Skip to content

समजत असते अपेक्षा ठेवू नयेत तरी ही अपेक्षा का ठेवतो ?

समजत असते अपेक्षा ठेवू नयेत तरी ही अपेक्षा का ठेवतो ?


सोनाली जे


किती सतत आपण अपेक्षा या भोवती घुटमळत असतो ना ??
त्याने / तिने माझ्याशी असे वागावे . ते माझ्याशी असे का वागले. .
मला वाटले ते माझा विचार करतील. मला पार्टी ला बोलावले नाही.
माझ्या गरजा काय कोणी समजून घेत नाही.
मी कॉलेज मधून दमून येते एव्हढे समजत नाही का की आल्या आल्या मला काही कामे सांगू नयेत.
मी ऑफिस मधून दमून येतो आल्या आल्या गरम वाफाळता चहा मिळत नाही .. किंवा रोज मिळतो पण कधी बायको बाहेर गेली असेल तर मिळत नाही. मग रोज मिळते आणि त्या दिवशी माझी अपेक्षा असून मिळाले नाही. म्हणून चिडचिड होते.

परवा एक नवीन च अतिशय हुशार व्यक्तिमत्त्व जवळून बघायला मिळाले. RTO मध्ये गेले होते. Permanent licence करिता . पहिली टेस्ट झाली. दुसऱ्या टेस्ट ला आरटीओ इन्स्पेक्टर बसले होते तिथे गाडी थांबवून आपले नाव सांगून परत चढ चढून तिथे थांबून मग परत उतार आणि परत RTO inspector कडून सही घेवून येणे दुसरी टेस्ट पास झाल्याची. गेले सही घेताना त्या इन्स्पेक्टर ने अचूक नाव सांगितले. माझेच नाही येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक candidate चे.

मला विचारले तुम्ही काय करता. मी म्हणलं psychologist आहे तर खरेच का असे परत परत विचारून खात्री केली. आणि मग सुरुवात केली माझ्या घरात कोण पेशंट आहे हे ओळखायचे. कधी वेळ देता. म्हणले कधी तुम्ही ठरवा वेळ कधी तेव्हा भेटुयात सगळे. मग म्हणले माझ्याकडे बघून काय वाटते ? मी नॉर्मल आहे का ? हो म्हणले . मग म्हणले इथेच चुकतात लोक.

तेवढ्यात इन्स्पेक्टर त्यांचा जो assistant होता त्याला फोन आला म्हणून तो फोन वर बोलू लागला. आणि हे इन्स्पेक्टर मला म्हणाले हे असे कोणी फोनवर बोलयला लागले की मी चिडतो ..आणि काही वाट्टेल ते बोलतो. पण काही वेळानंतर माझ्या मनात काहीच नसते. पण समोरचा मात्र माझ्या बद्दल मत वाईट करून घेतो.

तो विषय थांबून पुढे बोलत होतो तेवढ्यात एक मुलगी two wheeler ची permanent test देण्या करिता आली. तिच्या गळ्यात ब्ल्यू tooth. हातात स्मार्ट वॉच. इन्स्पेक्टर चिडले मला च विचारले की तुम्ही इथे आलात सगळे लायसेन्स काढण्याकरिता तेव्हा मी सुरुवातीला काही सूचना दिल्या होत्या सांगा त्या काय होत्या.
मी म्हणले
१ . मोबाईल बंद ठेवा. किंवा सायलेंट वर ठेवा. तोही bag किंवा purse मध्ये.
२. स्मार्ट वॉच काढून ठेवा.
३. Blue tooth, handsfree सगळे काढून बॅग मध्ये ठेवा.

त्या मुलीला रागाने म्हणले तुझी टेस्ट आता नाही होणार. पुढच्या वेळी ये. . Reject लिहिले. तसे सीट बेल्ट नसलेल्यांना ही बाहेर काढले. ते Reject.

यानंतर मला इन्स्पेक्टर म्हणले बघा माझे सहकारी असे करत नाहीत जावू देत म्हणून. सोडून देतात. पण मी असा नाही. तेव्हा समजावले त्यांना तुम्ही योग्य तेच करत आहात. तुम्ही duty वर असताना जे नियम आहेत तेच फॉलो करत आहात. आणि ते केलेच पाहिजेत . कारण आता तुम्ही या शिकावू candidates ना मुभा दिली तर ते अजून तसेच वागणार. याउलट आता strict राहिलात तर पुढे ही ते नियम follow करतील.

यात त्यांना सांगायचे होते की बाकी इन्स्पेक्टर यांच्या कडून त्यांनी आपल्या सारखेच वागावे अशी अपेक्षा करत होतें . आणि हे candidate नी नियम पाळावेत या करिता अपेक्षा बाळगत होते. खरे तर बघा ना प्रत्येकजण आपल्या आपल्या ठिकाणी योग्यच होता. पण प्रत्येकाची दुसऱ्याकडून अपेक्षा होती.

पुढे याच RTO.inspector नी सांगायला सुरुवात केली की माझ्याकडे सगळे काही आहे , पैसा , घर , मुले बायको, पोझिशन, इंजिनिअर आणि MPSC करूंन इकडे जॉईन झालेले हे इन्स्पेक्टर . सगळे काही आहे पण तरी अजून काही तरी कमी आहे. काही तरी अपेक्षा आहे. ती काय हेच समजत नाही.

हळूहळू बोलण्यातून काय कमी आहे म्हणजे काय अपेक्षा आहेत हे शोधून काढले. जसे की त्यांची प्रचंड हुशारी एकदा एकाने नाव सांगितले की कायम लक्षात. वाचन प्रचंड . रोजचा व्यायाम . पळणे . सगळ्या भाषे मधल्या movies बघितल्या आहेत. बघत असतात. आयुष्यात काही करायचे राहिले आहे असे ही नाही.

पण मग बोलण्यातून लक्षात येवू लागले की हे स्वतः प्रचंड हुशार , प्रत्येक गोष्ट लक्षात राहते तसे प्रत्येकाच्या ही लक्षात प्रत्येक गोष्ट राहिली पाहिजे ही अपेक्षा. ते रोज running ला जात बायको ने त्यांच्या सोबत running करावे ही अपेक्षा. इतक्या अनेक गोष्टी करून ही ते कायम फ्रेश असतात अजून काही करण्याची इच्छा असते . बाकीच्यांनी ही तसेच राहिले पाहिजे. अनेक गोष्टी केल्या पाहिजेत ही अपेक्षा असतें पण बाकीच्यांना ते जमत नाही .

म्हणजे खरे तर एव्हढा यशस्वी व्यक्ती , versatile personality, आयुष्यात सगळे काही असून ही काही तरी अपेक्षा आहेच . पण आधी स्वतः त्या गोष्टी करत असतात. अवलंबित असतात आणि तरी ही इतरांनी तसेच केले पाहिजे ही अपेक्षा त्यांना अस्वस्थ करते.

समजत असते अपेक्षा ठेवू नयेत तरी ही अपेक्षा का ठेवतो ?

कारण आपल्याला कुठे तरी मनापासून वाटत असते की तशी अपेक्षा ठेवली तर मनासारखे , आपल्याला पाहिजे तसे घडेल. आपल्या इच्छा असतात त्या पूर्ण होण्याकरिता , करण्याकरिता दुसऱ्याने आपल्या मनासारखे वागावे , करावे .. पण तेव्हा आपण हे का विसरतो त्यांची ही त्यांच्या पद्धतीने वागण्याची अपेक्षा असेल . काही गोष्टी त्याच पद्धतीने किंवा काही लोकांच्या करीतच करण्याची त्यांची इच्छा असेल आणि ते त्याच पद्धतीने पूर्ण करण्याची अपेक्षा असेल.

समजत असते अपेक्षा ठेवू नयेत तरी ही अपेक्षा का ठेवतो ?

कारण आपण आपल्याच लोकांकडून अपेक्षा करत असतो.मग आई मुल सुधारण्याची अपेक्षा त्याच्याकडून करते .तर पुढे जावून चांगले करिअर करता यावे म्हणून अभ्यासाची अपेक्षा करत असते.

तर नवरा बायको एकमेकांकडून secure life ची अपेक्षा , बायको नवऱ्याकडून आधाराची , आर्थिक , सामाजिक , मानसिक स्थैर्य याची अपेक्षा करत असते. तर नवरा हा बायको ने त्याची , कुटुंबाची काळजी घ्यावी , खाणे पिणे वेळेत बघावे. प्रेम द्यावे . आपुलकी द्यावी याची अपेक्षा करत असतो. बायको कधी सोन्याच्या दागिन्यांची अपेक्षा करते . तर कधी नवरा आपल्या बायको ने इतरांसारखे टापटीप राहिले पाहिजे . Knowledge वाढविले पाहिजे ही अपेक्षा करत असतो.

देशभक्त देशकारीता त्याग करत असतात. लढत असतात ते देशाला स्वातंत्र्य मिळावे , आपली लोक ,देश गुलामगिरीतून मुक्त व्हावीत याच अपेक्षेने ना ??? आपल्या ध्येय पूर्ती करिता आपल्या अपेक्षा जरूर बाळगा परंतु त्या अपेक्षांचा स्वतः आणि इतरांवर बोजा नको ना ?? !! आणि अशाच अपेक्षा ठेवा की ज्या आपल्याला पूर्ण करणे शक्य आहे.

आयुष्य सुंदर आहे. समजत असते अपेक्षा पूर्ण होणार नाहीत तरी ही अपेक्षा ठेवत असतो कारण त्या आपल्याला प्रेरणा देत असतात. उत्साही ठेवत असतात. काही तरी वाटचाल करण्याकरिता सकारात्मक ऊर्जा देत असतात. तर कधी नकारात्मक विचार , अपेक्षा आपल्याला आपल्याच लोकांपासून कायमच्या दूर करतात.

आयुष्य सुंदर आहे. अवास्तव अपेक्षा ठेवू नका. पण वास्तवाचा स्वीकार करा. आणि वास्तव अपेक्षा पूर्ण करा. आणि आंनंदानं भरभरून जगा आणि इतरांनाही जगू द्या. माणसानं माणसाला माणसा सारखे वागविणे ही अपेक्षा योग्यच ना !!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!