सभोवताली प्रेम करणारी माणसंच नसतील तर ते आयुष्य नव्हेच.
मयुरी महेंद्र महाजन
पुणे.
जन्म आणि मृत्यू यामध्ये श्वासाचे अंतर आहे, आणि म्हणून हे आयुष्य जगत असताना मानवामध्ये जीवन उर्मी आणि मृत्यू ऊर्मी यांचा समावेश असतो, जेव्हा मानवात जीवनऊर्मी असते ,तेव्हा त्याला खूप जगावसं वाटतं ,आयुष्यातला प्रत्येक क्षण जगण्याचा आनंद अनुभवता येत असतो, परंतु मानव जेव्हा मृत्यूऊर्मी अनुभवतो, खरं म्हणजे जेव्हा जगण्यातलं स्वारस हरवलेलं असते,तेव्हा जगणे नकोसे वाटते,
आपल्यावरती प्रेम करणारी माणसं जर नसतील, ती आपण कमावलेली नसतील ,तर जगण्यात मृत्यूऊर्मी नकळतच वाढत असते, ऐरवी मी कधी कुठल्या पक्षाला, प्राणाला आत्महत्या करताना बघितलेले नाही, परंतु मानवचं असा एकमेव प्राणी का असावा बरं,…??? ज्याला हे सुंदर असे जीवन नकोसे वाटावं…. इतपत….
प्राण्यांमध्ये, पक्षांमध्ये आणि आपण सर्व मानवप्राण्यां मध्ये काय बर फरक असावा??????… फक्त एवढच ना….. ती आपल्यासारखं पंचपक्वान्न खात नाहीत, आपल्या सारखे कपडे परिधान करत नाही, किंवा आपल्या सारखी भाषा बोलत नाही, हौस मौज करत नाही, परंतु प्रेम ते सुद्धा करतात, त्यांचा सुद्धा जोडीदार असतो, त्यांचे सुद्धा कुटुंब असते ,तीसुद्धा एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांना जपतात ,जाणतात ,प्रत्येक परिस्थितीत साथ देतात, ….
मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल, की हे काय पक्षी आणि प्राण्यांची तुलना तुम्ही मानवा सोबत कशी करू शकतात???? तर बघा ही फक्त तुला नसून, एक असे वास्तव आहे , जे आपल्याला खूप काही शिकवून जाते, प्रत्येक जीवाची आपली जागा ठरलेली असते, जसे मासा कधी जमीनीवर राहू शकत नाही, प्रत्येकाचे खानपान ठरलेले असते, तसेच मानवाच्या बाबतीत सुद्धा खूप सार्या गोष्टी ठरलेल्या आहेत, परंतु मानव त्या कधीचं मान्य करत नाही, कुठल्याही गोष्टीचे मानवाला बंधन नाही, या अविर्भावात मध्ये मानव जगताना दिसतो,…
जर त्या पक्षांना प्राण्यांना आपण प्रेम दिलं ,तर ते सुद्धा अलगद आपल्या जवळ येऊन बसतात, ही प्रेमाची अबोल भाषा असते ,या जगात प्रेम अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपल्या असण्याला अर्थ आहे, प्रेमाने जग जिंकता येत असे म्हणतात, परंतु आपल्याला जर खरं प्रेम शिकायचे असेल, तर पक्षी आणि प्राणी यांच्या कडून शिकावे, त्यांच्या आजूबाजूला सभोवताली जीपण प्राणी किंवा पक्षी असतील ते एका जुटीने राहत असतात, एकमेकांची साथ आणि एकमेकांवर प्रेम करतात, त्यामुळेच की काय त्यांना कधी मरण्याची भीती वाटत नसावी…..
माहितीय आपल्याला, आयुष्याचा प्रवास खूप खाचखळग्यांनी भरलेला आहे, कधी निराशा, ताण तणाव यांच्याशी कितीतरी वेळा संघर्ष करावा लागतो, परंतु या सर्व परिस्थितीत जर आपल्या सभोवताली आपल्यावरती अपार माया आणि प्रेम करणारी माणसे असतील, तर ही संकट आयुष्यातील शुल्लक तक्रारी वाटतीलं, कारण खऱ्या प्रेमाची ताकद आपल्या सोबत असते, आणि तिच्या जोरावरती आपण सहज डोंगर पार करतो, हे आपल्याला कळत सुद्धा नाही, परंतु जर सभोवताली प्रेम करणारी माणसंचं नसतील, तर ते आयुष्य तरी कसं म्हणावं ….
कारण जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात जेव्हा आपण हे विश्व सोडलेलं असतं, तेव्हा किती जणांच्या मनात आपण प्रेम निर्माण करून गेलातं, आपण आपले काय अस्तित्व सोडून जातो ,हे खूप महत्त्वाचे आहे, आणि आपण ते द्यायलाचं आलोय ,आणि ते दिलेच पाहिजे, “प्रेम द्यावे ,प्रेम घ्यावे ,प्रेमाचा असावा साठा , उपयोग नाही काही रिकाम्या हाती जाऊन, सुना ठेवून गोठा ……”
प्रेमासाठी प्रेयसीचं असावी, असं काही नाहीये ….आई, मावशी, अक्का, अशा कितीतरी नावे देता येतील, हा निसर्ग, हा देश, ही मातृभूमी या वरती प्रेम करून कितीतरी सैनिकांनी बलिदान दिले, ते फक्त देश प्रेमापटीचं ना…., प्रेम निस्वार्थ असते, निरपेक्ष असते, त्यात कुठला बनावटीपणा नसतो , चुकलं म्हणून ओरडणारी आई असेलं, पण असू दे ग लहान आहे,
अजून असं म्हणून पदराखाली घेणारी आजी असेल , या प्रत्येकाचे प्रेम माणसाच्या जगण्याला उभारी देणारे असते ,आयुष्याचा आनंद सुख दुःख आपल्या माणसांजवळ सांगायला आपली प्रेमाची माणसं हवीचं, जसे सुख आपल्या प्रेमळ व्यक्ती शिवाय अपूर्ण असते, तसेच आयुष्यसुद्धा अपूर्ण असते, त्यांच्या पुर्णत्वासाठी आपल्या लोकांची साथ असायलाच हवी, दिल्याने नेहमी वाढते, ज्ञान, प्रेम, त्यामुळे देत जावे, घेत जावे, प्रेमाचे बंध असेचं जुळत राहावे…!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


लेख खूपच सुंदर आहे
Nhi ahe he ayushya sunder khup samsya ahe mansachya ya jagat