Skip to content

सतत खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला ओळखण्याच्या काही सोप्या पद्धती.

सतत खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला ओळखण्याच्या काही सोप्या पद्धती.


सोनाली जे


आपल्या सगळ्यांवर लहान पणापासून च संस्कार झालेले असतात , कधी वडीलधारी , आई , वडील, शिक्षक यांच्या कडून आपल्या लहानपणापासून आपण हेच संस्कार घेत आलो असतो की खोटे कधी बोलू नये..खोटे बोलण्याने देवबाप्पा शिक्षा देतो, खोटे बोलणे हे पाप आहे.खोटे म्हणजे काय तर जे खरे नाही ते..छोट्या सवयी ही पुढे जावून मोठ्या त्रासदायक होवू शकतात..

जसे अभ्यास केला नसून ही केला आहे हे मुलांचे खोटे बोलणेच झाले ना..जर आई वडील मुलांवर विश्वास ठेवत असतील तर ते या खोटेपणा च्या अज्ञानात च राहणार ना..याचा परिणाम जेव्हा वह्या पूर्ण नसतील तेव्हा शिक्षक पालकांना शाळेत बोलावणे पाठवतील , तेव्हा च आई वडिलांना समजेल आणि त्यांना वाईट तर वाटेलच पण आपण मुलांवर ठेवलेल्या विश्वासाला तडा जावून तो विश्वास परत निर्माण होणे कठीणच.

सतत खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला ओळखण्याच्या काही सोप्या पद्धती.

१. व्यक्ती खोटे बोलते आहे हे तिच्या gestures आणि postures वरून लगेच समजते. :-

जेव्हा व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल खोटे बोलते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव , मुद्रा याकडे बघावे..एकदम चंचल भाव होतात, घाबरतात , भीती असते चेहऱ्यावर, कधी घाम फुटतो , कधी डोळ्यात डोळे घालून बघायचे धाडस होत नाही याच कारण खोटे बोलणे पण आणि आपण खोटे बोलते हे ओळखले जाईल ही भीती असते त्यामुळे ती नैसर्गिक मानसिक प्रतिक्रिया असते.

२. Body language देहबोली मधले बदल लक्षात घ्या:-

जी व्यक्ती खोटे बोलत आहे ती समोरच्या व्यक्ती बरोबर बोलताना एक तर खूप causious होते, अवस्थपणा लक्षात येतो लगेच, हात वारे करून बोलते, कधी हाताची , पायाची सतत हालचाल जेणेकरून त्या खोटे बोलणाऱ्या व्यक्तीचे खोटे बोलणे ती अस्वस्थता, देहबोलीतून जाणवत असते.

३. बोलणे :-

आपल्याकडे सगळेजण बघत आहेत हे गृहीत धरून मग आपले बोलणे खोटे असेल तरी खरेच कसे आहे हे जोरजोरात ओरडुन पटवून देण्याचा प्रयत्न करते. किंवा अगदी शांततेत ..आत्मविश्वास कमी आहे हे लगेच समजते .किंवा मग तोंडातल्या तोंडात बडबडणे , पुटपुटणे ..
पहिल्यांदा जे बोलले असेल तर परत ते विचारले तर बोलण्यात असंबंधता जाणाविते irrelavant वाटते.

आधी वेगळेच बोलले असते आणि नंतर वेगळेच आणि जर लक्षात आणून दिले तर आपल्याला असे च म्हणायचे होते अशी तिथल्या तिथे बोलण्यातली दुरुस्ती करायची.. जसे या ” बोटावरची थुंकी त्या बोटावर ” असे म्हणतो तसे.

४. उगीचच आपण खोटे बोलत नाही हे परत परत तेच तेच बोलून पटवून देण्याचा प्रयत्न. जड जड वाक्य , दीर्घ श्वास घेवून शब्दावर वजन देवून बोलणे.

५. कधी कधी अतिशय शांत बसणे :

आपण खोटे आहोत हे समोरच्या व्यक्तीच्या लक्षात आले तर आपल्या तोंडून ते बाहेर पडू नये म्हणून उगीचच शांत बसायचे.

६. विषय बदलणे : खरे आहे का खोटे हे विचारले असता ते सोडून दुसरेच बोलणे , विषय बदलणे.काही लोक खरे ही सांगत नाहीत आणि सफाईदारपणे आपल्या बोलण्याचे , कृतीचे इतरांवर आरोप करून मोकळे होतात.

७. समोरच्या माणसाला relax करा..समोरच्या माणसाला

एकदम रिलॅक्स बसू देत ..त्याला विश्वासात घ्या..तुमच्या बद्दल खात्री होवू देत. बोलता बोलता त्या व्यक्ती चे आवडते विषय काढा त्यावर बोला.आवडीचे विषय मोकळेपणाने बोलत असताना अचानक तो विषय काढा ज्यावर बोलायचे आहे.खात्री करायची आहे. तेव्हा अचानक त्या व्यक्तीचे वागणे , बोलणे बदलते का बघा किंवा तो कोणत्याच विषयावर बोलणे टाळून मोबाईल बघण्यात , किंवा काही वाचण्यात गुंग आहे असे भासवितो किंवा काहीच नाही तर आपले लक्षच नव्हते बोलण्याकडे असे भासवितो.

८. खोटे बोलणारी व्यक्ती आपल्या बरोबर किंवा इतरांबरोबर बोलण्याचे टाळते, एकलकोंडी राहते..

खोटे बोलण्याची मानसिकता का होते , त्यालाही काही तरी कारणे असतातच ना!! जसे चोर दागिन्यांची चोरी करतो का करतो ?तर त्याच्या कडे एक तर तसे दागिने नसतात किंवा ते दागिने विकून त्यातून पैसे मिळतात म्हणजेच त्याच्याकडे पैसे नसतात ते त्याला मिळाले..थोडक्यात ज्या गोष्टी ज्याच्याकडे नसतात त्या विनाकष्ट , सोप्या मार्गाने मिळवायच्या असतील तर चोरी करतात..आणि एकदा का हा सोपा मार्ग सापडला की नेहमीच तो वापरू लागतात.

म्हणूनच जर मानवी वर्तन आणि त्याच्या विचारांचा , हावभाव , देहबोली याचा थोडासा मानसशास्त्रीय दृष्टीने विचार केलात अभ्यास केला तर तुम्हाला तुमच्या निरिक्षणातून ही समजेल की समोरची व्यक्ती खोटे बोलत आहे का खरे.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!