साध्या सरळ आयुष्याची आपण कशी वाट लावत असतो, वाचा एकदा!
मयुरी महेंद्र महाजन
पुणे
आयुष्य म्हटलं की या आयुष्याचा प्रवास चढ उतार, खाच खडगे ,येणारे चांगले वाईट अनुभव सर्वचं बाबींना पार करावे लागते, या सर्व गोष्टींमध्ये आपल्या मानसिक क्षमतांचा आपण पूरेपर वापर करण्यासाठी आणि आपल्या साध्या सरळ आयुष्याची वाटं तरं लावत नाहीय नं हे एकदा आपण सर्वांनी तपासलेचं पाहिजे…!!!!
रमेश आणि सुरेश दोघे मित्र असताता ,परंतु दोघांमध्ये मैत्री असली तरी विचारांच्या बाबतीत मात्र दोघे वेगवेगळ्या ग्रहावरचे प्राणी,रमेश नेहमीचं आपल्या आयुष्यात आजचा क्षण आपला असे मानून अपेक्षांच्या पिंजर्यात न अडगता नेहमी स्वच्छंदपणे जगण्याला महत्व देणारा, नको त्या अपेक्षा वाढल्या की हवी ती माणसे दुरावतात त्यासाठी रमेश असलेल्या गोष्टीतला आनंद भरभरुन जगायचा स्वतःला मात्र पुढे जाण्यासाठी नेहमी प्रयत्नांची कास धरायचा.
सुरेशचे मात्र यापेक्षा पूर्ण विरोधी ,कसली चिंता नाही,कसलेही नियोजन नाही,भविष्याविषयी कुठली योजना नाही, आणि वास्तव मधील वर्तमान मात्र भरपूर असूनसुद्धा असमाधानाची भावना,स्वतःपेक्षा ईतरांकडून जास्तीच्या अपेक्षा परिस्थिती हालाखीची नसली तरी असलेली परिस्थिती फक्त मौजमजेसाठी आहे इतकीचं धारणा आणि आत्ताचू आत्ता आणि उद्याचे उद्या बघू अशी असणारी भूमिका त्यामुळे हातात असलेली जमापुंजी निव्वळ मौजमजेसाठी वापरण्याकडे सुरेशचा कल जास्तीच होता.
आपल्या चुकांची जाणीव असून सुद्धा नेहमीच आपल्या चुकांकडे कानाडोळा करणे हे सवयीचे ,,रमेश मात्र कोण काय म्हणतेय, कोण काय बोलतय ,त्याचा स्वतःच्या मानसिक स्तरावर त्रास न करून घेता,, साध्या-सरळ आयुष्याला अजून कसे सुंदर बनवता येईल अजून कसे बहरता येईल यासाठी नेहमीच प्रयत्नात असायचा, सुरेशला मात्र कोणी सांगितल्या सल्ला किंवा त्याच्या वागणुकी चा पाढा …..तर माझे आयुष्य आहे मी कसेही जगणार अशी अहंकाराची भाषा,,यामध्ये सुरेश स्वतःचे नुकसान करून घ्यायचा रमेश मात्र कोणी सांगितलेल्या आपल्या चुकांना स्वीकारून त्यातून शिकण्याचा प्रयत्न करत असे,
जेव्हा सुरेश मौजमजा करायचा तेव्हा रमेश मात्र मेहनत करत असे, काही वेळासाठी सुरेशला मिळणार्या गोष्टीचा रमेशला हेवा वाटायचा पण त्याने त्या गोष्टींना कधीचं स्वतःवरती ताबा मिळवू नाही दिला आणि खूप कॉम्प्लिकेटेड असलेल्या आयुष्याला साध्या आणि सरळ पद्धतीने जगायचा….सुरेशचे मात्र तसे नव्हते साध्या आणि सरळ आयुष्याला सुरेशने स्वतःच खूप कॉम्प्लिकेटेड करून घेतले नको त्या व्यसनांनी सुरेशला पूर्णतः जखडून टाकले.
सुरेशला त्यामुळे शारीरिक स्तरावरती नुकसान तर झालेच पण हातात असलेले अनमोल आयुष्य असेच निघून जायला लागले आणि सर्व काही असून सुद्धा सुरेश ला कोणत्याही बाबतीत रस उरला नाही नको त्या विचाराने सुरेशचे मानसिक खच्चीकरण व्हायला सुरुवात झाली, आणि दिवसेंदिवस सुरेशला आपल्या आयुष्याचा कंटाळा यायला लागला ,जगण्याचा रस संपण्याच्या मार्गावर असलेल्या सुरेश कडे पश्चातापाशिवाय पर्याय नव्हता आणि सतत आत्महत्येचा विचार करणारा सुरेश छोट्या छोट्या दुःखाशी सामना करण्याची हिंमत हरवत चालला आणि दुःख वेदना सहन न झाल्यामुळे एके दिवशी आयुष्याशी कंटाळून स्वतःच्या जिवाचा स्वतःच्याच हातून अंत करून मोकळा झाला…
मित्रहो, यामध्ये रमेश पेक्षा सुरेशचे आयुष्य फार साधे आणि सरळमार्गी होते परंतु आपण आपल्या आयुष्यात काय करतो, किंवा आलेली परिस्थिती कशी हाताळतो आणि त्यातून काय धडा घेतो हे खूप महत्त्वाचे आहे सुरेशचे आयुष्य सरळ मार्गी होते परंतु असलेल्या वैभवाची किंमत आणि परिस्थिती बेताची असली तरी आशा न सोडणारा…. रमेश परिस्थिती कशीही असू द्या परंतु मनस्थिती स्थिर असली ना की… आयुष्य बहरत जाते.. परंतु साध्या सरळ आयुष्यात अनेक वळणं लागतात …..कुठे थांबा ….कुठे चालावं…. व कोठे वेग वाढवायचा कुठे कमी करायचा हे जमलं तर प्रत्येक वळणावरचा आपला प्रवास नेहमीच आठवणीत जपून ठेवावसा वाटेलं ….
बघा आपण जर कुठे जायला निघालो… तर आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे तो रस्ता आपल्याला माहीती असतो परंतु शॉर्टकट घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आपण सरळ झोपा असलेला आपला मार्ग अनेक वळणं घेत घेत पार करतो …आणि जेव्हा त्या जागी पोहोचतो तेव्हा आपल्या लक्षात येते अरे सरळ रस्त्याने गेलो असतो तर बरे झाले असते…. असेच आपल्या आयुष्याच्या अनेक प्रसंगांमध्ये असते काही गोष्टींना आपणचं आपल्या वागणुकीतून अवघड करून टाकतो त्यामुळे आयुष्य आहे प्रत्येक वळण महत्त्वाचे आहे.. परंतु त्या वळणावरून वळताना आपण आपल्या भविष्याची वाट तरं लावत नाहीय ना एकदा स्वतःच्या मनाला विचारून बघावे….!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


