Skip to content

सर्रासपणे आई-बाबांना मूर्ख बनवून आजची तरुण पिढी गंडवत आहेत!!

सर्रासपणे आई-बाबांना मूर्ख बनवून ही तरुण पिढी गंडवत आहे!!


लालचंद कुंवर

उरुळी कांचन, पुणे.


सध्याच्या काळात अगदी घरोघरीं म्हटलं तरी चालेल, एक घोड नवरा अणि एक घोड नवरी सर्रास पाहायला मिळतात. काय म्हणता ? हो , कारण आजही काही भागात, लग्नाच्या वयात लग्नं न करता, पुढे कितीतरी वर्ष अविवाहित असलेल्यांना घोड नवरा किंवा घोड नवरीच म्हटलं जातं.

पूर्वी अगदी मुलीला नहान आल म्हंजे …. ! मासिक पाळी , आली रे आली…. ! की वर संशोधनाला सुरुवात व्हायची. आता काळाच्या ओघात तस् काही राहिलं नाही. आज या सर्व अनिष्ट गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून समाजाने कालबाह्य ठरवल्यात….. ! अणि ते निरोगी समाज व्यवस्थेसाठी सुसंगतही आहे .

पण सध्या 18 अणि 21 ह्या वयाची सीमारेषा ओलांडूनही अगदी तिशी ओलांडली तरी…. ! ढिम्म आहेत.! जागची हलायला तयार नाहीत. . ! आजचे युवक युवती. हल्ली वयात लग्न न होण्याची अर्थात न करण्याची ढीगभर कारण घेऊन लोकं बसली आहेत. पण आज आपण अशा कारणांचा ऊहापोह करणार आहोत, की समाज त्याच्याकडे डोळेझाक करून बसला आहे.

आजकालच्या मुलं मुली हे ‘लग्न ‘ या गोष्टीला महत्त्व न देता , ‘ चूल आणि मूल ‘ ह्या संकल्पनेला दुय्यम ठरवून ‘रोटी , कपडा और मकान ‘ याच्या पाठीमागे रेसच्या घोड्याप्रमाणे धावत आहेत .

आणि हे साध्य करण्यासाठी करिअर ओरिएंटेडला का एवढी priority दिली जात आहेत ? गरजा आणि प्रायॉरिटी आम्ही बदलू पाहत आहोत का ? का आम्ही खरंच एवढे Workholic झालो आहोत ? का आधुनिकतेचा बुरखा पांघरून , निसर्ग नियमांना पायदळी तुडवत आहोत ?

हो ,सर्व मान्य आहे . आता काळ झपाट्याने बदलत आहे. बदलत्या काळानुरुप मुलं मुली , आज आधुनिक विचारांचा वारसा घेऊन जगताहेत. अणि त्यात भरीस भर म्हणून शिक्षणानं त्यांना स्वतंत्र विचारप्रणाली आणि निर्णय घेण्याचा हक्कच जणुकाही बहालही केला आहे, अणि हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

पण या गोष्टीचाही आम्ही डोळसपने विचार केला पाहिजे की, ‘ लग्न आणि करिअर, ‘ या दोन ही गोष्टी जशा एकमेकांना पूरक आहेत, तशीच त्यांची सांगडही चुकीच्या पद्धतीने घालता कामा नये म्हणूनच ‘ लग्न आणि करिअर, या दोन्ही गोष्टींचा आरंभ हा योग्य वेळी आणि योग्य वयातच होण गरजेचं आहे. नाहीतर निसर्ग त्यांचं काम चोख बजावतो अणि एक सणसणीत चपराकही लगावतो.

तस ‘ लग्नसंस्थेला ‘ हादरे देणारी ढीगभर कारण घेऊन हा समाज अणि आजची तरुण पिढी जगतेय. त्यातली किती कारण रास्त ! किती तकलादू ! हा एक आणखी स्वतंत्र विषय होईल.

समाज हे लक्षात घेत नाही… ! कळतं पण वळवून घेत नाही… ! ज्या ज्या वेळी निसर्ग नियमाच्या विरुद्ध मानवाने पाऊल उचलले, त्या त्या वेळेस निसर्गाने मानवाला त्याची किंमत अदा करण्यास भाग पाडले आहे.

ज्या गोष्टी, जे प्रसंग फक्त आम्ही ऐकून असायचो, आज त्याच घटाना तेचं प्रसंग आपल्या घरादारात घडू पहाताहेत…… ! मग कधीतरी या अशा घडू पाहणाऱ्या प्रसंगांकडे कडे अंतर्मुख होऊन पाहणार आहोत की नाही ?

सर्रासपणे सर्वत्र असच घडतं असे म्हणता येणार नाही अणि ते उचितही नाही. पण काही प्रमाणात नक्कीच, आजची तरुणाई आई-बाबांना मूर्ख बनवून, त्यांच्या डोळ्यात धूळफेक करून , त्यांना छान पैकी गंडवत असतात.

मग मुलगा असो की मुलगी, ‘ प्रेम ‘ या गोंडस नावाखाली घर सोडून पळून जाण …… त्याचबरोबर इतर गरजांप्रमाणे, योग्य वयात शारीरिक गरज पूर्ण होण , हे जसं नैसर्गिक आहे . मग ती गरज पूर्ण करून घेण्यासाठी , लग्नसंस्था अस्तित्वात आहे, पण ज्यांची लग्नच आठ-आठ दहा-दहा वर्षे उशीरा होतात मग प्रेमाच्या नावाने सुरु होतात अश्लील चाळे इ……..

‘ गर्लफ्रेण्ड किंवा बॉयफ्रेण्ड ‘ असण भूषणवाह वाटणं…….,कधीकधी एकतर्फी प्रेमाला बळी पडण……… ,काहीवेळा प्रियकर प्रियसी यांच्यात ब्रेकअप होणं……..,मग अगदी नॅपकिन बदलतो तस GF अणि BF बदलत राहणं………

मग हे सर्व वियोग विसरण्यासाठी, ‘अगर तेरा गम ना होता तो मै शराब ना पिता ‘ यासारख्या गाण्यांचा कृतीयुक्त आधार घेण……., काही ठिकाणी अपवादात्मक स्थितीत डिप्रेशन मध्ये येऊन काहीतरी टोकाचा निर्णय घेण………,

किंबहुना प्रियसीचं लग्न झालं तरी ‘ तू हा कर या ना कर , तू है मेरी किरण ‘, याप्रमाणे तिच्या वैवाहिक आयुष्याला गालबोट लागेल, अशी हिणकस वृत्ती बळावण……… , इत्यादी. खरं तर अशी खुप लांबलचक यादी तयार होईल.

तरी वरील कारणांच्या मुळाशी गेल तर, हाती एक गोष्ट हमखास लागते,

ती म्हणजे, लग्न वेळेत न होण्याचे हे सर्व जिवावर बेतणारे side effects तर नाहीत ना ! अणि त्याचेच परिणाम समाज अणि काही युवक युवती भोगत तर नाही ना … !

कारण म्हातारी मेल्याच दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये.

समाप्त


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!