समजून सांगूनही जर समजत नसेल तर स्वतःला एवढच सांगा की तो माणूस समजून घेण्यापलिकडचा आहे.
हर्षदा पिंपळे
उदाहरण क्रमांक-१
“अगं सरिता तुला कितीदा समजून सांगायचं…?? आता पन्नाशीत आलीस तु.वयानुसार कोणती ना कोणती दुखणी उद्भवायचीच.पण त्याकडे असं दुर्लक्ष करून कसं चालायच…? वैद्यांकडे जाऊन एकदा तपासणी करून घ्यायला हवी तुला.नाहीतर दुखणी अधिकच वाढतच जातील.आणि पैशाच काय…? आत्ता तपासणी केलीस तर उपचाराचा खर्च कमी असेल पण हेच जर असच सातत्याने दुर्लक्ष करत राहिलीस तर काहीतरी गंभीर दुखणं अंगाशी यायच.आणि मग तेव्हा तर पैशाचा विचार करूनही चालायच नाही गं.ऐक, जा त्यापेक्षा आत्ताच जाऊन ये डॉक्टरकडे.सगळ्या तपासण्या वेळच्या वेळीच झालेल्या बऱ्या असतात. ”
मीनाक्षी तिच्या मैत्रिणीला अर्थात सरिताला हे सांगून सांगून अक्षरशः दमली.
उदाहरण क्रमांक-२
समीर आणि मधु एकाच महाविद्यालयात एकाच वर्गात शिकत होते.तशी दोघांमध्ये मैत्रीही होती.आणि मधु दिसायला खूप सुंदर होती.तिचं बोलणं-चालणं समीरला हळुहळू आवडायला लागलं.तिचा सहवास, तिची मैत्री समीरला हवीहवीशी वाटू लागली. पण मधुच्या मनात तसं काहीच नव्हतं.आणि मधु ही एक money minded मुलगी होती. केवळ पैसे-गाड्या-बंगले-मोठमोठ्या पार्टीज् या गोष्टी मधुला खूप प्रिय होत्या.त्यामुळे ती ज्याच्याकडे पैसा त्याच्याशी खूप गोड गोड बोलायची. आणि याच गोड बोलण्याला समीर भुलला होता.समीर खूप हुशार आणि अभ्यासू मुलगा होता. शिकता शिकता तो एका कंपनीत नोकरीही करत होता.
पगारही तसा चांगलाच होता.पण मनाने मात्र तो जरासा साधा सरळ होता.त्यामुळे मधुच्या गोड गोड बोलण्यातील काळंबेर कधी समीरला समजतच नव्हतं.मित्रांनी कित्येकदा समीरला सांगितलं की ” अरे समीर ,ती मधु फक्त तुझ्या पैशावर मोहीत आहे.तुझ्या पैशाने तिला मोहीनी घातली आहे. तिच्यासाठी मैत्री वगैरे काही नाही. तिच्यासाठी आहे तो केवळ पैसा.एकदा तुझे पैसे संपले की ती तुलाही ditch करेल.त्यामुळे वेळीण सांगतोय ऐक आमचं.तिच्यात गुंतून जाऊ नको.पुढे जाऊन तुलाच खूप त्रास सहन करावा लागेल.”
“किती समजवायच याला…??” असं म्हणून म्हणून समीरचे मित्रही वैतागले. (शेवटी काय तर समीर प्रेमात आकंठ बुडाला होता.त्याला समजावणं कठीणच होतं.)
पहा..अशा प्रकारची कितीतरी उदाहरणं आपल्या आयुष्यात आपण अनुभवत असतो.अशी काही लोकं असतात ज्यांना कितीही समजावलं तरी समजत नसतं.मुळातच आपण काय बोलतोय हे ते अनेकदा समजूनच घेत नाही. आपण जीवाच्या आकांताने एखादी गोष्ट समजवायला जातो पण त्याचा काही उपयोग होतच नाही.
शेवटी एखाद्याला समजावून आपणच कंटाळतो. किती समजवायच याला…?असं म्हणून मूग गिळून गप्प बसतो.अशावेळी दुसरा काही पर्यायच आपल्याकडे उपलब्ध नसतो.खूप वाटतं आपल्याला की याला कुणीतरी समजवायला हवं.आणि म्हणून आपण आपले प्रयत्न संपल्यावर इतरांनाही त्या त्या व्यक्तीला समजवायला लावतो.
“बघ रे,मी समजावून सांगून काहीच झालं नाही. माझं काही तो ऐकतच नाही. निदान तु समजावलं तर तुझं तरी ऐकेल.तुझं म्हणणन तरी त्याला समजेन.” हे असं तर आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतं.वेगवेगळ्या प्रसंगानुरूप हे समजावणं वगैरे ठरलेलं असतं . कारण त्या त्या प्रसंगानुरूप आपल्याला त्या त्या व्यक्तीला घडलेल्या गोष्टीची जाणीव करून द्यावी लागते.
ती जाणीव करून देणं आपल्याला आवश्यक वाटतं.एखाद्याने एकाच ठिकाणी अडकून राहू नये असही वाटतं.अर्थात कुणाचही काही वाईट व्हावं असं आपल्याला वाटत नाही. त्यामुळे काळजीपोटीही आपण एखाद्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो.पण समोरची व्यक्ती त्याला काही प्रतिसाद द्यायला तयारच होत नाही.
पण मग अशावेळी स्वतः खचून-थकून न जाता स्वतःला एवढच सांगायच की ही ही व्यक्ती आपल्या समजून घेण्यापलिकडची आहे.”आपण कितीही समजावलं तरी काहीही होणार नाही.त्यापेक्षा या व्यक्तीला लवकरात लवकर योग्य ती जाणीव होईल.त्या व्यक्तीला कधीतरी आपलं समजावणं पटेल.” अशी आशा स्वतःच्या मनी बाळगून स्वतःलाच ‘आता बस् झालं समजावणं’ असं समजावून सांगा.
कारण काय आहे.. आपलीच जास्तीत जास्त ऊर्जा यामध्ये खर्च होत असते.आणि समोरच्या व्यक्तीला समजत नाहीये याचं दुःख आपल्या मनाला बोचत राहतं.
आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की एक ना एक दिवस त्यांना स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होतोच.आयुष्यभरासाठी त्यांना चांगलाच धडा मिळतो.त्यावेळी कुणीतरी समजून सांगत होतं तर आपण का ऐकलं नाही…. याची खंत त्यांना वाटते.
त्यामुळे समजावून सांगणाऱ्या प्रत्येकाला इतकच सांगणं आहे की तुम्ही जास्त load घेऊ नका.तुमच्या परिने शक्य होईल तितकच समजवा.नाहीतर ही व्यक्ती आपल्या समजून घेण्यापलिकडची आहे असं समजून घ्या.आणि वेळेनुसार प्रत्येक गोष्टीची उत्तरं मिळत असतात. तशीच उत्तरं न समजणाऱ्या प्रत्येकाला मिळतील.
तोपर्यंत तुम्ही आहे ते आयुष्य जगत रहा.वेळ आली की सगळ्या वाटा स्वच्छ आणि स्पष्ट होतील यात शंका नाही.
चला ,हेच थोडं समजून घेऊया.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Pan tya vaktishi aplahi Ayush jodlel asel tar tyachya te sanjib n ghenyane aplyala v ajun javalchya mandana tras honar asel tar?
Khupch chan👍