Skip to content

समोरच्याने मला समजून घ्यावं..हे असं वाटणं घातक आहे का?

समोरच्याने मला समजून घ्यावं..हे असं वाटणं घातक आहे का?


आकांक्षा किरणराव आळणे,

लातूर.


माणूस हा भावनांनी ओतप्रोत भरलेला असतो .स्वतः कडून एक वेळ कमी अपेक्षा ठेवतो,पण इतरांकडून मात्र खूप साऱ्या इच्छा-आकांक्षा असतात आपल्याला.उदाहरण म्हणजे-माझी विचारपूस व्हावी,माझे कौतुक व्हावे,अश्या अपेक्षांपैकी च एक म्हणजे मला समजून घ्यावे..!!प्रत्येक जण आपल्याला समजून घेईल असे तर होणे शक्य नसते.पण काही लोकं असतात ज्यांना आपण मानतो,consider करतो त्यांच्याकडून ही अपेक्षा आपल्याला हमखास असतेच.पण अनेकदा आपलेच लोक आपल्याला समजून घेत नाहीत परिणामी आपण खूप निराश होतो.

आयुष्याचं बरेच दुःख कमी होतात जर गोष्टी समजदारपणे हाताळता आल्या तर…!! कधी आपण स्वतः समजून घ्यावे लागते समोरच्याला, त्याच्या परिस्थितीला-तर कधी कधी आपल्याला पण अपेक्षा असते की समोरच्याने आपल्याला समजून घ्यावे पण असे नेहमी घडेल च असे होत नाही ना मित्रानो म्हणून तर आपल्याला त्रास होतो.अगदी जीवा भावाचे नाते त्यांच्याकडून ही माफक अपेक्षा असते की निदान त्यांनी तरी समजून घ्यावे आपल्याला.

पण अश्या आपल्या विश्वासातल्या लोकांकडून कधी कधी ही अपेक्षा पूर्ण होत नाही.मैत्रीचे नाते,विश्वासाचे नाते,प्रेमाचे नाते ज्यांना आपण एवढे जपतो,एवढे मनापासून हे सर्व नाते निभावत असतो पण ज्या वेळी समजून घ्यायची वेळ येते,मानसिक आधार देण्याची वेळ येते तेव्हा तो पाठिंबा तो समजूतदारपणा आपल्याला समोरची व्यक्ती दाखवेल च असे घडत नाही आणि मग पहिले तर shock होतो आणि नन्तर हताश होतो.

एक बेचैनी राहते अनेक दिवस,कुठे तर मन मोकळं करावं,व्यक्त व्हावं आणि समोरच्याने आपल्याला judge न करता ऐकून घ्यावे ही अश्या वेळी आपली अवस्था असते.काय करावं..??कुठे जावं..??कुठे मिळतील ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं..??मला कधीतरी कोणी समजून घेईल की नाही अश्या प्रश्नांनी मन कासावीस होत,स्वतःला कोसत राहतं.खूप च मनाची घालमेल होत असेल,घुसमट होत असेल तर counsellor शी संवाद साधने कधी ही बेस्ट ऑपशन ठरतो मित्रांनो.

मनाच्या अश्या अवस्थेत भावनांना मोकळी वाट करून देने खूप महत्वाचे असते नाहीतर ह्या भावना मनात साठून साठून फार वाईट प्रकारे बाहेर पडू शकतात,ह्याचा परिणाम मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या घातक ठरू शकतो.म्हणून तुम्ही खूप च त्रस्त असाल एखाद्या गोष्टीवरून आणि तुम्हाला समजून घेणारे कोणीच नसेल तर counsellor कडे धाव घ्या.

ह्याच विषयाची दुसरी बाजू म्हणजे समोरच्याने आपल्याला समजून घ्यावे ही आपली अपेक्षा खरच valid आहे का..???का आपण अपेक्षा ठेवायची..??प्रत्येक च जण समजून घेईल हे शक्य नाही.कारण समजून घेण्यासाठी समोरच्या व्यक्तीला कसे अनुभव आलेले आहेत,त्याच्या त sympathy,empathy,compassion ह्या गोष्टी किती प्रमाणात आहेत आणि किती विकसित झाले हे ज्याच्या त्याच्या जीवनातील घटनाक्रम ठरवत असतात.

एखाद्या व्यक्तीने खूप गरिबी बघितली असेल,खूप हलाखीच्या परिस्थितीत तो जगला असेल तर पुढे चालून त्याला एखादा गरीब परिस्थितीने लाचार व्यक्ती भेटला-आपले दुःख सांगू लागला तर ही व्यक्ती समोरच्या व्यक्तीला समजू शकेल कारण तो स्वतःच कधी काळी ह्या परिस्थतीतून गेलेला असतो म्हणून तो समजू शकतो.पण प्रत्येक व्यक्ती दर दुसऱ्या व्यक्तीला समजून घेईल च असे शक्य नाही आणि ही अपेक्षा ही ठेवू नये कारण ती घातक ठरू शकते.प्रत्येकाने आपल्याला समजून घ्यावे ही अपेक्षा ठेवाल तर मनस्ताप,चीड-चीड,बैचेनी ह्या गिष्टींव्यतिरिक्त हाती काहीही लागणार नाही मित्रांनो…!!!

इतरांकडून कमीत कमी अपेक्षा ठेवा ती मग कोणी आपल्याला समजून घ्यावे ह्याबाबतीत असो किंवा दुसऱ्या कोणत्या ही बाबतीत असो;सुखी रहाल…!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!