स्त्री जे शिकते त्याची पुरुषांना कधीच गरज वाटत नाही ??
मेराज बागवान
मनुष्य प्राणी हा जगातील सर्वात महत्वाचा प्राणी.महत्वाचा का , तर निसर्गाने ह्या मनुष्य प्राण्याला अनेक गोष्टी बहाल केलेल्या आहेत ज्या इतर कोणत्याच प्राण्यांकडे नाहीत. आणि ह्या मानवजातीतील ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ ही दोन महत्वाची पात्रे. फक्त पुरुष असतील तर मानवजात पूर्ण होत नाही, तसेच फक्त स्त्री वर्ग असेल तरी देखील मानवजात पूर्ण होत नाही.
पण जरी स्त्री-पुरुष दोघेही ‘मनुष्यप्राणी’ह्या गटात मोडत असली , तरी देखील दोघांमध्ये अनेक बाबतीत वेगळेपणा आहे. इथे कोणीच उचच किंवा कमी दर्जाचा नाही, किंवा कोणताच लिंग भेद आपण म्हणू इच्छित नाही.किंबहुना, पुरुष स्त्रीशिवाय अपूर्ण आहे आणि स्त्री देखील पुरुषाशिवाय अपूर्णच.पण तरी देखील काही गोष्टी आपण थोड्या बारकाईने पाहुयात.
एका स्त्री मूळतः च लहानपणापासून छोट्या छोट्या बाबतीत ‘तडजोड’ करीत असते. नकळत देखील ‘जुळवून ‘ घेत असते.आपल्यापेक्षा मोठा भाऊ असो किंवा लहान.जे काही असेल ते सर्व प्रथम त्याला आणि नंतर स्वतःला अशी समज तिला अगदी लहान वयात देखील असते.’वडील’ प्रत्येक मुलीच्या, स्त्रीच्या आयुष्यातील ‘प्रथम पुरुष’ असतो. आपल्या वाडीलांशीवाय कोणीच पुरुष श्रेष्ठ नाही , असे ती आयुष्यभर मानत असते. तिचे वडील तिच्यासाठी कोणत्याही ‘हिरो’ पेक्षा कमी नसतो.
म्हणूनच की काय, आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा एका मुलीला आईपेक्षा देखील बापच जवळचा वाटतो.आणि शेवटी कित्येकदा अनेक मुली आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर नसतात. त्या खऱ्या अर्थाने आपल्या वाडीलधाऱ्यांचा मान राखत असतात.अशा अनेक गोष्टी एक स्त्री स्वतः च शिकत असते , तेही अगदी लहान वयात. मात्र या उलट , पुरुष किंवा मुले इतक्या सहजा सहजी ह्या सगळ्या गोष्टी अंगी नाही बाणत.कळत-नकळत त्यांच्या मनाला जे वाटेल तेच करीत असतात.
मात्र ह्या सगळ्यात पुरुष दोषी आहे असे अजिबात नाही.तर निसर्गाने स्त्री-पुरुषाची निर्मित च अशा पद्धतीने केली आहे. मुलगी लग्नाच्या वयात आल्यानंतर आई तिला अनेक गोष्टी सांगू लागते ,जसे की घरकामतील गोष्टी, मोठ्यांचा आदर ठेवणे, सर्वांनशी मिळून-मिसळून वागणे , घरी वेळेवर येणे इत्यादी. परंतु ,ही मुलगी मात्र कोणी तिला हे सर्व सांगण्याआधीच स्वतःच ह्या सर्व गोष्टींची अंबलबजावणी करीत असते. मात्र पुरुष हे सगळे अटी-नियम यांच्या पलीकडचे असतात.का कोण जाणे , पण त्यांना कधी त्यांना ह्या सर्व गोष्टी पाळण्याची गरज देखील वाटत नाही?
पुरुष संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत असतो, ९०% घरात आजही पुरुष च आर्थिक जबाबदारी घेत असतात. पण फक्त आर्थिक जबाबदारी पेलली म्हणजे सर्व काही झाले असे देखील नाही. घरात पैसा आला म्हणजे सर्व गोष्टी मार्गी लागल्या असे होत नाही. तर घर सावरायला, सजवायला, जोपासायला, सांभाळायला, आणि संपूर्ण घर एकत्र बांधून ठेवायला देखील तितकीच मेहनत लागते, जितकी बाहेर जाऊन पैसे कमवायला लागते.
मात्र , काही पुरुषांना ह्या सर्व गोष्टी लक्षात येत नाहीत किंवा त्या गोष्टी पुरुष शकत देखील नाही. पण काही पुरुष याला अपवाद आहेत. पण तरी देखील स्त्री हे सर्व काही शिकते ते पुरुषांना शिकायची गरज नाही वाटत ?
आज स्त्री प्रत्येक क्षेत्रांत पुरुषांबरोबर काम करीत आहे. बाहेर जाऊन पैसे कमवत आहे.पण तेव्हा ती तिची घरातील जबाबदारी नाही विसरत. किंबहुना एक उत्तम ‘मल्टिटास्किंग’ गुण असणारी , विधात्याची एक सर्वोत्तम कलाकृती आहे.आर्थिक परिस्थिती बेताची असेल तरी काटकसर आणि आर्थिक परिस्थिती चांगली असली तरी देखील उधळपट्टी न करणारी अशी ही स्त्री . या उलट पुरुष , एवढ्या बारकाईने ह्या सर्व गोष्टी नाही हाताळत.कित्येकदा पुरुषांच्या हे सर्व बारकावे ध्यानीमनी देखील नसतात.
स्त्री कडे नेहमीच संयम असतो, डोंगरएव्हढी दुःखे झेलून घेऊन शांतपणे आयुष्य जगण्याची कला तिच्याकडे आहे.रात्र-रात्र रडून देखील दुसऱ्यादिवशीची लढाई लढायला ती जोमाने तयार असते.सर्वांचे सर्व करून देखील , पुरुषाला ह्या सगळ्यांचे श्रेय देणारी देखील ही स्त्री असतेच. पण ह्या सर्व गोष्टी पुरुषांना का नाही शिकता येत?
स्त्री पुरुष जी कामे करू शकतात , ती सर्व कामे यशस्वीरीत्या पार पाडते.मग पुरुष शिकण्याची वृत्ती का नाही धरत? स्त्री आणि पुरुष यांच्या शिवाय हे जग अपूर्ण आहे , तरी देखील स्त्री जेवढ्या इच्छाशक्तीने सर्व गोष्टी शिकते ,तेव्हढी गरज ,पुरुषांना का नाही वाटत?
स्त्री-पुरुष दोघांना भावना असतात.पण स्त्री प्रत्येक गोष्टींचा खूप खोलवर विचार करीत असते , त्या नुसार स्वतःमध्ये बदल करीत असते. आपला अहंकार, ‘मी’ पणा बाजूला ठेवत असते. नेहमी नाती जपण्यासाठी तिचे सर्वस्व पणाला लावत असते.पुरुष देखील ह्या सर्व गोष्टी करू शकतात, पण त्यासाठी बराच काळ लोटला जातो.मात्र स्त्री , पावलोपावली न काही बोलता , सर्वांच्या भल्यासाठी एक पाऊल मागे घेत असते आणि पुरुषाला पुढे जाण्यासाठी नेहमी पाठिंबा देत असते.
असो , असतात अशा काही बारीक-बारीक गोष्टी, ज्या डोळ्यांनी नाही दिसत .पण अनुभवाच्या लागतात, समजून घ्याव्या लागतात. स्त्री न सांगता सर्व गोष्टी समजून घेते आणि नेहमी सर्व गोष्टी बांधून ठेवण्याचा प्रयत्न करीत असते.
पण तरी देखील कुठे ना कुठे असे वाटते, खरेच पुरुषांना ह्या सगळ्या गोष्टी शिकायची गरज नाही वाटत? प्रत्येक स्त्री-पुरुषाने समजूतदारपणा दाखवला तर अनेक गोष्टी मार्गी लागणाऱ्या असतात. मग , समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी स्त्री ज्या गोष्टी शिकते त्या पुरुषांनी देखील का शिकू नये?
अर्थातच सर्व पुरुष वर्गाला इथे दोष दिला जात नाहीये, पण असे वाटते की प्रत्येकाने किमान एकदा तरी ‘आत्मपरीक्षण’ करायला काय हरकत आहे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


