स्वतःचं मानसिक खच्चीकरण होऊ न देण्याच्या काही टिप्स!!
सौ. मयुरी महेंद्र महाजन
पुणे (चिंतामणी चौक)
मित्रहो ,
आपल्याला मानव म्हणून परमेश्वराकडून काही गोष्टी इतर प्राण्यांपेक्षा जास्त मिळालेल्या आहेत , आणि ते म्हणजे आपल्या मानसिक क्षमता ज्या आधारे आपण कुठल्याही गोष्टीला मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो , परंतु आपल्या मानसिक क्षमतांचे कधी कधी काही गोष्टींमुळे खच्चीकरण होत असते, जसे की आपण कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असू तर काही जण जाऊ दे ,तुझाने नाही होणार, तु हे नाही करु शकत असं म्हणून कुठेतरी आपल्याला मागे खेचत असतात आणि आपले मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात.
जर कोणाला काही जमत नसेल तर तू करू शकतोस, प्रयत्न सोडू नको अशी मनोबल वाढवणारी लोक मात्र कमी भेटतात, पण कुणी कौतुक करो वा टिका करो आपण फक्त आपल्या ध्येयाकडे आणि आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून पुढे चालायचं,…. परंतु आपल्या मानसिक खच्चीकरण झाल्यानंतर आपण खचून जातो… लढण्याचे बळ असून सुद्धा आपण त्याचा पूर्णतः वापरच करत नाही.
म्हणून आपल्या मानसिक क्षमतेला कुणाच्याही खच्चीकरणाला बडी न पडू देता आपण स्वतःच आपल्या जीवनाचे शिल्पकार होऊन एका सुंदर आयुष्याचा आनंद लुटू शकतो…. आपण काही टिप्स पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्याला आपले मानसिक खच्चीकरण होण्यापासून आपण थांबवू शकतो ….
1 – स्वतःला कधीच कमी समजू नका, कारण ही गोष्ट आपल्या मानसिक खच्चीकरणाची पहिली पायरी आहे,
आपल्यासाठी आपण काहीच नाही ,तर दुसरे आपल्या त्याचं त् गोष्टीचा फायदा घेऊन आपल्याला कमी लेखण्याचा आणि मानसिक दृष्टीने आपल्याला कमकुवत आणि हीन समजून मानसिक खच्चीकरण करायला समोरच्याला सोपे जाते …
2 – आपले दुःख प्रत्येकाला सांगत जाऊ नका, म्हणजे मनातलं दुःख कुणाजवळ बोलून ते जात नाही परंतु हलकं वाटतं मन मोकळे जरूर करावं, आपण ते कुणाजवळ करतोय याला सुद्धा खूप महत्त्व आहे, कारण सगळेच लोक आपले हितचिंतक नसतात , काही जण रडून ऐकतात आणि हसून जगाला सांगतात, बर्याचदा असे होते की आपण आपल्या दुःखात असतो.
त्यातून काही जण आधार द्यायचा सोडून तुमचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी त्यांची स्वार्थाची पोळी भाजून घेतात, त्यामुळे त्रास करून घ्यायचा नाही….
3- स्वतःच्या मानसिक क्षमता मजबूत करा, खरं म्हणजे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या जगात वावरतात प्रत्येक जण आपल्यासारखा असेल असे नाही, हळव्या मनाचे लोक कोणी काही चूक दाखवली त्यांची किंवा काही बोलले तरी त्यांची मानसिक क्षमता बिघडते, कधीकधी आपली चुकी नसतांना सुद्धा आपल्याला खूप काही ऐकावे लागते.
आणि मग आपण त्याचा दोष स्वतःला देऊन आपला चांगुलपणा वरच रागवतो , डिल्टी फील होतं , कुणी कौतुकाची थाप देवो किंवा टीकेचा इशारा ,आपण नेहमी आपल्या मानसिक क्षमतांना इतके मजबूत केले पाहिजे की कुणाच्याही काहीही बोलण्या मुळे आपण डगमगायला नको…..
4- आपल्या आयुष्यात जेव्हा आपल्याला आपले मानसिक खच्चीकरण झाल्यासारखे वाटेल तेव्हा त्यातून निघायचा प्रयत्न केला पाहिजे ,त्या मध्ये अडकून राहून त्याचे अजून खच्चीकरण होऊ देऊ नये , आपल्या क्षमतांवर किंवा आपण करत असलेल्या एखाद्या चांगल्या कामावरती कुणाचा कानाडोळा असेल तर अशी लोक तुमच्या मानसिक खच्चीकरणासाठी कुठल्याही थराला जावू शकतात, अशांचे इंटेन्शन कधीच पूर्ण होऊ देऊ नका…..
5 – स्वतः वरती विश्वास ठेवा तुमच्या क्षमतांवर आणि हिमतीवर तुम्ही विश्वास ठेवत असाल, तर या जगात अशी कुठलीच ताकद नाही जे तुम्हाला थांबू शकेल, स्वतःला सिद्ध करा. कुणी काही म्हणेल याची तमा बाळगू नका, कधीकधी आपल्याला माहिती नसते आपल्यात खुप काही असते, परंतु आपल्या झालेल्या मानसिक खच्चीकरणा मुळे ते दाबले जाते…
शब्द ही ताकद असते ,जर कोणी म्हटलं कि , तू ही गोष्ट खूप छान करतोस, यामध्ये नक्कीचं पुढे जाशील , तर दहा हत्तींचे बळ असल्यासारखं वाटतं ,तसेच कुणाच्या नकारार्थी _बोलण्यामुळे सुद्धा आपल्या मानसिक खच्चीकरण होऊ शकते_ , आणि त्यामुळे नकारात्मक तिला दुजोरा मिळतो, म्हणून आयुष्यात सकारात्मक ठेवा, आणि कुठेही न थांबता पुढे चालत राहा, असं म्हणतात
“मन के हारे हार है, मन के जीते जीत ”
आपल्या मनाला हरु देऊ नका, प्रयत्न चालू ठेवा…. एक दिवस विजय नक्की मिळणारचं, आपल्या मनाची शक्ती ओळखा, ती डगमगली नाही पाहिजे, यासाठी तिला मजबूत करा……!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



अतिशय उत्तम विचार असतात लेखांमध्ये खूप छान