सतत गोड बोलणे आणि मागून कारस्थाने करणे अशी माणसे नकोच.
आकांक्षा किरणराव आळणे,
(मानसशास्त्र विद्यार्थि)
‘दोस्त दोस्त ना रहा,प्यार प्यार ना रहा,
जिंदगी हमें तेरा ऐतबार ना रहा,ऐतबार ना रहा..!!’
या ओळी वाचून अनेक जणांना आपल्या पाठीत सुरी खूपसणाऱ्या एकेकाळी सो क्लोज टू हार्ट असलेल्या प्रियजनांची आठवण झाली असेल.
अशा घटनांना तर हल्लीच्या काळात उधाणच आले आहे. कुठल्याही नात्याची सुरुवात होते ती छान निखळ मैत्रीने. मग प्रवास घडतो कॅज्युअल फ्रेंडशिप ते बेस्ट फ्रेंड पर्यंत.
काही जण या झोन मध्येच बरेच काळ टिकून असतात तर काहींची गिनती (BFF)अर्थात-(बेस्ट फ्रेंड फ़ॉरएवर)मध्ये होते.पण मित्रांनो प्रश्न पडतो की किती काळ ? किती काळ टिकतात असे मैत्री,प्रेम किंवा कोणतेही नाते आजच्या काळात?? आजुबाजुला बघा अनेक मित्र मैत्रिणी जे एकमेकांच्या गुड बुक्समध्ये होते,BFF म्हणून जे इन्स्टा वर सतत ट्रीपचे फोटो एकमेकांना टॅग करत अपलोड करायचे ते अचानक डायरेक्ट अनफ्रेंड झालेले दिसतात.
फ्रॉम BFF टू स्ट्रेंजर अशी जर्नी अनेकांची दिसते. काही जणांचे नाते तर एवढ्या वाईट स्तराला जाऊन पोहोचते की चक्क एकमेकांना ब्लॉक लिस्ट मध्ये टाकतात हेच सो-कॉल्ड बीफफ असलेली मंडळी;का अशी वेळ ते का असे घडते हे आज आपण बघणार आहोत मित्रांनो..!!
मैत्री अगदी प्युवर नातं.कुठेतरी गुण जुळून येतात मग ‘मैत्री’ होते आणि दुर्गुण जुळले तर मग काय प्रश्नच नाही अशावेळी ‘यारी’ होत असते हे सामान्यतः मुलांमध्ये आढळून येणारे मैत्रीचे पॅटर्न..!!
मुलींची मैत्री अशी होत नाही.हाय हैलो पासून सुरुवात होते मग सेम इंटरेस्ट असल्यास मैत्री घट्ट होत जाते. मुळात मुलं दिलखुलास जगणारे आणि मुली मात्र थोड्या हिशोबात वागणाऱ्या असतात. असो…. कोणी कसेही असले तरी धोका तो सब खाते है मिया…!!! विश्वासघात हा होतो एकदा तरी प्रत्येकाच्या आयुष्यात कोणतेही वय असो आयुष्याचे कोणतेही वळण असो एकदा तरी हा अनुभव येतोच.
त्यात आपली पूर्णपणे चूक नसेलही कदाचित पण कुठेतरी आपली फसगत झालेली असते या लोकांसोबत आपण उठतो बसतो त्यांचे ‘खाने के दात अलग और दिखाने के अलग है’ हे आपल्याला लक्षातच येत नाही. कारण ते लोक इतक्या पद्धतशीर पणे स्वतःला कव्हर करत असतात इतक्या व्यवस्थितरीत्या आपल्या भावनांशी खेळतात हे की आपल्याला पता च लागू देत नाहीत.
“मॅनिप्युलेशन मोस्ट ट्रेंडिंग आर्ट दिज डेज..!!” इतरांचा वापर स्वतःच्या मतलब साधण्यासाठी करून घेणे याला मॅनिप्युलेशन असे म्हणतात. जगात manipulators ची कमी नाहीये दोस्तांनो. असे लोक खूप व्यवस्थितपणे आपल्याला हेरतात. जिथे मतलब-स्वार्थ साधायचा आहे तिथे कटू बोल कसे ऐकू येणार ना ? असे धूर्त लोक अत्यंत मधुर वाणीचे असतात.
तुम्ही त्यांना जे सांगाल त्यावर स्मित हास्य देऊन मान डोलावणारी कॅटेगिरी असते ही. बर एवढ्यावर हे थांबत नाहीत तुमच्याकडून मिळालेली माहिती याचा दुरुपयोग देखील करतात, कटकारस्थाने रचतात आणि तुमचाच काटा काढून टाकतात. स्पष्टवक्तेपणा,denial,ठामपणा या लोकांच्या बोलण्यामध्ये कधीच आढळून येत नाही.
कारण ते खरे कधी वागतच नाहीत. मधुर वाणी, खोटेपणा,मिश्किल हसू हे लक्षण manipulators मध्ये दिसून येतात आणि मॅनिप्युलेशन म्हणजे आजच्या काळातला जणू एक गंभीर रोगच म्हणावे लागेल.’व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’. आपण काय करू शकतो यावर तर आपण बस स्वतःला अशा लोकांपासून सेफ ठेवू शकतो एक हात लांब राहून..!!
ज्या लोकांमध्ये असे टिपीकल स्वभाव वैशिष्ट्य दिसून येतात त्या लोकांपासून दूर राहिलेले कधी चांगलेच. जिथे आपल्याला माहिती आहे की भावनिक,आर्थिक किंवा कुठल्याही प्रकारची आपली फसवणूक होणार आहे त्या लोकांमध्ये गुंतन्यात काही अर्थच नाही कारण मिळणार तो शेवटी विश्वासघातच परिणामी आपण hurt च होणार आहोत. म्हणून मित्रांनो स्वतःला जपा. लोक जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात पण सर्वात महत्त्वाचे आपण त्यांचा हेतू काय आहे हे ओळखू शकलो तर आपण अशा वाईट प्रवृत्तींच्या लोकांपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो.
मैत्री,विश्वास,प्रेम या गोष्टी नावाप्रमाणेच खूप कोमल आणि अमुल्य आहेत पण जर अंदाज चुकला समोरचा व्यक्ती दांभिक (manipulator) निघाला तर जो त्रास होतो तो खूप असह्य असतो. कारण फार मनापासून निभवते कोणतीही व्यक्ती कोणतंही नातं.पण गोष्ट इथेच चुकते की आपण निवडलेली व्यक्तीच चुकीची असते,तोंडावर गोड बोलते माघारी कटकारस्थान रचते आणि शेवटी घात करते.
‘इसलिये बाबूजी धीरे चलना,प्यार मे जरा संभलना,बडे धोके है इस राह पे…!!!’
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

