Skip to content

समविचारी लोकांकडे काहीतरी नवनिर्माण करण्याची क्षमता असते.

समविचारी लोकांकडे काहीतरी नवनिर्माण करण्याची क्षमता असते.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


ऋषिकेशची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती. ज्यामध्ये तो लग्न, विविध समारंभ, पार्टी ऑर्गनाइज करत असे. एक दिवस त्यांच्याकडे एका लग्नाचा इव्हेंट आला. त्या जोडप्याला डेस्टिनेशन वेडिंग हवं होतं. पण एकदम unique. जसं याआधी कोणी केलं नसेल. म्हणून त्याची सर्व जबाबदारी त्यांनी ऋषिकेश वर टाकली. त्यांना सर्व ठरवायचं होतं.

डेकोरेशन पासून थीमपर्यंत. ऋषिकेश ची टीम यावर कामाला लागली. त्यासाठी त्यांना एक basic प्लॅन तयार करायला लागणार होता. म्हणून त्यांनी मीटिंग अरेंज केली. पण जेव्हा मीटिंग सुरू झाली तेव्हा त्यात प्रत्येकाचे मत वेगळे होऊ लागले. कोणी एका मतावर एका विचारावर येईना. ऋषिकेशला समजा अमुक एक प्रकारचे डेकोरेशन चांगलं वाटत असेल तर त्याच्या टीम मधल्या माणसाला वेगळच काहीतरी वाटत होतं. ते कोणत्याही एका विशिष्ट थीम वर येत नव्हते. त्यांना त्यांचा प्लॅन त्यांच्या क्लाइंट समोर मांडायचा होता.

पण प्लॅन तयार होण्यासाठी सर्वांचे विचार जुळायला लागणार होते ते काही केल्या जुळेनात. बरं जरी विचार वेगळे असले तरी त्यातील एखाद्या कोणाचातरी वेगळा विचार आहे, चांगला आहे असं म्हणून त्यावर पण कोणाच एकमत होत नव्हतं. याचा परिणाम असा झाला की डेडलाईन येऊन पण त्यांचा प्लॅन काही तयार झाला नाही. त्यामुळे क्लायंटकडून निराशा मिळाली.

माणूस म्हटल्यावर प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात हे खर आहे. परंतु जर आपण एका टीममध्ये काम करत असू तर तिथे समविचारी असणं फायद्याचं असतं. त्यातून एक चांगली टीम तयार होते व त्यांच्या हाती सोपवलेले काम पण चांगल्या पद्धतीने केला जातो.

माणसाची मूळ प्रवृत्ती पण अशीच आहे की जिथे आपले विचार जुळतात, जिथे आपलं मत जुळतं तेथे आपण जास्त आकर्षित होतो. त्या लोकांसोबत राहणं आपण जास्त पसंत करतो. जिथे आपले विचार जुळत नाही त्या लोकांसोबत आपण फार काळ राहत नाही. जेव्हा एकमेकांचे विचार जुळतात तेव्हा तेवढी मॅनपावर तयार होते आणि त्या संघाला तेवढी बळकटी मिळते.

त्यामुळे त्यांच्याकडून चांगले, काहीतरी नवीन असे निर्माण होते. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये बरेचदा टीमवर केले जाते. तिथे जर विचार जुळत नसतील तर दिलेले काम प्रभावी होत नाही त्याचे कारण त्यांचे कशावर एकमत होत नसते आणि जर एकमत झाले नाही तर प्लॅन एक्झिक्युट करणार कसा?

अनेकदा भांडणे होण्याची कारण ही यातच असतात ची विचार जुळत नसतात व वेगळ्या विचारांना सामावून घेण्याचा accpetance नसतो. आपण एकट्यानेच काम करू शकत नाही ते बाकीच्या लोकांच्या सहाय्याने चांगल्या पद्धतीने जमून येते. पण केव्हा? जर आपले विचार समान असतील तर. जर आपले विचार समान होत नसतील तर घेतलेले कामही नीट होत नाही.

मोठमोठे संघ, कंपनी उभे राहतात कारण त्यांचे विचार कुठेतरी जुळलेले असतात. म्हणूनच तुम्हालाही काहीतरी नवनिर्माण करायचे असेल, काहीतरी चांगलं घडवायचं असेल तर तुमचा एकविचार होण गरजेच आहे. अनेक एनजीओ, समाज सेवी संस्था यांचा एकविचार जोडलेला असतो तो म्हणजे समाजाच कल्याण करणे, लोकांसाठी उभे राहणे. अशाच पद्धतीचे जेव्हा विचार एकत्र येतात समान विचार एकत्र येतात तेव्हा काहीतरी चांगलं घडत असत. इतकी ताकद समविचारा मध्ये आहे.

पण दरवेळी आपले विचार समोरच्याला पटतील किंवा समोरच्याचे विचार आपल्याला पटतील असं होत नाही. काही वेळा वेगवेगळ्या विचारांच्या लोकांसोबत पण आपल्याला काम करावं लागतं.

अशा वेळी हे योग्य ठरतं की समोरच्याचा दृष्टिकोन समजावून घेणे आणि आपला विचार योग्य पद्धतीने मांडणे आणि त्या दोन्ही विचारांचा वर काम करून एक विचारावर येणं. ते तुमच्या ग्रुपला, तुमच्या संघाला बळकटी देण्याचे काम करत.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!