सतत आपल्याच भावविश्वात रमत बसणे ही मानसिकता बिघडण्याची चिन्हे आहेत.
गीतांजली जगदाळे
(मानसशास्त्र विद्यार्थिनी)
खूप माणसे आपल्याच भावविश्वात रममाण असतात. बाहेरील जगात ती फार इंटरेस्ट घेताना दिसत नाहीत. म्हणजे बाहेर जगात काय चाललंय काय नाही हे त्यांना काहीच माहित नसत असं नसतं. पण त्याच्याशी त्यांचा काही संबंध नसल्यासारखा त्यांचा attitude असतो. म्हणजेच बाहेरच्या जगाशी ती फार “aware” नसतात.
स्वतःमध्ये आणि स्वतःच्या सगळ्या गोष्टींमध्येच ती खूप गुंतलेली असतात. अशी माणसे बऱ्याचदा काल्पनिक गोष्टींमध्ये स्वतःच मन रमवताना दिसतात. किंवा आपले विचार, आपल्या भावना आणि सगळ्या आपल्याच गोष्टी या त्यांच्यासाठी ‘केंद्रस्थानी’ असतात. जे एका लिमिट पर्यंत ठीक असतं, पण आपण एकटे नसून आपण इतर माणसांमध्ये राहत असल्यामुळे फक्त आपणच ‘केंद्रस्थान’ आहोत असं मानणं त्रासाचं ठरू शकत.
आपण लहान असताना सगळेच कमी-अधिक प्रमाणात स्वतःच्या भावविश्वात रमलेले असतो. लहान मुलं म्हटल्यावर अशीच असणार! पण जस जसे आपण मोठे होऊ लागतो तस-तसं आपल्याला आजूबाजूच्या गोष्टी कळू लागतात, जग कळू लागत. आणि आपल्या ‘जग’ या व्याख्येच्या कक्षा रुंदावल्या जातात.
आपण बालपणात असताना आपले आई-वडील , आपली जवळची काही मोजकी माणसे आणि आपण हेच आपलं जग असत. पण जस-जसे मोठे होत जाऊ तस-तसं आपलं जग मोठं व्हायला लागत,वाढायला लागत.
पण काही वेळा काही लोकांच्या जगात मात्र विशेष बदल झालेला दिसत नाही. आपल्या आजूबाजूला देखील एक जग चालू आहे, आणि त्याचा आपल्यावर आणि आपला त्यावर एकप्रकारे परिणाम होत असतो हे त्यांच्या फार लक्षातच नसतं. म्हणजेच मुळात ते या सगळ्याचा विचार करतच नसतात,
कारण ते स्वतःमध्येच इतके हरवलेले असतात की त्यांना आजूबाजूच्या जगाचं भानच नसतं. जेव्हा बाहेर एखादी घटना अशी घडते की त्यावेळी त्यांचं लक्ष वेधून घेते, पण काही दिवसांनी मात्र ते आपले परत आपल्या कवचात जाऊन बसलेले आढळतात.
तस बघायला गेलं तर बऱ्याचदा ही माणसे आनंदी दिसतात. बाहेरच्या जगाचा फारसा परिणाम यांचावर कधीच दिसत नसतो. पण हे असं बाहेरच्या जगापासून स्वतःला एक प्रकारे अलिप्त ठेवणं, हे आपल्यासाठी चांगलं की वाईट?
नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे यालादेखील चांगली आणि वाईट या दोन्ही बाजू आहेत. चांगली बाजू अशी की जगात घडणाऱ्या वाईट गोष्टींशी देखील ऐकण्या इतकाच संबंध येऊन सुद्धा त्याचा फार विचार अशा लोकांकडून केला जात नाही , किंवा ते फार मनावर घेतलं जात नाही याने आपल्यातलं लहान मुलं, किंवा आनंदीपणा टिकून राहतो.
जीवनातल्या वाईट भागाशी फार परिचय होत नाही. पण हीच एक वाईट गोष्ट सुद्धा ठरते. कारण प्रत्येक संकट किंवा इतरांच्या अनुभवात घडणाऱ्या वाईट गोष्टीदेखील आपल्याला काहीतरी शिकवून जात असतात. अशा गोष्टी कानांवरून गेल्यामुळे आणि त्याचा थोडा जरी विचार मनात डोकावला तरी आपण आपल्या आयुष्यात सावधपणा अवलंबत असतो. जग सुंदर नक्कीच आहे,
पण त्यातला नेहमी सुंदरपणाचं आपल्या वाटेल येणार नाही हे जाणून आपण डोळे झाकून गोष्टी करत नाही. पण या स्वतःमध्ये स्वतःला गुरफटून घेतल्यामुळे बाहेर काय चाललंय हे याना कळून सुद्धा न कळल्यासारखं होत.
मग अशा स्वतःमध्येच रमणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात किंवा त्यांच्या खूप जवळ असणाऱ्यांच्या आयुष्यात असे प्रसंग घडतात, किंवा अनुभव येतात की त्या त्यांना गोष्टी हादरवून सोडतात. स्वतःमध्ये हरवलेली माणसे मुळातच सतत सुंदर कल्पनेच्या जगात रममाण असतात. त्यामुळे खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट घटनांचा त्यांच्यावर खोलवर परिणाम होतो.
कारण कुठेतरी त्यांच्या मनात नेहमी काहीतरी चांगलं, मनोरंजक घडत राहावं अशाच कल्पना असतात. आणि त्याचमुळे reality शी, त्यातून bad reality शी अचानक संबंध आल्यामुळे त्यांना कुठेतरी ते पचन जड जात.आणि अशामुळे त्यांची मानसिक स्थिती कमकुवत होऊ शकते. कारण मनाची अगदीच तयारी नसेल तर या गोष्टी खूप दह्क्क देऊन जातात.
मग ती फार मोठी संकटे नसली तरी जीव घाबरून जातो. आणि त्यामुळे मानसिक आरोग्यावर , मनावर वाईट परिणाम होतो. पण या उलट आपण बाहेर घडणाऱ्या गोष्टींना थोडे जरी ‘aware’ असलो किंवा स्वतःच्या जगातून डोकं काढून इतरांच्या जगात जरी डोकावलं तरी काय चाललंय, काय नाही याच भान आपल्याला येत. आणि तेच आपल्याला आपल्या आयुष्यात उपयोगी पडत असतं.
म्हणजेच काय तर जीवन जगताना स्वतःमध्ये रमता तर नक्कीच आलं पाहिजे, पण त्याचबरोबर आजूबाजूच्या जगात काय चालू आहे याच भान देखील राहील पाहिजे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


