
स्व-संवाद
(मानसशास्त्र विद्यार्थी)
दिनांक १७ एप्रिल २०२०
आपल्याबरोबर चांगले-वाईट जे काही घडल्यावर मनात येणारे विचार भावना आणि त्यावर आपण करतो ती कृती या सगळ्यांचा परिपाक म्हणजे स्वसंवाद होय. तुम्ही कधी या गोष्टीचा अनुभव घेतला आहे का ? की तुम्हाला कुटुंबातील / परिचयातील व्यक्तीबद्दल विचारले की त्या कशा आहेत ? तर आपण एका दमात त्या व्यक्तीबद्दल चांगली-वाईट अशी प्रचंड माहिती देऊ शकतो, परंतु तुम्हाला जर तुमच्या स्वतःबद्दल हाच प्रश्न विचारला तर तुम्ही थोडे अडखळता, विचार करता (अपवादही असतील) परंतु आपण जितका विचार इतरांबद्दल करतो किंवा त्यांना ओळखतो तितकासा विचार आपण स्वतःबद्दल कधी केलेलाच नसतो किंवा आपण स्वतःला तितकसं ओळखतही नसतो. म्हणजे बघा आपण आपल्या स्वतःशी नेहमी स्व संवाद साधत असतो, सतत आपल्या मनात विचारांचे तरंग उठत असतात परंतु ही क्रिया बरेचदा आपल्या मनात अजाणतेपणी घडत असते परंतु जर हीच क्रिया आपण ठरवून जाणिवेच्या पातळीवर स्वता:शी संवाद साधता आला तर तो स्वसंवाद अधिक प्रभावी ठरू शकेल.
आपल्या विचारां प्रमाणेच भावना ओळखणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. तर त्यासाठी आपल्याला आपली स्वतःची ओळख असणे अत्यंत गरजेचे आहे. मग त्यासाठी काय करता येईल? तर सध्या लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवलेली असल्या कारणाने आपल्या स्वतः साठी द्यावयाला आपल्याकडे मुबलक वेळ आहे. तर रोज जाणीवपूर्वक स्वसंवाद साधा त्यावेळी मनात येणारे विचार, भावना सकारात्मक आहेत की नकारात्मक ते ओळखा.
जास्त प्रमाण कोणत्या विचारांचे आहे सकारात्मक की नकारात्मक ते तपासा. कारण ज्या विचारांची संख्या जास्त त्यावर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडत असते. तसेच दिवसभरामध्ये कुटुंबातील / इतरांशी वागत असतांना ज्या काही भावना (प्रेम, राग, लोभ, मत्सर, भय व इतर) आपल्या मनात निर्माण होत असतांना त्याकडे लक्ष केंद्रित करा व त्या भावनांचे विश्लेषण करा. यावरून आपल्याला इतरांशी संवाद साधत असतांना किंवा एखादी घटना घडत असतांना कोणत्या प्रकारच्या भावना आपल्या मनात येत आहे ? का येत आहेत ? मी आनंदी आहे की दुःखी होत आहे ? की अजून काही आहे ? हे समजणे सोपे जाईल व त्यानुसार आपल्याला काही प्रमाणात भावनांवर नियंत्रण मिळवता येऊ शकेल.
भावनांवर नियंत्रण मिळविणे तसे सोपे काम नाही परंतु अशक्य देखील नाही. प्रयत्नपूर्वक स्व-संवादाच्या आधारे आपण काही प्रमाणात भावनांवर नियंत्रण मिळू शकतो. मनाशी होणारा स्वसंवाद आपलं मानसिक आणि भावनिक प्रतिबिंब असते. चांगल्या विचारांनी मूड चांगला होतो तर नकारात्मक विचारांनी मूड खराब होतो आणि या सर्वांचा परिणाम नकळतपणे आपल्या मनस्वास्थ्यावरच नव्हे तर शरीरस्वास्थ्यावर देखील होत असतो. त्या बरोबरच आत्मविश्वास व कामगिरीवर ही त्याचे दुष्परिणाम पहावयास मिळतात.
सर्वात प्रथम नकारात्मक विचार ओळखायला शिका.
1) माझ्या बाबतीत कधीच काही चांगलं होऊ शकत नाही.
२) माझं नशीबच खराब आहे.
३) माझ्या हातून काहीच चांगलं होऊ शकत नाही.
४) माझ्याच बाबतीत असं का होतं ?
५) मीच खूप वाईट आहे. जर सतत असे विचार तुमच्या मनात येत असेल तर तुमचं काही चांगलं होईल ही अपेक्षाच मुळी आपण कशी ठेवू शकतो ? आपली जर जास्तीत जास्त ऊर्जा नकारात्मक विचार करण्यात खर्च होत असेल तर आपण प्रगती कशी साधनार ?
नकारात्मक विचार करणारी व्यक्ती ही इतरांशी देखील नकारात्मकच बोलत असते त्यांच्या साठी आयुष्य हे कंटाळवाणे बनते. त्यांचा स्वभाव किरकिरा बनतो. नवीन निर्मिती करण्याची उर्मी त्यांच्या कडे नसते त्यांची प्रगती खुंटते. जितका जास्त नकारात्मक विचार या व्यक्ती स्वतःबद्दल करतात तितकीच जास्त दुःख व वाईट गोष्टी आपल्याबरोबर घडत आहेत असा भास त्यांना सतत होत असतो व त्यामुळे अशा व्यक्ती कालांतराने नैराश्येच्या खाईत लोटल्या जातात.
दैनंदिन जीवनात प्रत्येक व्यक्तीकडून चुका तर होणारच कारण कोणताच व्यक्ती हा परिपूर्ण नसतो त्यामुळे चुकांबद्दल स्वतःला शिक्षा देऊ नका. परत अशा चुका होऊ नये म्हणून त्यावर सकारात्मकपणे मार्ग काढण्याचे कौशल्य आत्मसात करा. आयुष्यात अडचणी व काहीवेळा संकटे ही येणारच हे अपरिहार्य आणि नियंत्रणा पलीकडचे आहे. अशावेळी सकारात्मक विचार करणारी व्यक्ती खचून न जाता कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आपल्या पूर्ण क्षमता उत्तम रित्या वापरू शकते.
सकारात्मक विचार करणा-यां व्यक्ती नाती निभावणारी असतात. त्यांच्या मध्ये प्रचंड उत्साह भरलेला असतो. त्यांच्यामध्ये अमर्यादित सकारात्मक ऊर्जा असते व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना देखील ती ऊर्जा ते देत असतात. ते इतरांना आपल्याकडे आकर्षित करतात. आपसूकच त्यांच्या प्रगतीचा वेग वाढतो. अशा व्यक्ती सर्वांनाच हव्याहव्याशा वाटतात.
सकारात्मक विचार करायची स्वतःची तयारी व इच्छा असेल तर नक्कीच आपण विचारात बदल घडवून आणू शकतो. विचार बदलायला जरी बराच अवधी लागला तरी हळूहळू हे आपल्या अंगवळणी निश्चित पडेल. त्यासाठी थोडे कष्ट घ्या. प्रयत्न करा. आणि वेळच मिळत नाही ही सबब बाजूला ठेवा.
गुलजार –
“तुझको बेहतर बनाने की कोशिश में,
तुझे ही वक्त नही दे पा रहे हम !
माफ करना ये जिंदगी,
तुझे हि नही जी पा रहे हम !!
“धन्यवाद”
आवाहन – सभोवतालची अस्वस्थता वाढत आहे. ही चाहूल लक्षात घेता. आम्ही सर्व मानसशास्त्र विद्यार्थ्यांना आवाहन करत आहोत की आपण जास्तीत जास्त लेख लिहावे. आपल्या लेखाची योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील. तसेच सोबत काम करण्याची संधी देण्यात येईल. संपर्क – ९१७५४२९००६.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!


लेख आवडला
लेख खूप छान आहे
Very nice sir
हा लेख खूप आवडला
U give Very nice message.every one should be positive in all conditions, when our mind is strong
खूप छान आहे हा लेख….अगोदर मी ह्या टीम ला खूप धन्यवाद देते, मी सगळे लेख वाचते सगळे लेख खूप छान असतात. हा लेख तर माज्या साठी फार महत्वाचा ठरला, माझ्या ही मनात खूप निगेटिव्ह विचार चालू होते , i hop मी ते नक्कीच पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करेल, वरील लेख पूर्णपणे follow करण्याचा प्रयत्न करेल
खूपच छान. सुंदर लेखन.
तुका म्हणे होय मनासी संवाद ।
अपुला चि वाद आपणासी ।।
तुका म्हणे धीर ।
भंगलिया पाठी किर ।।