सगळी दुखः कमी होत जातील.
सोनाली जे
खरेच सगळी दुखः कमी होत जातील जेव्हा सुख हे दुःखाची जागा घेईल.
जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूचि शोधूनि पाहे’ रामदासांच्या या पंक्ती आठवल्या की, जाणविते की , आपण आपल्या दुःखामध्ये गुरफटून जातो. आपल्या विवंचना, आपल्या अडचणी, आपल्या व्याधी अक्षरशः आपल्यावर अधिराज्य गाजवायला लागतात.हसायचे, आनंदाने जीवन जगायचे आपण विसरून जातो.
ज्याच्या कडे भरभरून सगळे आहे तोही काही तरी कमी आहे म्हणून दुःखी आहे किंवा आहे त्याचा आनंद उपभोगू शकत नाही. जसे की सर्वपरिचित ९९ डॉलर्स story. केवळ एक डॉलर कमी म्हणून आहे त्याची किंमत नाही. त्यात अनेक गोष्टींचे आनंद मिळवू शकतो परंतु जो एक डॉलर नाही त्याचीच खंत.
” दुनिया मै कोई भी चीझ आपको तब तक खुश नहीं कर सकती , जब तक की आप खुद से खुश होना नहीं चाहतें ! ”
दुःख कमी होणे म्हणजे काय ? तर सुखाची भर पडणे. याखेरीज दुःखाची तीव्रता कमी करणे.
माझ्या आयुष्यात दुःख च आहे. इतरांच्या आयुष्यात किती सुख आहे. किती आनंद आहे. त्याच्याकडे / तिच्याकडे वस्तू , घर , कपडे , दागिने खूप आहेत म्हणजे ती / तो खुश आहेत .सुखी आहेत , आनंदी आहेत ही भावना किंवा हा समज असतो.
पण कायम लक्षात ठेवा जे दिसते तसे नसते म्हणून तर जग फसते.
एक व्यक्ती : – गौतम बुद्धांना एक माणूस विचारतो की जीवनाचे सार काय आहे ?
गौतम बुद्ध : – तेव्हा गौतम बुद्ध त्या व्यक्तीला म्हणाले मी तुला काही विचारू का ?
ती व्यक्ती : हो , विचारा ना .
गौतम बुद्ध : – तुला मुलगा आहे का ?
ती व्यक्ती : हो .
गौतम बुद्ध : – तुझ्या भावाला मुलगा आहे का ?
ती व्यक्ती : हो .
गौतम बुद्ध : – तुझ्या शेजारी राहतात त्यांना मुलगा आहे का ?
ती व्यक्ती : हो .
गौतम बुद्ध : – तुझ्या area मध्ये अजून कोण राहतात पण त्यांचा परिचय नाही असे जे आहेत त्यांना मुलगा आहे का ?
ती व्यक्ती : हो .
गौतम बुद्ध : – आता पुढचा अजून एक प्रश्न विचारतो.
ती व्यक्ती : हो .
गौतम बुद्ध : – असे गृहीत धरून चल की तुझ्या मुलाचे आकस्मिक निधन झाले , तर तुला काय वाटेल . ?
ती व्यक्ती :मला खूप वाईट वाटेल. मला खूप दुःख होईल. मी अन्न त्याग करेन. माझी जगण्याची इच्छा संपेल.
कदाचित हे दुःख मी सहन करू शकणार नाही.
गौतम बुद्ध : – असे गृहीत धरून चल की तुझ्या भावाच्या मुलाचे, पुतण्याचे आकस्मिक निधन झाले , तर तुला काय वाटेल ?
ती व्यक्ती : मला तेव्हाही वाईट वाटेल. मला खूप दुःख होईल.पण तेवढे नाही जेवढे माझा मुलगा गेल्याचे असेल त्या पेक्षा नक्कीच कमी .
गौतम बुद्ध : – असे गृहीत धरून चल की तुझ्या शेजारचे आहेत त्यांच्या मुलाचे आकस्मिक निधन झाले , तर तुला काय वाटेल ?
ती व्यक्ती : मला नक्कीच वाईट वाटेल. पण तेवढे दुःख नाही होणार जेवढे पुतण्या गेल्यावर झाले असेल .
गौतम बुद्ध : – असे गृहीत धरून चल की तुझ्या area मध्ये अजून कोण राहतात पण त्यांचा परिचय नाही त्यांच्या मुलाचे आकस्मिक निधन झाले , तर तुला काय वाटेल ?
ती व्यक्ती : खरे तर मला फारसे काहीच वाटणार नाही. दुःख ही होणार नाही.
गौतम बुद्ध त्यानंतर त्या व्यक्तीला म्हणाले की , तुझ्या लहान मुलाने कधी समुद्र किनारी वाळूचे घर , महाल बांधले का ?
ती व्यक्ती : – हो अनेकवेळा .
गौतम बुद्ध : – तुझ्या मुलाने वाळूचे घर अनेकवेळा समुद्राच्या लाटांच्या सोबत वाहून गेले असेल ना ? तेव्हा तुझा छोटा मुलगा रडत असेल ना ?
ती व्यक्ती : हो रडतो ना.
गौतम बुद्ध : – तेव्हा तू पण रडतोस का ?
ती व्यक्ती : – नाही . मी का रडेन. मला माहिती आहे हे temporary आहे. समुद्राची लाट आली की सगळे वाहून जाणार हे माहिती आहे. मी रडत नाही पण मुलगा मात्र रडतो.
गौतम बुद्ध : यावर म्हणतात की , या जगातल्या प्रत्येक गोष्ट किंवा अनेक गोष्टींवर जर तुम्ही दुःखी होत असांलं तर तुमच्या आणि तुमच्या मुलामध्ये काही फरक नाही.
हेच जीवनाचे सार आहे. की आपण ज्या गोष्टींमध्ये , वस्तू.असतील , व्यक्ती असतील त्यात सर्वात जास्त attached असतो त्याच गोष्टींचे दुःख , त्रास असतात. त्याच गोष्टींपासून , व्यक्तींपासून त्रास , दुःख होते. ज्यांच्या बरोबर आपण attached नाही त्या व्यक्ती , गोष्टी पासून आपल्याला दुःख , त्रास कधीच होत नाही.
झाड जसे असते की त्याच्यावर काही काळाकरीता रात्री पक्षी येतात. विसावा घेतात. आणि सकाळ झाली की उडून जातात. पण ते झाड कधीच हा विचार करत नाही की हे पक्षी परत आपल्या झाडावर येतील का नाही ? किंवा त्या पक्षाना परत येण्या करिता काही परत या असेही सांगत नाही. किंवा जावू नका असेही सांगत नाही.
त्या झाडा प्रमाणे बना. या आयुष्यात सगळे काही temporary आहे, व्यक्ती असेल , वस्तू असेल , परिस्थिती असेल , प्रेम असेल , priority असेल , अगदी देशाचे राष्ट्रपतीपद असेल किंवा अगदी पंतप्रधान यांचे स्थान ही तात्पुरते आहे. सर्व गोष्टी ठराविक काळ किंवा हे सगळे तात्पुरते आहे. Temporary आहे. क्षणिक आहे. हे लक्षात घ्या. जर हे सत्य स्वीकारले तर तुमच्या दुःखाचे कारण कमी होईल.
चित्रकाराने रेखाटलेले , रंगवलेले चित्र खोटे असून जे खर्यासारखे भासते . त्याला उत्तम चित्र म्हणतात. आणि आपण त्या क्षणाला त्या आभासी विश्वात जातो. परंतु त्यानंतर लगेच सत्यात परत येतो. तसेच आयुष्यात ही काही स्वप्ने जरूर बघावित परंतु सर्व स्वप्ने , अपेक्षा पूर्ण होतील असे नाही ना .. प्रयत्न जरूर करा. कारण हे प्रयत्न तुमच्यात motivation निर्माण करत असतात. सकारात्मक आशा , उमेद जागवत असतात.
Relationship असेल , नवरा बायको चे नाते असेल , किंवा प्रियकर प्रेयसी हे लग्नापूर्वी . त्यांच्यात काही कारणाने वाद टोकाला गेले, अनेक गैरसमज, अविश्वास, इगो या मुळे नात्यात एक नकारात्मकता ठासून भरली गेली हे सगळं झालं….जे डोक्यात रजिस्टर झालंय ते पुसता तरी येत नाही आणि भिन्न लिंगी व्यक्ती असल्यामुळे ती ओढ ही कमी होत नाही…पण आता याचा शेवट काय?
मग अशावेळी ती जी पूर्वीची attachment असते ती naturally कमी होतेच , कमीं झालेली असतेच आणि तरीही दोघांना ही अजून ही काही गोष्टी एकमेकांकडे खेचत असतील . त्यामुळे तळ्यात मळ्यात असे होत असेल तर detach होणे हाच पर्याय स्वीकारावा लागतो. नाही तर मग खूप सकारात्मक गोष्टींचा भरणा त्या नकारात्मक गोष्टीवर मात करू शकतात. पण त्या साठी खूप वेळ एकत्र द्यावा लागतो. तसे प्रयत्न ही करावे लागतात.
आयुष्यात एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हीच काय पण कोणीच एकदम परफेक्ट नसते. सर्वगुणसंपन्न नसते. तुम्ही ही परफेक्ट नाही या गोष्टीचा स्वीकार करून तुम्ही स्वतः वर काम करायला सुरुवात करा. To work on yourself. तुमच्या insecurities असतील , विचार ..thoughts असतील , इगो असेल ,अपेक्षा असतील , emotions .. भावना असतील , threats ..भीती असेल , त्या जाणून घ्या. त्यात improve करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या strengths ओळखा , क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करा.
आयुष्यातली प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे. याचा स्वीकार करा. सगळ्या गोष्टी या तात्पुरत्या आहेत. पण म्हणूनच तात्पुरती असूनही त्याचा आनंद त्या त्या वेळी घ्यायला शिका. बालपण , तारुण्य , वृद्धापकाळ हे वय वाढेल तसे स्वीकारावे लागतेच. , जन्म आहे तसे मृत्यु ही. प्रेम आहे तसे दुरावा ही . तसेच आपली व्यक्ती ही कायम तशीच कशी राहील ? वेळ , परिस्थिती , अनुभव , घटना , priority, काही गोष्टींचे परिणाम , वागणे , बोलणे , किंवा तोच तोपणा , गैरसमज वेळीच नाही दूर केला तर वाढतच जाणार , विश्वास कमी पडणे , मग तो वाढविण्याकरिता प्रयत्न करणे , पण जे घडले यातून बदल होत जाणारच. याचा स्वीकार केला पाहिजे . आणि तो जर जमत नसेल तर detach होवून आनंद निर्माण करता आले पाहिजेत. काही वेळेस दूर राहुन ही परत तीच ओढ निर्माण होते. तो दुरावा ही जवळीकता निर्माण करतो.
आयुष्य सुंदर आहे. अपेक्षा कमी ठेवल्या आणि स्वीकार करण्याची क्षमता ठेवली , आपल्याकडे जे आहे त्यात आनंद मिळविण्याचा प्रयत्न केला तर सगळी दुखः कमी होत जातील. फक्त नकारात्मक राहू नका. कायम सकारात्मक रहा आणि इतरांनाही सकारात्मक ठेवा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



लेख आवडला