सतत भावनिक चित्रपट आणि गाणी ऐकण्याचा आपल्या मनावर होणारा परिणाम!
अपर्णा अशोक कुलकर्णी
टेलिव्हिजन हे आपल्या रोजच्या जगण्यातील अत्यंत गरजेचं माध्यम बनलेल आहे. आणि आता तर हे माध्यम मोबाईल वर ही अगदी सहज उपलब्ध झालेले आहे कधीही,कुठेही अगदी मोफत.सध्या मोबाईल वर झी५, वुट, हॉट स्टार असे बरेच आपलिकेशन आहेत त्यामुळे कुठेही आपण टेलिव्हिजन बघू शकतो.
आपल्या प्रत्येकाची आवड वेगळी असते.म्हणजे कोणाला भितीदायक मालिका किंवा चित्रपट पाहायला आवडतात तर कोणाला कौटुंबिक, सामाजिक,भावनिक, सत्य कथेवर आधारित. हे विषय खूप आहेत आणि प्रत्येक विषयावर आपल्या चित्रपट सृष्टीत खूप मोठे काम करून ठेवलेलं आहे आपल्या आवडत्या कलाकारांनी.
आपल्या चित्रपट सृष्टीत खूप मालिका, चित्रपट,गाणी आहेत आणि रोजच नवीन नवीन मालिकांचा, चित्रपट,गाण्यांचा शोध सुरूच आहे आणि राहणार.या चित्रपट विश्वाला मायाजाल म्हणलं जात आणि यात काहीच चुकीचं नाही.
जेव्हा आपण मालिका,चित्रपट पाहतो किंवा गाणी ऐकतो तेंव्हा भान विसरून खूप मग्न होऊन जातो. कारण कलाकारांनी जीव ओतून ते पात्र जीवंत केलेलं असतं. आपल्या चित्रपट सृष्टीत अजरामर ठरलेल्या प्रचंड जोड्या आहेत. फक्त चित्रपट सृष्टीतच नाही तर प्रत्येक च क्षेत्रात नाटकात,मालिकांमध्ये सुद्धा.
अशा अनेक जोड्यांची नावे उदाहरण देण्यासाठी सांगता येतील सचिन – सुप्रिया,अशोक – निवेदिता, स्वप्निल – मुक्ता,प्रिया – उमेश, शाहरुख – काजोल, अजय – काजोल, रेखा – अमिताभ, नीतू – ऋषी अशा एक ना अनेक जोड्या चित्रपट सृष्टीत होऊन गेल्या तर मालिकांमध्ये सुद्धा अर्णव – खुशी, नक्ष – अक्षरा, शौनक – माऊ, संध्या – सूरज राधा – कृष्ण अशी कित्येक उदाहरणे देता येतील.
हे कलाकार जेव्हा पाहायला मिळतात तेव्हा खूप छान वाटतं.प्रेक्षक वाट पहात असतात मालिकांच्या वेळेची, चित्रपट कधी येणार याची. कारण भूमिका पार पाडताना कलाकार भूमिकेशी एकरूप होऊन काम करत असतात.कलाकारांनी केलेलं काम इतकं अप्रतिम असत की ते पात्र आहे याचं भानच आपल्याला रहात नाही.
कधी कधी एखादी भूमिका बघताना अस वाटत की हे पात्र आपल्या खूप जवळच आहे.कधी कधी अस वाटत आपण आपल्यालाच बघत आहोत किंवा या घडणाऱ्या घटना आपल्या आयुष्यात घडून गेल्या आहेत.हे सगळं श्रेय त्या कलाकारांच आहे ज्यांनी ते पात्र साकारलेलं असत.ते पात्र जीवंत करण्यासाठी प्रचंड मेहनत असते त्या मागे कलाकाराची.
पण सतत या भावनिक भूमिका बघण्याचा,गाणी ऐकण्याचा आपल्या मनावर इतका परिणाम होतो की आपण त्याच विश्वात रमून जातो.ते सगळं खोटं आहे,फक्त एक भूमिका आहे हे विसरूनच जातो आणि सतत त्याच त्या गोष्टींचा,कथानकाचा विचार करत राहतो. इतका की आपल्या वास्तविक जीवनावर त्याचा परिणाम होत आहे हे ही आपल्या लक्षात येत नाही.
एखादा भावनिक सीन पहिला किंवा गाणं ऐकलं तर डोळ्यातून लगेच पाणी येतं आपल्या.चित्रपट,गाणी, मालिका हे सगळं आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग होऊन गेलं आहे.इतका महत्वाचा की हे जर आपण पाहिलं नाही किंवा एखाद्या मालिकेचा एखादा भाग जरी बघता आला नाही तर खूप काही राहून गेल्यासारखं वाटतं.या मालिका बघण्यावरून घरात नवरा – बायको चे वाद होत नाहीत असं घर शोधून सापडणार नाही.
पण सतत असे भावनिक चित्रपट बघणं,मालिका बघणं याचा आपल्या मनावर,जीवनावर परिणाम होत आहे. काहीही झालं तरी हे मान्य केले पाहिजे की ते फक्त पडद्यावर साकारलेलं जग आहे त्याचा आपल्या वास्तविक जीवनाशी काहीही समंध नाही.ते जग कितीही छान आणि हवं हवं वाटत असले तरीही.
टेलिव्हिजन हे माध्यम आपल्या आयुष्याचा इतका महत्वाचा भाग होऊन गेला आहे की आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या वास्तविक जीवनाशी त्याची तुलना करायला लागलो आहोत आपण.म्हणजे समजा जर आपल्या घरात आपल आपल्या नवऱ्या सोबत भांडण झालं तर आपल्या नवऱ्याची प्रतिक्रिया आपण सिनेमातल्या किंवा मालिकेतल्या नवऱ्या सोबत करतो. एखादा निर्णय घेण्याची वेळ आली तर मालिकेतील हेरॉईन कशी वागेल याचा विचार करतो आणि मग निर्णय घेतो.
एखाद्या मालिकेतील सासू चांगली वागायला लागली तर आपली सासू कधी नीट वागेल याचा विचार करायला लागतो.आपल्या मुलांची तुलना मालिकेतील मुलांच्या पात्रा सोबत करतो.एखादा निर्णय घेण्याची वेळ आली तर मालिकेतील हेरॉईन कशी वागेल याचा विचार करतो आणि मग निर्णय घेतो.
इतकं महत्व द्यायला लागलोय आपण या पडद्यावरच्या खोट्या जगाला.या सगळ्यांच्या नादात हे विसरतो आहोत की पडद्यावर भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच वास्तविक जीवन खूप वेगळं आहे.त्याच भूमिकेत त्यांना बघून कसं चालेल.आपण त्यांच्या आयुष्यातील घटना बातमीपत्र वाचून,टेलिव्हिजन वर बघून माहीत करून घेतच असतो ना.
आपल्याला हे खूप चांगलं माहीत असतं की त्यांचं वास्तविक जग आणि पडद्यावरच जग यामध्ये काहीच संबंध नाही तरी आपण त्यांनी साकारलेली भूमिका आणि आपल्या आयुष्यातील वास्तव यात तुलना कशी करू शकतो???
काहीही झालं तरी ( कितीही वाटत असेल तरीही ) आपल्या वास्तविक आयुष्यात आपले नवरे मालिकेतील हीरो सारखे वागणार नाहीत आणि बायको हिरोईन सारखी वागणार नाही.हे कलाकार सुधा त्यांच्या खऱ्या आयुष्यात असे नक्कीच वागत नसतील.त्यामुळे त्याचा आपल्या वास्तविक जगण्यावर किती परिणाम करून घ्यायचा हे आपलं आपणच ठरवलेलं बरं.नाही का ??
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


