Skip to content

सारखी आणि छोट्या-छोट्या कारणांवरून चिडचिड होत आहे, उपाय वाचा.

सारखी आणि छोट्या-छोट्या कारणांवरून चिडचिड होत आहे, उपाय वाचा.


मयुरी महेंद्र महाजन

पुणे


हल्ली कुणीही कुणावरही एकदम सहजचं रागावतोही आणि चिडचिडही करतो, त्यासाठी कुठली सीमाचं राहिलेली नाही…. परंतु ती चिडचिड एकसारखी होत असल्यामुळे रागाला आवर घालणं कठीण जातं ,…चिडचिड व्हावी असं वाटत नाही तरीसुद्धा चिडचिड होते परंतु त्याची कारणे कळत नाही आणि आपण जे काही करतोय त्याची आपल्याला खंत असून सुद्धा आपण काही करू शकत नाही.

असे आपल्याला जाणवतं परंतु आपली सारखी आणि छोट्या छोट्या कारणावरून चिडचिड होण्यामागे आपल्या मनासारख्या काही गोष्टी न झाल्यामुळे चिडचिड होते जेथे समस्या असतात तिथे उपाय सुद्धा असतात फक्त गरज असते ती आपण त्या उपाययोजना अंमलात आणण्याची आणि हो चिडचिड होणे ही प्रत्येक घरामध्ये एक व्यक्ती तरी या समस्येने वेढलेला आहे… होणारी चिडचिड माणसाला आतून कमजोर बनवते परंतु आपण सर्वजण तो त्याचा स्वभाव आहे, तो तसाच आहे… असे म्हणून विषय इथेच थांबवतो ….परंतु चिडचिड करणे हा स्वभाव नसतो तसा त्याचा स्वभाव झालेला असतो…….

आपण त्या गोष्टींना स्वभावाचं लेबल लावून मोकळे तर होतो परंतु चिडचिड करण्या मागे बरीच कारणे असतात जे की आपल्याला शोधल्यावरती मिळतातच…. आणि आपल्याला कारणे सापडली समस्येची मूळ गवसली तर समस्या सोडवायला सोपी जाते…. त्यासाठी आपण त्याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना काय करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे… मग आपण आपल्या प्रत्येक समस्येला आवर घालू शकतो….. यात शंका नाही आता आपण बघुया की आपल्याला ज्या काही छोट्या छोट्या कारणावरून आपली चिडचिड होते त्यावर आपण उपाय काय करू शकतो जेणेकरून आपण चिडचिड करण्यापासून स्वतःला एक नियम व अटींच्या बिंधनात स्वतःवरती स्वतःचे कंट्रोल मिळू शकतो…..

एक – मनाप्रमाणे गोष्टी न झाल्यामुळे आपली चिडचिड होते तर आपण सर्वप्रथम स्वतःलाही बजावून सांगितले पाहिजे की सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे झाल्या असत्या तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिलीच नसती…. प्रत्येक वेळेस आपण म्हणणार त्याच प्रमाणे सर्व काही घडले असते तर बाकी सर्वांना सुद्धा मन आहेत त्यांना सुद्धा भावना आहेत आपण फक्त थोडसं समोरच्या व्यक्तीला सुद्धा कधीतरी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे संधी दिली पाहिजे….

दोन –
घटना प्रसंग कुठलाही असो पण आपण सर्वात आधी त्यावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्या अगोदर त्या घटना प्रसंगाची पार्श्वभूमी समजून घेणे महत्त्वाचे आहे ,जर क्रियूला प्रतिक्रिया असेल तर नकळतच भावनेच्या भरात माणूस जे बोलायचे नाही ते सुद्धा बोलून मोकळा होतो….

तीन –
ध्यान हे सर्वोत्तम उपाय आहे तुमच्या कितीतरी समस्यांवरचा कारण की ध्यान केल्याने तुम्ही स्वतःला शांत आणि निर्मळ फिल करतात आणि शांत मन असल्याने आपण चिडचिड न करता कुठलीही गोष्ट प्रेमाने आणि सुंदर भाषा रचनेत सांगण्याचा प्रयत्न करणार…

चार –
समाजामध्ये बरेच लोक असतात की त्यांना दुसर्‍यांना चिडवण्यामध्ये किंवा दुसरी व्यक्ती कशी चिडेल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात.. परंतु फक्त काही अर्थी थोडं मजा आणि मस्ती साठी ठीक असले तरी या चिडचिडेपणामुळे त्या गोष्टी वाढीस जिवू शकतात ….त्यासाठी आपण समोरच्या व्यक्तीच्या त्या अपेक्षांची पूर्तता करू नये आपण आपल्याचं तर्‍हेने जगायला हवं….

पाच-
शांतीत क्रांती करण्याची क्षमता असते त्यामुळे आपण शांततेच्या मार्गाने बरेच प्रश्न सोडवू शकतो..

सहा-
आपण आपले छंद जोपासू शकतात…. की ज्यामुळे आपण आपल्याच मस्तीत आपले जगणे आनंदाने जगू शकतो …

सात-
ज्या कारणाने आपल्या चिडचिडेपणा वाव मिळतो शक्यतो आपण ती कारणे पुन्हा पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करावे …

आठ-
ज्या ठिकाणी गरज नाही त्याठिणी आपण प्रतिक्रिया व्यक्त करू नये शांत राहण्याचा प्रयत्न करावा …शांत असणे हीसुद्धा एक प्रतिक्रिया आहे परंतु ती एक तटस्थतेची भूमिका आहे …

नऊ-
आपण निसर्गासोबत काही क्षण घालवू शकतो, कारण त्यामुळे आपल्याला एक ऊर्जा आणि त्यासोबत जगण्याकडे बघण्याची दृष्टी मिळेल… त्यामुळे चिडचिडेपणाला आपण टाळू शकतो परंतु ते तेव्हाच जेव्हा आपण स्वतःला हरवण्याचा निर्धार करणार…

दहा –
उपाय म्हणून आपण आपल्या भावनांचा कोंडमारा न होऊ देता ते कुठेतरी व्यक्त होणे गरजेचे आहे कारण आपल्या दाबलेल्या भावना माणसाच्या चिडचिडेपणाला कारणीभूत असतात चिडचिडेपणा ला स्वभावाचे लेबल लावू नका कारण मानसशास्त्र सांगतं स्वभावाला औषध असते परंतु ते रोजच घ्यायचं असतं आपणच ठरवायचं आपण आपल्याला कुठे बघणार आहोत…..!!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “सारखी आणि छोट्या-छोट्या कारणांवरून चिडचिड होत आहे, उपाय वाचा.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!