Skip to content

सारखी किरकिर करणे ही एक मानसिक समस्या आहे का??

सारखी किरकिर करणे ही एक मानसिक समस्या आहे का??


सौ.मयुरी महेंद्र महाजन

पुणे(चिंतामणी चौक)


मनुष्य सर्व भावनांनी युक्त आहे, त्यामध्ये वेळोवेळी घडणाऱ्या घटना प्रसंगाबरोबर व्यक्तीच्या भावना प्रकर्षाने जाणवू लागतात, कधी कधी घडलेली घटना किंवा प्रसंग वेगळा असतो परंतु त्यामुळे आपल्या नाजूक मनाच्या पटलावर त्याचे झालेले परिणाम खूप वेगळे असतात, म्हणजे बघा घटना घडून काही वेळ निघून गेलेला असला तरी त्याचे पडसाद मात्र काही केल्या मनातून जात नाही ते दमन करून आपल्या अबोध मनामध्ये दडपून ठेवले जातात परंतु त्या घटनेच्या बाबतीत आपल्यासमोर काही गोष्टी दिसू लागल्या, तर मात्र चिडचिड होते आणि यामुळे सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीविषयी सारखी किरकिर सुरू होते खरे तर त्या किरकिर करण्याचा काही अर्थच नसतो …..

मित्रहो, जर आपल्यापैकी कोणाला असे जाणवत असेल की माझ्या बाबतीत किरकिर करणे या गोष्टी घडतात परंतु काही केल्या मलाच माझे समजत नाही की मी सारखी किरकिर का करत असतो ,तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल या प्रश्नाचे उत्तर तुमच्या जवळच आहे खरं म्हणजे कधीकधी इच्छा नसताना सुद्धा आपण किरकिर करतो या पाठीमागे नक्कीचं कारणे दडलेली असतात तसे की मला नेहमी वाटते की या जगात कुठलीच गोष्ट कारणाशिवाय जन्माला येत नाही ,सारखी किरकिर करण्यामागे सुद्धा कारणे दडलेली आहेतच मग ते आपल्याबाबतीत असतील किंवा अन्य कुणी असे करत असेल त्यांचे बाबतीत असतील परंतु हे मात्र खरे आहे की या कारमागे त्याचे मूळ सापडले तर आपण त्यावर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी होऊ शकतो …..,

बघा..! सारखी किरकिर करणे ही एक मानसिक समस्या आहे का …???? मित्रांनो आपण मानव आहोत मानवी स्वभावात काही गोष्टींच्या बाबतीत होणारी किरकिर ही स्वाभाविक असू शकते, परंतु जर तीच गोष्ट वारंवार होत असेल ,तर मात्र कुठेतरी चिंता आणि अनामिक भीतीचे सावट ही गोष्ट व्यक्तीचे मन आतून पोखरून लागते आणि सतत किरकिर चालूच राहते खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीला विशिष्ट मर्यादा असतात आणि जेव्हा त्या गोष्टी मर्यादेच्या पलीकडे जातात तेव्हा मात्र त्यांचे रूपांतर समस्येमध्ये होते….

आपल्या जगण्याचा वागण्याचा खाण्याचा राहण्याचा प्रत्येक गोष्टीचा संबंध हा आपल्या मानसिकतेतूनच पार करून जात असतो त्यामुळे मानसिक आरोग्य सांभाळणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे मित्रहो किरकिर करणे ही खूप साधी गोष्ट वाटत असली तरी कोणीही सहजच किरकिर करू शकत नाही त्यामुळे आपण त्याची मुळे शोधली पाहिजे, नेमकी कशामुळे किरकिर होते ,जिथे आवश्यकता नसेल तिथे किरकिर थांबवली पाहिजे.

मानवा मध्ये असणाऱ्या मानसिक समस्या काही वेळेस प्रकर्षाने जाणवत नाही परंतु त्याचा होणारा मानसिक त्रास मात्र व्यक्तीला आपल्या आतल्या आतचं जाणवत राहतो मात्र त्याला तो त्रास कुणाला सांगता सुद्धा येत नाही आणि थांबवता सुद्धा येत नाही ,बरेचदा असे होते की त्याला होणारा त्रास ती व्यक्ती स्वतःसुद्धा ते स्वीकारायला तयार नसते आणि ते न स्वीकारल्यामुळे व्यक्तीची ती समस्या अजूनच खोलवर जाऊ लागते आणि जेव्हा गोष्टी हाताबाहेर जातात तेव्हा मात्र आम्ही त्यावर उपचार केला पाहिजे हा विचार करतो….

परंतु या ठिकाणी ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, काही जणांचा हा स्वभाव सुद्धा असू शकतो कारण किरकिरा स्वभाव असणे ,,याच्या पाठीमागची कारणे वेगळी कारण या ठिकाणी ती व्यक्ती या किरकिरे पणामुळे प्रेशराइज होत नाही तो फक्त एक स्वभावाचा भाग असू शकतो परंतु त्या ठिकाणी जर या किरकिरे करण्यामुळे व्यक्तीला प्रेशर (दबाव )जाणवत असेल बेचैन वाटत असेल, तर मात्र व्यक्तीला त्याकडे आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे.

आणि हो त्यामध्ये सारखे सारखे असे जाणवणे हा प्रकार दर सहा महिने सलग जाणवत असेल, तर मात्र त्यासाठी आपण समुपदेशकाकडून त्यावर चर्चा करून तुमच्यासाठी काय योग्य आहे यासाठी उपचार समुपदेशन घेऊ शकता…. त्यामध्ये काही कमीपणाची भावना येऊ देऊ नका…. कारण काही गोष्टी वेळेच्या आत सावरून घेतल्या तर नंतरुन त्याचे वाईट परिणाम भोगण्या पेक्षा आजचा त्रास कमी केलेला कधीही चांगलाच …..

आज शुल्लक वाटणारी किरकिर ही उद्याची मानसिक समस्या होऊ शकते, आणि शुल्लक वाटणारी ही किरकिर जर मानसिक समस्या म्हणून थांबवायची असेल तर सारखी सारखी किरकिर करणे थांबवावे लागेल, आणि हे सर्वस्वी आपल्याच हातात असते कारण कुठे किरकिर करावी आणि कुठे थांबावं हे जर आपल्याला कळाले आणि आपला रिमोट कंट्रोल आपल्याच हातात ठेवला तर समस्या कुठलीही असो त्याला सोडवायची सूत्र सुद्धा तुमच्याच हातात असतील त्यात शंकाच नाही… त्यामुळे आपला रिमोट कंट्रोल आपल्याचं हातात असू द्या….!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!