Skip to content

स्वतःचा तणाव इतरांना देण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही.

स्वतःचा तणाव इतरांना देण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही.


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


तणाव म्हणजे आपल्या आयुष्याचा जणू एक अविभाज्य भागच बनलाय.पण खूप कमीजणं या तणावातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. बाकी इतर अनेक जणं मात्र या तणावाखाली अक्षरशः दडपून जाताना दिसतात. या तणावात माणसाला खरं तर काही सुचत नाही आणि माणूस या तणावाखाली अनेकदा खूप चुकीच्या गोष्टी करताना आढळतो.

असा हा तणाव हा मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचा असतो.दिवसभरात अधिक प्रमाणात श्रम केल्यानंतर शरिरावर येणारा ताणतणाव वेगळा आणि मानसिक तणाव वेगळा असतो. हल्ली तर माणसाला कोणत्याही गोष्टीमुळे तणाव येतो.आणि या तणावामुळे इतर लोकही काळजीत पडतात.त्यामुळे तणाव हा नकोनकोसाच वाटतो.

“काही कळेना , किती आणि काय आणावं… कसं सांगायच आता वाढत चाललाय हा ताणतणाव….” असचं होतं न…? तणावं….हल्लीच्या आयुष्यात झपाट्याने वाढत असणारी ही गोष्ट म्हणजे एक चिंताजनक बाब आहे. आयुष्य म्हंटल्यावर संकटं , वेगवेगळे वाईट प्रसंग हे येतात.आणि यामुळेच आपल्या आयुष्यातील तणाव हा दिवसागणिक वाढत जातो.मला सांगा , आयुष्यात ताणतणाव हा कुणाला नसतो…?

इथे असणाऱ्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा ताण हा असतोच.कुणी तो लपवायचा प्रयत्न करतो तर कुणी तो इतरांशी शेअर करतो.इतकच नाही तर कुणी स्वतःचा तणाव हा इतरांना देण्याचा प्रयत्न करतो. पण मला सांगा असा स्वतःचा तणाव इतरांना देणं कितपत योग्य आहे…? मुळातच आपण आपला तणाव इतरांना देणं हे फार चुकीच आहे.

आणि आपल्याला तसा कोणता अधिकारही नाहीये. मान्य आहे की अनेकदा आपल्या आयुष्यात येणाऱ्या ताणतणावांच कारण म्हणजे आपल्याच आयुष्यातील लोकं असतात. त्यांच्यामुळे जी परिस्थिती ओढवते त्या परिस्थीतीमुळे आपण तणावाखाली येतो.पण मग तणावाच कारण जरी ईतर लोक असले तरी तो तणाव इतरांना देण्याचा आपल्याला काहीही एक अधिकार नाही.

तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट माहीत असेलच “वड्याच तेल वांग्यावर” काढणे. अर्थातच आपण एकाचा राग दुसऱ्या व्यक्तीवर काढतो.खरं तर हे खूप चुकीच आहे.समजून घेणारी एखादी व्यक्ती असेल तर ठीक आहे नाहीतर परिस्थिती अजूनच गुंतागुंतीची होत जाते.या ताणतणावाचही असच आहे. आपला तणाव आपण इतरांना दिला तर त्याचे परिणाम चांगले होत नाहीत हे सगळ्यांना समजायला हवं.त्याचे “Drawbacks” काय असतात नी काय नाही हे सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. आपल्याला त्रास होतो तसच इतरांना त्रास होतो हे लक्षात ठेवायला हवं.

अहो ,अगदी बेसिक आहे. आपण इतरांना आपला तणाव दिला तर तणाव कमी होणार नाही. तो अजूनच वाढत जाईन. कारण इतरांना आपण असा तणाव देऊन स्वतःचाच तणाव वाढवत असतो.आणि आपला तणाव इतरांना देऊन आपला तणाव खरच कमी होणार आहे का… ? असं होत असतं तर तणाव शेअरही केला गेला असता.तुझ्यामुळे झालय न सगळं मग हा सगळा तणाव तुझाच…पण असं काही नसतं ओ…

तणाव हा तणाव असतो.आणि आपला तणाव हा आपल्यालाच कमी करायचा असतो.त्यातून बाहेर येण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायचे असतात. तेव्हा कुठे तो तणाव कमी होतो नाहीतर असा आपल्याला तणाव आहे म्हणून तो वेगवेगळ्या मार्गाने इतरांना द्यायचा नसतो.अशा मार्गाने आपला तणाव अजिबात हलका करायचा नसतो. आणि इतरांना काय तणाव कमी असतो का…?

समोरच्या व्यक्तीला काय आणि किती तणाव असु शकतो याची आपण कधी कधी कल्पनाही करु शकत नाही. आपण इतरांना तणाव दिल्याने त्यांचा तणाव हा वाढणार असतो.त्यामुळे अगदी स्वाभाविक आहे की आपला तणाव इतरांना देऊन त्याने त्रासच होणार असतो.त्यामुळे इतरांना असा तणाव देऊन त्रास अजून वाढवून घ्यायचा की नाही…? हे आपल्याला कळायला हवं.

म्हणून कधीच आपला तणाव इतरांना देऊ नका.तसा आपल्याला अधिकारही नाही. नाही म्हंटल तरी आयुष्य हे आपलं असतं आणि आपला तणाव हा आपणच “Handle” करायचा असतो हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!