Skip to content

सतत निराश राहणारी व्यक्ती दुसऱ्यांचही जगणं कसं अवघड करून टाकते, बघा…!

सतत निराश राहणारी व्यक्ती दुसऱ्यांचही जगणं कसं अवघड करून टाकते, बघा…!


हर्षदा नंदकुमार पिंपळे


हे जीवन सुंदर आहे. पण जगणं…..? जगणं मात्र कैकदा एखाद्या अवघड वळणासारख वाटत रहातं.प्रत्येकाच्या आयुष्यात कोणते ना कोणते प्रॉब्लेम्स हे असतातच.इथे आयुष्यात एकही प्रॉब्लेम नाही असं कुणीच नाही.कुणी गरिबीत वाढतं तर कुणी अगदी संपत्तीमध्ये लोळत असतं.पण याचा अर्थ असा नाही की श्रीमंत व्यक्तींच्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम नाहीत.

पैशाव्यतीरिक्तही इतर अनेक गोष्टी असतात.नात्यांमधले वादविवाद , पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यातील वेगवेगळे प्रॉब्लेम्स , दिवसागणिक येता जाता येणारे छोटे मोठे अडथळे, मृत्यू ,वेदना वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टींचा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात शिरकाव हा असतोच. तो सहजासहजी कुणी टाळूच शकत नाही.

हे अगदी खरं की अशा अनेक गोष्टींमुळे आपल्या आयुष्यावर काही चांगले वाईट परिणाम होत असतात.म्हणजे कुणी अशा घटनांमधून नैराश्यात जातं तर कुणी काही काळ खचून जातं.कुणी थेट मरणाला मिठी मारायच विचार करतो.

काही असतात जी नव्याने उभं रहायला शिकतात. पुन्हा पुन्हा उडायला शिकतात. प्रत्येकजण निरनिराळा असतो अगदी तसच प्रत्येकाच (अशा काही घटनांनंतरच) वागणं-बोलणंही निरनिराळच असतं.अशा काही व्यक्ती आपल्या आजुबाजूला असतात ज्या की सतत निराश असतात. त्यांच्याकडे पाहून कधीच आपल्याला असं रिफ्रेश वाटत नाही.

अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळेही काही व्यक्ती कितीतरी वेळ निराश राहतात. एखाद्या गोष्टीमुळे (मनाविरुद्ध घडणाऱ्या) निराश होणं अगदी नैसर्गिक आहे.पण तासनतास जर एखादी निराश व्यक्ती आपल्या अवतीभवती असेल तर त्यांच्याबरोबर आपलही जगणं अवघड होऊन जातं.त्यांच्याकडे पाहून आपल्या चेहऱ्यावरच थोडं-थोडकं हसूही कापराप्रमाणे उडून जातं.आपणही पुन्हा पुन्हा जुन्या गोष्टी आठवत बसतो.आणि पुन्हा एकदा निराशेला काही अंशी का होईना पण कवटाळतोच.

आपण सातत्याने त्याच गोष्टींचा विचार करत राहतो.असं घडलं आता पुढे कसं होणार….? आणि आत्ताच काय….? या सगळ्या विचारांमध्ये आपण आपलं आयुष्य पुन्हा पुन्हा नैराश्यात ढकलत असतो.सतत त्याच त्या गोष्टींवरून खिन्न मनःस्थिती करून घेणे अशा वेळी आपल्याला सहज जमतं.म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून आपण प्रेरणा घेतो तसचं एखाद्या निराश व्यक्तीकडून आपण निराशा घ्यायलाही मागे राहत नाही.त्यांचं सतत निराश राहणं आपलच जगणं मुश्कील करून टाकते. मी काय करू….? माझं असं झालं-तसं झालं…, आता मला काहीच करायची इच्छा नाही… जगण्यात रस नाही वगैरे वगैरे.

अनेक गोष्टी निराश राहणारी व्यक्ती बोलत असते.आणि कळत नकळतपणे याच बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर परिणाम होत असतो.अशा बोलण्याने ‘ सतत उदासिनतेत राहण्याने , दुसऱ्या व्यक्तीच मनही हेलावून जातं.साखरेप्रमाणे ते त्याच अवस्थेत विरघळत जातं .

हे म्हणजे अगदी झाडावरच्या फुलांसमान आहे. फुलं फुलली की आपला आनंद काही वेगळाच असतो. ईतकच नाही तर ती फुलं केव्हा फुलतील याचीही आपण अगदी उत्सुकतेने वाट पाहत राहतो. थोडक्यात काय तर फुलं फुलल्यावर आपणही फुलतो. पण हीच फुलं जेव्हा कोमेजतात तेव्हा मात्र त्यांना पाहून आपणही थोडेसे नरव्हस होतोच.आणि सातत्याने ती कोमेजलेली फुलं पाहून आपणही कोमेजतो. अशावेळी फुलण्याची इच्छाच होत नाही.

अगदी सारख सारख निराश राहणाऱ्या व्यक्तीकडे पाहून रोजचा दिवसही चांगला जात नाही. किंवा इतर काही करण्याची मनापासून कोणतीच इच्छा होत नाही. करायची म्हणून एखादी गोष्ट करायची असचं उरलेल्या आयुष्याच गणित होऊन बसतं.ना खाण्यात लक्ष , ना अजून कशात….!

इतरांना आनंद देणारी व्यक्तीही अशा निराश राहणाऱ्या व्यक्तीमुळे उदास उदास होते.त्यांच्या चेहऱ्यावर असणारं हसूही हळुहळू लोप पावत जातं.

म्हणजे कसं तर…एखादी व्यक्ती नाराज आहे, निराश आहे. तर अशा व्यक्तीसमोर आपण आनंदात कसं वावरायच…? हाही एक मोठा प्रश्न समोरच्या व्यक्तीला अगदी सहज पडतो.तो असा निराशेत आहे मग आपण हसणं बरं दिसतं का…? त्याला काय वाटेल नी काय नाही…? असं कुणी खिन्नावस्थेत असताना आपण कसं आनंद साजरा करणार वगैरे वगैरे अनेक गोष्टींचा विचार प्रत्येकाच्या मनात तासनतास रेंगाळत राहतो.आणि विचारांती साध्य तर काहीच होत नाही. आणि निराश नसणाराही थोडासा निराश होऊन जातो.

पहा, असं आपल्या निराश राहण्यामुळे इतरांच्या आयुष्य मिळमिळीत, बेचव होणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे. आपल्यामुळे एखाद्या चेहऱ्यावर हसू फुललं पाहिजे. आपल्याकडे पाहून एखादा अजूनच उदास होता कामा नये.निराश होणं , निराशा येणं अगदी स्वाभाविक असलं तरी किती काळ निराशेत जगायच हे आपल्यावर अवलंबून आहे.

आपण निराश राहिलो तर आपल्यामुळे दुसऱ्यालाही त्रास होतो. आपल्यामुळे आपण इतरांच्या आनंदावर का पाय मारायचा…? ते माझा विचार करू शकतात तर मी त्यांचा इतकाही विचार करू शकत नाही का…? आपल्या आनंदी , आशावादी राहण्यामुळे अजून कितीतरी जणं आनंदी राहू शकतात. या गोष्टींचा सारासार विचार नक्की करा.आणि शक्य होईल तितकं आनंदी-उत्साही रहाण्याचा प्रयत्न करा.

त्यामुळे निराश व्यक्तीला आशेचे पंख लावून उडायला शिकवा, आणि तुम्ही स्वतःही निराशेच्या गर्तेत फार काळ अडकू नका.कारण,
निराशेत अडकलेल्या माणसाकडे पाहून आनंदाचा एकही क्षण जगावासा वाटत नाही……दिवसागणिक जगणं खरचं अवघड होत जातं…आणि इतरांच्या जगण्यातील आनंद असा ओस पडावा असं सहजासहजी कुणालाही वाटत नाही.

पटतय नं…..?????

So….keep shining..keep growing….no matter what……You guys keep smiling….!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

8 thoughts on “सतत निराश राहणारी व्यक्ती दुसऱ्यांचही जगणं कसं अवघड करून टाकते, बघा…!”

  1. खूपच सुंदर विवेचन. मला हा लेख मनापासून आवडला

  2. खरंच उत्तम आहे लेख जी वस्तुस्थिती आहे तेच लिहीले आहे अनुभव छान आहे लेखकाचा .

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!