरी त्याने त्यावरती मेहनत घेतली ,काम केले त्यामुळेच त्याचा फायदा झाला , ना ….तसेच जेव्हा त्याच्या व्यवसायात त्याला नुकसानाचा सामना करावा लागला तेव्हा त्याचा दोष इतरांच्या माथी मारून कसे चालेलं… फायद्याच्या वेळेस आपण तो वाटू शकत नाही, तर नुकसानाच्या वेळेस ते वाटून त्याचा दोष दुसऱ्यांना का म्हणून द्यावा,

यासाठी एक गोष्ट जरुरी आहे, ती म्हणजे स्वतःला स्वीकारणे, तेसुद्धा गुण आणि दोष यांच्यासकट कारण परफेक्ट असं कुणीच आणि कधीच नसतं, आपल्यातही कमतरता आहेत, उणीवा आहेत, पण त्यांचा बाऊ न करता त्यांचा स्वीकार करायला शिकले पाहिजे, जसे की टाळी एका हाताने वाजत नाही, अगदी तसेच जर दोष समोरच्याचा असेलं, तर काही दोष त्यात आपलाही आहेचं, जर आपण स्वतःला आपल्या गुणदोषांसकट स्वीकारु शकत नाही, तर इतरांनी आपल्याला असेचं स्वीकारावे, अशी अपेक्षा तरी आपण का म्हणून करावी,…

जेव्हा ही कुठल्या गोष्टीचा दोष इतरांना दिला जातो, तेव्हा ते एक बोट त्यांच्याकडे असले तरी बाकीची चार बोटे मात्र आपल्या स्वतःकडे असतात, याचा मात्र विसर पडतो, त्यामुळे आपल्या फायद्याची जबाबदारी जशी सर्वस्वी आपली असते ना, अगदी तसेच आपल्या नुकसानाची सुद्धा जबाबदारी घ्यायची शिकायला हवे, तरच आपण आपल्या चुकांमधून शिकून एक एक पावलांनी पुढे जाऊ शकतो, कार्य कुठलेही असो, नुकसान झाले म्हणून न थांबता नव्या पद्धतीने त्याला आकार कसा देता येईलं, यामध्ये आपली शक्ती खर्ची घातली तर निश्चित आपल्या वाटेचे वाटसरु आपण स्वतःचं होऊ शकतो….!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!