Skip to content

सर्वच म्हणतात अतिविचार नको करू, पण त्यासाठी नेमकं काय करू ?

सर्वच म्हणतात अतिविचार नको करू, पण त्यासाठी नेमकं काय करू ?


मयुरी महेंद्र महाजन


विचार ही मानवाला लाभलेली सर्वात मौल्यवान गोष्ट आहे, अन्यथा विचारचं नसते ,तर मानवाच्या आयुष्याला काही अर्थच नसता, कारण सुरुवातही विचारा पासूनच आहे, आणि अंतही विचारातच आहे, परंतु आपण करत असलेल्या विचाराला काही शिस्त आहे का???? काही मर्यादा आहेत का????? नाही,

कारण विचारांना शिस्त लावायची आपण शिकलेलोचं नाही, अन्यथा कोणी यासाठी कधी आपल्याला सांगितलेले सुद्धा आठवत नाही, कुठलीही गोष्ट कृती होण्या अगोदर, ते विचारात होते ,म्हणजे विचार करणे हीसुद्धा आपली कृती आहे, त्यात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन भागांमध्ये त्याचे वर्गीकरण केले जाते ,

विचार करणे, आणि सकारात्मक पद्धतीने विचार करणे, चांगले विचार करणे, खूप चांगली गोष्ट आहे, परंतु अतिविचार ज्याला इंग्रजीत( ओव्हर र्थिंकिंग over thinking) म्हटले जाते ,आजकाल बरीच मंडळी या समस्येने वेढलेली बघायला मिळतात, जी व्यक्ती या समस्येत असते, त्या व्यक्तीला मात्र ही समस्या नसून आपल्या स्वभावाचा किंवा आपल्या सवयीचा भाग वाटतो, लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच कुठे ना कुठे यात अडकलेले असतात,

पण येथे प्रश्न पडतो? की सर्वच म्हणतात अति विचार नको करू, परंतु अति विचार नको करू, पण त्यासाठी नेमकं काय करू, हे मात्र सांगायचं टाळतात ,परंतु आपण आज समस्याच नाही, तर काय उपायांनी समस्या सुटू शकते, ते बघू….

सर्वप्रथम समजून घेऊ, की अति विचार करणे, म्हणजे काय ?????तर ज्या गोष्टींचा विचार करून काहीही फायदा नाही, अशा गोष्टी किंवा घटना, प्रसंग ,अशा नको त्या विषयांवरती वारंवार विचार मग्न असणे आणि त्यातून आऊटपुट काय ???तर काहीच नाही,,, बऱ्याचदा आपल्यालाही कळालेले असते ,की आपण अती विचार करून काहीही फायदा नाही,

तरीसुद्धा आपण अति विचार करणे सोडू शकत नाही, जणू काही आपण प्रयत्न करूनही आपण त्यावरती आपली पकड करू शकत नाही, त्या गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या वाटू लागतात, आपल्या प्रत्येकाच्या मेंदूमध्ये (सिरोटानिन) नावाचे एक निरो ट्रान्समीटर आहे, जे की आपल्या प्रत्येकाच्या मनाला शांत ठेवण्याचे काम करतो,

परंतु जर याच्या प्रमाणामध्ये थोडाफार जरी बदल झाला, तरी व्यक्ती मध्ये सामान्य चिंता विकृती आढळून येते, अतिविचार ही समस्या वाढत जाऊन चिंता विकृती चे रूप घेते, त्यामुळे जर आपण वेळीच आपली समस्या आटोक्यात ठेवली, तर नव्याने वाढणार्‍या समस्या ऐथेचं थांबतील ,अतिविचार थांबवण्यासाठी नेमकं काय करायला हवं…….

एक -चिंता न करता चिंतन करायला हवे, छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा आपण इतकी चिंता करतो, कसे होणार, कधी होणार, झालेचं तर बरोबर होईल का??? असे कितीतरी प्रश्न मेंदूला अजून पोखरायला सुरुवात करतात, हे आपण थांबवायला हवं ….

दोन- शक्य तितके वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा, उद्याचं, उद्या, उद्याच्या नादात आपला आज वेस्ट होतोय, त्याचं काय??? आपला आनंद, आपले जीवन ,हे आज मध्येचं दडलेले आहे ,त्यामुळे आपल्या आजच्या दिवसाला कसे छान करता येईलं, यावर काम करा,

तीन – फालतुच्या गोष्टींचा विचार करणे थांबवा, ज्या गोष्टींचा आपल्या जीवनासाठी आपल्यासाठी काहीही उपयोग होणार नाही, असे जाणवेलं, त्याच वेळी त्या गोष्टींचा विचार थांबवा,

चार- (म्युजिक) गाणी ,(मेडिटेशन)ध्यान, आपल्याला रोजच्या आयुष्यात आपण कुठल्याही पद्धतीचे संगीत ऐकू शकता, ज्यामुळे मेंदू ती गाणी गुणगुणत, आपल्या चिंतेला कधी छूमंतर करतो, कळणारंसुद्धा नाही, आणि ध्यान मेडिटेशन मेडिटेशन केले, तर आपल्याला याचे भरपूर फायदे होतात, जसे झोप चांगली येते, सकारात्मकता अनुभवास येते, आणि महत्त्वाचे आपले मन स्थिर होऊन, आपल्या एकाग्रतेने मध्ये वाढ होते ,कारण की अति विचार करणाऱ्यांच्या बाबतीत त्यांचा मेंदू हा झोपेत सुद्धा विचारच करतो, त्यांना कधीच रिलाॅक्स वाटत नाही, एकाग्रता जाणवत नाही,

पाच- रिकामे बसू नका, असं म्हणतात की’ खाली दिमाग शैतान का घर होता हैं’ जर अतिविचाराची समस्या सोडवायची असेलं, तर सतत स्वतःला कुठल्यातरी कामांमध्ये व्यस्त ठेवा, काहीतरी नवीन टास्क स्वतःसाठी बनवा, आपले छंद, आवड, जोपासा, ज्या गोष्टीत आनंद वाटतो ,त्या गोष्टी करा, परंतु स्वतःला गुंतवून ठेवा, कारण मोकाट सोडलेले जनावर असो, की मन, कुठे भरकटेलं, सांगता येत नाही,आवर घालायचा असेलं, तर तसे आवरण तयार करणे गरजेचे आहे, झालेल्या गोष्टी आठवू नका ,उद्याची चिंता करू नका,

आपल्या आजच्या दिवसाला मात्र पूर्णपणे जगाला विसरू नका, विचार नक्की करा, पण अती विचार नको, कारण जेथे अति लागले, तेथे माती निश्चितच….. विचारांना शिस्त लावताना जड जाईलं, पण एकदा लागली तर मात्र सोप होईल, कारण विचार ही आपल्या सोबत निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, आपण त्यापासून पळ काढू शकत नाही, पण त्याची दिशा मात्र आपण नक्की ठरवू शकतो….!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!