Skip to content

सुखी जीवनात माझ्या मीच मोठा अडथळा आहे.

सुखी जीवनात माझ्या मीच मोठा अडथळा आहे.


प्रीती लांडगे


खूप वेळा किंवा अनेकदा प्रत्येकजण किंवा काहीजण अपवाद वगळता आपल्या सुखी जीवनासाठी स्वतःच अडथळा असतात. जर यांची सुरवात बघायची झाली तर आपण आपल्या सवयीचे निरिक्षण करू शकता आपल्या जीवनात आपल्या सवयी फार महत्वाच्या असतात त्याच प्रमाण आपली वाणी, बोलण्याची पध्दत हे देखील कारणीभूत असते.

आता सुखाचे म्हणाल तर छोटे से उदा. देते साधी गोष्ट आहे, सकाळी आपले संपूर्ण कुटुंब चहा,नाष्टा करत आहेत. नाष्टा झाल्यावर आपण कितीजण स्वतःचा कप ठेवतो. तर खूप कमीजण आहेत. उचलून ठेवला तर महिलांना त्रास होणार नाही, घरातील लोकांची तुम्हाला बोलणी खावी लागणार नाही. म्हणजे जर तुम्ही तुमचे काम चोख बजावले असते.

आणि हे छोटे काम पार पाडले असते तर तुम्हीही सुखी आणि घराती इतर मंडळी ही सुखी गोष्ट छोटी आहे परंतू या छोट्या गोष्टी तुमच्या सुखाला – दुखाला कारणीभूत ठरत असतात. म्हणून हे उदाहरण दिले. अशी अनेक उदाहरणे घरात असतील वेगळे सांगायची गरज नाही. कारण तुमचा अहंकार आणि मी कोणीतरी खूप भारी हा तुमचा हेकेखोर स्वभाव तुमच्या सुखाला कारणीभूत आहे.

समोरच्या गोष्टी किंवा व्यक्ती जशा असतील तशा स्वीकारा सक्रीय स्वीकार दाखवा तुम्ही निष्क्रीय स्वीकृती दाखवली तर तुम्ही तुमच्या मार्गात अडथळा निर्माण करता. बॉस सांगितले तेवढेच काम करणार ती झाली सांगकाम्या वृत्ती, परंतू आणखीन चांगला विचार करून एक पाउल पुढे जाऊन काम केले. बॉसला आणखीन काम सोपे करून दिले. त्याचा भार हलका केला तर आपोआप तो बॉस सुखवाला जाईल.

आणि तुम्हीच सुखी व्हाल हा तुम्हीच तुमच्या सुखातील अडथळा दूर केला आहे. तूच तुझ्या जीवनाचा -शिल्पकार आहेस. ते हेच तुम्ही ठरवा तुम्हाला करायच आहे. जीवनात पुढे जाण्यासाठी सुखाची दालने उघडण्यासाठी कधी कधी नमावे लागते. एक पाऊल क्वचित प्रसंगी मागे देखील घ्यावे लागते.

तुम्हा तुमच्या जबाबदाच्या निट पार पाडाव्या लागतील जेव्हा तुम्ही तुमची जबाबदारी निट पार पाडत नाही तेव्हा तुम्हीच तुमच्या वाटेत अडथळा निर्माण करता. लक्षात ठेवा जेवढी जबाबदारी घेण्यात तुम्ही पुढाकार घ्याल तेव्हा आपोआप तुमची शक्ती, आनंद, उत्साह वाढतो. हाच निसर्गाचा नियम आहे.

तुम्ही जेव्हा तेच तुम्हाला मिळणार. म्हणून आनंदाने जबाबदारी स्वीकारा आणि तुमच्या सुखाचे तुम्हीच भागीदार बना. आणि जेव्हा तुमच्या वाणीतून मधूरावाणी निर्माण होईल. तेव्हा समोरूनही तसाच प्रतीसाद मिळून तुम्ही सुखावाल, कोणाला ही देणे खूप सोप आहे. परंतु घेणे अवघड आहे.

समजा तुम्ही तुमच्या घरातून बाहेर जाताना खाली वॉचमनला 10रुपये देणे सोपे आहे परंतु येताना त्याच्याकडून 10 रूपये घेणे कसे वाटेल मग देणे सोपे की घेणे हे तुम्हीच ठरवा. देतानाचा आनंद आणि घेतानाचि मनाची स्थिती कशी असेल हे तुमचे तुम्हालाच कळेल, देताना सुखी आणि घेताना दुखी तुम्हीच तुमच्या सुखाच्या आड आलात हे लक्षात येईल तुमच्या.

अति हुशारी पण तुमच्या सुखाच्या आड येते. जमेल तेवढे नम्र, विनयशील, प्रामाणिकपणा सॉफ्टनेस हे जेवढे तुमच्या कृतीतून दिसेल तेवढे तुम्हीच सुखी व्हाल. आणि त्यामुळे दूसरेही आनंदी होतील, म्हणून तुमच्या सवयीपासून वागण्या बोलण्याच्या कृतीतून तुमच्या सुखाची तुम्हाची दालने उघडू शकता.

मी लहान, मीच मोठा सोडून दया, आणि माणसातील माणूसकी जाणा. आणि आवश्यक तिथे तेवढेच तुमचे राग,लोभ वापरा चवी पुरतेच जस लोणच कसे चवीपुरते वापरतो अगदी तसेच सतत द्वेष, चिडचिड करू नका कारण अस करून तुम्ही तुमचे आजूबाजूचे वातावरण खराब करत आहात स्वतः तर दुखी होत आहात आणि दूसर्याला ही करत आहात. आणि तुमच्या सुखाच्या आड तुम्हीच आडथळा निर्माण करत आहात. साधी गोष्ट आहे, सहज, सरळ, साधे,लाघवी समजूतदारपणे वागा आणि तुमच्या सुखातीला आडथळे दूर करा . काय निर्माण करायचे ही निवड तुमची तुम्हाला करायची आहे.

म्हणून आता म्हणा की, सुखी जीवनाचा माझा मीच आनंदी शिल्पकार आणि सगळ्याला मी स्वतः जबादार, असतो. म्हणजे मग सारे सुख कायम तुमच्या मागे असेल तुम्ही सुखाच्या मागे पळणार नाही. सारे कसे सहज सोपे सुंदर करुन जतन करावे आणि त्या सुखाचा आस्वाद घ्यावा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “सुखी जीवनात माझ्या मीच मोठा अडथळा आहे.”

  1. तुम्ही मुलींनो ऑफिसमधील तरूण बाॅस बरोबर मैत्री करा , त्याच्याशी खुल्लम खुल्ला, मनमोकळेपणे स्त्रीसुलभ मर्यादा ओलांडून बोला, त्याच्यावरच पूर्ण विश्वास ठेवा , स्वतःच्या खाजगी बाबतीत सुद्धा त्याच्याच पूर्ण अधिकारात रहा आणि होणाऱ्या नवऱ्याला अज्जिबात किंमत देवू नका म्हणजे तुमचे आयुष्य अगदी सुपर्ब होईल.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!