“सगळं आपलंच होत गेलं असतं तर जगण्याची गंमत कळली असती काय??”
मधुश्री देशपांडे गानू
“स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा..
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा..”
आदरणीय आशा भोसलेजी यांनी गायलेले सुंदर गीत.. आपल्या सगळ्या इच्छा, स्वप्नं आयुष्यात पूर्ण नाही होत ना! काहीतरी निसटून जातं, अपूर्ण राहतं. पण यातही एक हुरहुर लावणारी गोडी असते. जीवनाचा प्रवास हा असाच असतो. अगदी साध्या प्रवासातही अनेक वेगवेगळी दृश्यं, चढ-उतार, डोंगर-दऱ्या, नदी-नाले दृष्टिक्षेपात येतात. आपल्याला जिथे जायचं आहे तिथे पोहोचणं तर आनंददायी असतंच पण हा प्रवास, तात्पुरती दिसणारी दृश्यं ही जास्त मनोहारी, आनंददायी असतात.
प्रत्येक व्यक्ती ही मनापासून स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते. पण कोणाचेही आयुष्य इथे परिपूर्ण नाही. अगदी गरीब वस्तीतला कोणी असो नाहीतर गर्भश्रीमंत.. काहीतरी अपूर्णता त्यांचं आयुष्य व्यापून राहिलेली असते. आणि या अपूर्णतेतही एक आस, एक आशा लपलेली असते. माणूस या आशेवर तर तग धरून असतो. उद्याची स्वप्नं रंगवत तो आजचा दिवस सामोरा जाऊन साजरा करतो.
अगदी एखाद्या नुकत्याच शिक्षण पूर्ण झालेल्या तरुण-तरुणी पहा.. किती उज्वल स्वप्नं असतात त्यांची! आयुष्याबद्दल, करिअर बद्दल, आयुष्याच्या जोडीदाराबद्दल.. पण जीवनाचा प्रवास करताना सगळीच पूर्ण होतातच असं नाही. तरीही जीवन प्रवाही असतं. येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जात वास्तव स्वीकारून आपण आपल्यापुरता मार्ग काढतोच की!
प्रेमात आकंठ बुडालेले प्रियकर-प्रेयसी पहा. एकमेकांना पाहण्याची, भेटण्याची, संवादाची, स्पर्शाची एवढी ओढ असते दोघांनाही. जसं मिलनात प्रेमाची परिपूर्णता आहे त्याचप्रमाणे विरहही त्याचं सौंदर्य घेऊन येतो. विरहात एकमेकांसोबत नसण्याच्या या अपूर्णतेतही एक अवीट गोडी असतेच. अधीरतेने एकमेकांची वाट पाहणे, आठवणींमध्ये रमून जाणे यातही गंमत असतेच ना!
असेच आपल्या आयुष्याचे ही आहे. अगदी ठरवल्याप्रमाणे मनासारखे सरळसोट आयुष्य जगताना ही गंमत येईल काय?? गिर्यारोहक कसे अनेक अडचणी, संकटे, दर्याखोरे, डोंगर उतार पार करून त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचतात, तेव्हा त्यांना झालेला आनंद अवर्णनीय असतो. याच प्रमाणे अनेक अकस्मात अचानक आलेल्या प्रसंगांना, अडचणींना, संकटांना समर्थपणे सामोरे जात आयुष्याचा प्रवास करणं ही आनंददायी आहे.
मनासारखं सगळं घडावं ही प्रत्येकाची इच्छा असते. पण तसं घडत नाही ना! तुमचं करिअर, व्यवसाय, नोकरी, तुमचे कुटुंबीय , मित्र-मैत्रिणी, नातलग यांच्याशी असलेले नातेसंबंध, तुमची सामाजिक आत्मप्रतिमा, तुमचा आर्थिक स्तर कितीतरी अशा गोष्टी असतात ज्या साठी तुम्ही सकारात्मकतेने स्वतःच्या मनाप्रमाणे घडण्यासाठी प्रयत्नशील असता. पण खूपदा आयुष्य काही वेगळेच अनाकलनीय चित्र तुमच्या समोर उभं करतं. अशावेळी खचून न जाता, निराश न होता आहे ती परिस्थिती आणि वास्तवाचा स्वीकार करून तुम्ही नवीन मार्ग निवडता. “याला जीवन ऐसे नाव”
अगदी कोट्याधीश माणसालाही अजून पैसा हवा असं वाटत असणार. तोही समाधानी नाहीच. कोणाचंही आयुष्य इथे परिपूर्ण नाही. काहीतरी अपूर्ण, काहीतरी न्यून प्रत्येकात आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. ज्या गोष्टी, जी तुमची प्रेमाची माणसं तुमच्या आयुष्यात आहेत त्याबद्दल तुम्हांला कृतज्ञता वाटायला हवी. मनापासून त्याचा स्वीकार करून समाधानी असायला हवं. आणि आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अशी ही स्वप्नं, इच्छा ध्येय पूर्ण करण्यासाठी माणूस आशावादी राहतो. ही उद्याची आशा, ही अपूर्णता त्याला संमोहित करते, आकर्षित करते. आणि जीवन जगण्यासाठी, अधिक प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहित करते.
फक्त या आशा आणि ही स्वप्नं आवाक्यात असायला हवीत. तुमची क्षमता तुम्हीं पूर्णपणे ओळखून ही स्वप्नं पाहायला हवीत. म्हणजे अपेक्षाभंगाचे दुःख पदरी येणार नाही. एखादं अपयश पचवूनही नव्या जोमाने तुम्हीं पुन्हा नवीन स्वप्न पाहू शकाल.
जर सगळेच परिपूर्ण मनासारखं असेल तर माणसाला सुखानेही जडत्व येतं. “जो थांबला तो संपला.” म्हणूनच या अपूर्णतेतही, दुःखातही उद्याच्या आशा, स्वप्नं आहेत. ही स्वप्नं पाहण्यात, पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यातच जीवनाची खरी गंमत आणि जिवंतपणा आहे.
“उषःकाल होता होता काळ रात्र झाली..
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली…”
हे गाणं प्रत्येक व्यक्तीला आयुष्याच्या अपूर्णतेला सामोरे जाण्यासाठी प्रेरित करणार आहे… हो ना!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



khup chan lekh ahe. aplyala hav te aplyala kadhich milat nahi ani jyachi apan apeksha hi karat nahi tya goshti ayushyat sahaj miltat. ayushya he ek sukh – dukhacha khel ahe. jyat kuthe tari kahi navin ghadat astana aplyala tya goshitacha khup anand hoto pn achanak as kahi ghadat ki tyat kahi vait hi ghadat tyavellela as vat ki apan harlo pn kadhi kadhi kadhi as vatat ki nahi ya harnyatun aplyasathi pudeh kahi changala ghadu shakat. Aplya ayushyat yenara pratyek manus ha shanbhangur asto kahi kalapurta , pan apanch tyachyakde avastav apeksh tevhto ki tyane aplyala have tase rahave, kadhi kadhi vatte ka apan aplyasathi tyala thmabvave, tyache aushya tyala vatel ts , mg apan hi ka tyacha vichar karat basav apan hi yatun pudhe jav, pn satat jar tyach goshti ghadat rahilya tr man nirasha hota ani ase vatte ki he kuthe tari thambayla have pn kuthe ani kase? ya prashanavhe uttar sapdat nahi. kahi manse ayushyat sukh gheun yetat pn he sukh shanik asat ani apan te aplya sobat kayam asav as vate. ayushyat anek adhachani yetat pn tya kuthe thambayche navach ghet nahit ase vatte ki sampavav he ayushya kiti ha sukh- dukhacha kehl kadhi sampanr pn parat vatat ki nahi yatun kahi changal hi pudhe asu shakat. eka navin divsatchi vat pahat ayushya he jagavach lagat. khup ekat vatat jevha aplya sobat manas aunshi tyat apal as koni nasat, he jag fakt swarthi lokani bharlel ahe te konihi aso family member kiva agadi javlchi vyakti.mg ashaveli vatat ki mansavar vishvas theva ki nahi. he lekh vachlyavar manat kuthetari navin asha yete