समजून घेणाऱ्या माणसांनाच लोकं हळूहळू गृहीत धरायला लागतात??
मयुरी महेंद्र महाजन
प्रत्येक माणसाला असं वाटतं की, समोरच्या व्यक्तीने मला समजून घ्यावं, कारण की असं म्हणतात. समजून घेतलं तर कोणीच परकं नसतं, परंतु समजून घ्यायला काहीतरी मर्यादा आहेत, समोरची समजून घेणारी व्यक्ती सुद्धा एक माणूस आहे, त्या व्यक्तीला सुद्धा भावना आहेत ,त्या व्यक्तीलाही दुःख होते ,समोरच्या व्यक्तीची परिस्थिती आपण फक्त बाहेरून बघत असतो,
पण त्यापरिस्थितीत राहून त्या परिस्थितीशी ती व्यक्ती स्वतः लढा देत असते ,सर्वच माणसे सर्वांना समजून घेतीलं, असे होत नाही ,प्रत्येकाची समजून घेण्याची कुवत ही वेगळी असते ,परंतु प्रत्येकाला समजून घेत असताना आपण त्या समजूतदारपणाची काही मर्यादा ठरवलेली आहे का???? हे तरी स्वतःला विचारून बघा….. कधीतरी….. कारण की आपण प्रत्येक वेळेस समजून घेत असू ,तर आपल्याला समोरची व्यक्ती जास्त समजूतदार समजू लागते, आणि मग त्याच पद्धतीनं ती आपल्याशी वागू लागते .
याचे सर्वात मोठे कारण आहे , हे पण असते की समजून घेणाऱ्या माणसांना गृहीत धरले जाते, आणि जर का आपण समजूतदार आहोत, हे पक्क झालं, त्या ठिकाणी आपल्या नावावरती समजूतदार असलेल्याचे लेबल कधी लावले जाते, हे आपल्याला कळत सुद्धा नाही, आणि मग पुढे आपल्याला समजूतदारपणाच्या नावाखाली तेच काम करावं लागतं,
इतकं मात्र खरं, त्यासाठी कुणालाही समजून घेताना आपल्या समजूतदारपणाची मर्यादा आणि त्याविषयी कुणी आपला फायदा घेणार नाही ,याची काळजी घेणे गरजेचे आहे, कारण की आपण समजूतदार आहोत, या नावाखाली समोरची व्यक्ती आपल्या कडून कितीतरी कामे करून घेईल ,आणि समजूतदारपणाच्या गृहितकाखाली वागायला आपल्याला भाग पाडेल ,असे होता कामा नये.
मान्य आहे ,की आपल्या अनुभवाचा कस लावून आपण समोरच्या व्यक्तीला समजून घ्यायला हवं, परंतु हे करत असताना आपण स्वतःला न्याय देतोय, की फक्त एखाद्या अविरत चालणाऱ्या मशीन सारखे प्रोसेसिंग करतोय, कारण किती समजून घ्यायचं, त्याची मर्यादा ठरवलीचं पाहिजे ,समजून घेणारी व्यक्ती सुद्धा मानवच आहे ,ते एखाद्या यंत्राप्रमाणे काम नाही करू शकतं.
एखाद्याला समजून घेणे चुकीचे अजिबात नाही, पण कुठपर्यंत आपण समजून घ्यावे, हे आपण ठरवणे गरजेचे आहे, अन्यथा मीच का? म्हणून समजून घ्यावे, व तेही प्रत्येक वेळेस ,मीच का? का????? असे बोलुन स्वतः वरती चिडणे आणि राग -राग करण्यात आपला वेळ खर्ची करण्यापेक्षा वेळेच्या आधीचं, म्हणजे कोणाच्याही मनात आपले समजूतदारपणाचे लेबल पक्के होण्या आधी जर आपण ते थांबवू शकलो, तर स्वतःबद्दल वैताग येणार नाही.
कधीतरी आपण समजून घेतले नाही ,तर स्वतः बद्दल वाईट वाटण्याचे किंवा गिल्टी फील करण्याचे कारण नाही, मी प्रत्येक वेळेस समजून घेतोस, पण मला नेमके याचवेळी का कळले नाही, मीचं मूर्ख आहे! मी समजून घ्यायला हवे होते, असं म्हणून सुद्धा स्वतःच्या नजरेत पडू नका, कारण प्रत्येक वेळा समजून घेणे, ही जरी आपली प्रतिक्रिया असली, तरी कधीतरी समजून घेणे ही मानवी मनाची भावना आहे, अरे माणूस भाव-भावनांनी युक्त आहे, तो आपल्या भावना ह्या मांडणारचं,मन मारुन कुणाला समजून घेण्यापेक्षा स्वतःच्या खर्या भावना मांडणेसुद्धा खूप गरजेचे आहे ,कारण भावनांचा भरलेला बांध कधीतरी सुटतोचं.
लोक गृहीत धरून बाजारात विकतील इतके स्वतःला स्वस्त करू नये, काही गोष्टींच्या पडद्याआड आपल्याला माहिती नसणारी खलबतं सुरू असतात, जर आपल्याला गृहीत धरणारे व्यक्ती व्हायचे नसेलं, तर आपल्याला जाणवणारी गोष्ट स्पष्टपणे बोलायला शिका. कारण की निर्णय कुठलेही असो ,आपले मत जर कोणी विचारले , तरी बरं वाटतं , मग त्यात साधेसे हाॅटेलला गेल्यावर तुला काय खायचे आहे, किंवा पुढे तुला काय करायचे आहे, हे असो , मताला आयुष्यात प्राधान्य आहे, आपल्याला गृहीत धरून घेतलेला निर्णय मनाला पटतं नाही ,किमान विचारायला तरी हवं होतं ,असं माणूस पटकन म्हणतो, ते यासाठी की आपल्या अस्तित्वाला आपण जपतो, जाणतो, आणि बाकी सर्वांकडूनही आपल्या सर्वांनाचं तीच अपेक्षा असते,
हा आता, हा भाग वेगळा की बऱ्याच ठिकाणी असे बघायला मिळत नाही, त्यात समजून घेणार्यांना गृहीत धरले जाते ,हे खूप मोठे कारण आहे,कियेला न मिळालेली प्रतिक्रिया ती क्रिया पुढे नेत असते, आपणच ठरवायचं आपण आपल्या समजूतदारपणाला नेमकं कुठे आणि कुठपर्यंत घेऊन जाणार….!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

लेख आवडला