Skip to content

सुखाचं फुल उमललं तरी ओंजळभर दुःख कमी होतं.

सुखाचं फुल उमललं तरी ओंजळभर दुःख कमी होतं.


सौ. मयुरी महेंद्र महाजन

पुणे (चिंतामणी चौक)


कणभर सुखात मन भरून जगता आलं पाहिजे,,,,, सुखचं सुख मिळत गेलं तर सुखाला सुद्धा आपण सुखात आहोत याची जाणीव राहणार नाही, कुठे तरी दुःख आहे म्हणून असणाऱ्या सुखाचा मोल मोठं आहे ,उन्हाच्या कडाक्या मध्ये काम करणाऱ्या मनुष्याला सावलीत बसल्यावर वाऱ्याची एक अलगद झुळूक गालावरुन फेरफटका मारते , तेव्हा ते सुख अनुभवणाऱ्या त्या व्यक्तीला अजून काम करण्याची ताकद मिळते आपण नेहमीच आपल्या दुःखाची उजळणी करत बसतो ,सुखाची उजळणी करायचं विसरून जातो आणि सुखाला कुठे माहिती असतं कुठे थांबायचे आहे जिथे कोणी सुखाबद्दल बोलताना दिसतं सुख तेथेच विसावा घेतं,,,,, तसेच दुःखाला तर कुठे माहिती असतं त्याचं ठिकाण कोणी आमंत्रण दिलं तर तेही तेथेचं जातं…..

कणभर सुखात मन भरून जगण्याची ताकद असतेच… फक्त आपण सर्वांनी त्या दृष्टीने सुखाकडे बघण्याची आवश्यकता आहे…. दुःखाला सुखाची किनार नेहमी असतेच …पण आपणच आपल्या सुखाच्या व्याख्या खूप विस्तारून टाकलेल्या आहेत…. म्हणजेच विस्तारलेल्या सुखाच्या व्याख्यामध्ये कधीच सुख सामावता येत नाही, आणि त्यामुळे सगळं काही असून सुद्धा माणूस सुखाच्या शोधात आहे, अति सुख हव्यासापायी छोटे-छोटे असणारे दुःखाचे प्रसंग सुद्धा खूप मोठे वाटू लागलेत कारण मर्यादेच्या पलीकडे नेऊन ठेवलेयं सुख दुःखाला….

सुखाचं फुलं उमललं तरी ओंजळभर दुःख कमी होतं कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या रमेश वर कर्जाचा भार वाढत जातो तेव्हा रमेशला त्याचं दुःख फार मोठं वाटू लागतं…. रमेश नेहमी सर्वांची मदत करतो पण मदत करणारी माणसेच कधीकधी मदतीसाठी धडपड करतात असे वाटू लागते, रमेश स्वतःच्या सुखासाठी स्वतःला जबाबदार धरत असे, परंतु त्यातून मार्ग न निघता अजून त्याचं त्याच विचारांनी रमेश स्वतःचे नुकसान करून घेत असे.

परंतु एके दिवशी जेव्हा रमेश घराबाहेर कामासाठी जातो तेव्हा त्याला रस्त्याच्या बाजूला पाय नसलेला व्यक्ती हाताच्या साहाय्याने चालत जाऊन फुले विकण्यासाठी आपल्या फुलांचे दुकान लावताना दिसला.. रमेशला ते बघून आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींची जाणीव झाली त्यातून उमेद घेऊन रमेश आपल्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधू लागला शोधणाऱ्याला वाट गवसतेच…. तसेचं रमेशला सुद्धा एका ठिकाणी कामाची संधी मिळाली रमेश प्रामाणिकपणे आपल्या कामासाठी स्वतःला झोकून द्यायला नेहमी तत्पर असायचा

या सर्वांमध्ये एक गोष्ट मात्र खूप चांगली घडली ज्या गोष्टींचा रशेला नेहमी त्रास होत होता त्याने त्याच गोष्टींना आपली ताकद बनवली आणि आपल्यासारख्या अनेक जणांना एक मदतीचा हात देण्याच्या विचाराने रमेशला काम करण्याच्या ठिकाणी उच्च पदावर ती प्रमोशन मिळाले, परंतु कर्जाचा भार मोठा असल्याने रमेशला अजूनही चिंता वाटत होती….

या सर्वांमध्ये रमेश वडील होणार आहे, ही बातमी जेव्हा पत्नीकडून ऐकतो तेव्हा त्याच्या सुखाला कुठे सीमा राहत नाही आणि या सुखाचे… उमलणारे फूल आयुष्यात मात्र दुःखाला कमी करून गेलं आणि बाप होण्याचा आनंदाबरोबर जबाबदार्‍या वाढणारं…. याची रमेशला पूर्ण कल्पना असल्याने त्या सुखासाठी भरभरून आनंद देण्याची घेण्याची आपल्या चिमुकल्या कडून आपल्या सर्व क्षमतांना कामाला लावून आपले ठरवलेले ध्येय पूर्ण केले,,, आणि सुखाचं फूल रमेश आयुष्यात फुलंलं आणि त्या सुखात रमेश न्हावून निघाला….

मित्रांनो काही वेळेस काही घटना आपल्याला थांबवण्यासाठी नाही तर आपण खूप पुढे जाण्यासाठी सुद्धा घडतात त्यामुळे आपल्या आयुष्यात सुखाचे फूल उमलते परंतु आपण आपल्या सुखाकडे बघण्याचे कष्ट घेणे सुद्धा गरजेचे आहे ….अन्यथा दुःखाच्या गर्ददेत अडकून राहिलो तर फुललेल्या सुखाचं फूल कोमेजून पळून जाईल तरी आपण त्याकडे लक्ष देत नाही दुःखाला सुखाची किनार नेहमी असतेच आपण ती किनार कधी बघतच नाही.

सुंदर आयुष्य पुन्हा पुन्हा जगायला मिळणार नाही ,सुख दुःखा ऊन सावली सारखी असते, असलेल्या गोष्टीत नसलेलं सुख अनुभवता आलं तर जगण्याची यात्रा अजून सुखद होते…….. मानलं तरच या जगात सुख आहे नाहीतर रोज चालणारा निरंतर खेळ आहे…!!!

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!