संकुचित मन हे कायम शंका आणि संभ्रम निर्माण करतं.
सोनाली जे
संकोच याचा अर्थ काय? तर भीड वाटणे.. संकुचित मन म्हणजे काय आपल्या मनाचे जे अनेक कप्पे आहेत ते बंद कप्पे तसेच बंद ठेवले तर अंधाऱ्या कोठडीत जसे जीव गुदमरतो तसेच काहीसे होते..आपले मन म्हणजे आपले विचार , अपेक्षा, अनुभव यांचा कोंडमारा होवून ते संकुचित होते..याउलट जर त्या मनाची कवाडे उघडत गेलात तर मनातील साठलेल्या गोष्टी , विचार , अपेक्षा यांना मोकळीक मिळेल ..ओपन minded म्हणतो तसे..
मनुष्य प्राणी हा असाच आहे..मनाची कवाडे मोकळेपणानं उघडत गेला तर आत भावनांचा कोंडमारा होत नाही..याउलट जर कवाडे बंद करूनच ठेवली तर बंदिस्त जागेत जसा जीव गुदमरतो , ती जागा धूळ , जळमटे यांनी भरून जाते आणि कित्येकदा त्याची भीती ही वाटते..
मी हे नेहमीच सांगत आले आहे , मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्याला लहानपणापासून मिळालेले अनुभव , इतरांनी त्याच्या सोबत केलेले वर्तन , त्या व्यक्ती ची स्वतः ची बुद्धिमत्ता , knowledge , लहानपणापासून ज्या वातावरणात वाढला आहे ते वातावरण याचा प्रभाव त्यावर पडत असतो.
लहान मुले निरागस असतात..लपवाछपवी , किंवा एखाद्या ला एखादी गोष्ट सांगायची , आणि तीच दुसऱ्याला नाही सांगायची हे त्यांना जमत नाही..ती सर्वांशी मोकळेपणाने वागत असतात..
परंतु जस जसे लोकांचे , आपल्या जवळच्या लोकांचे अनुभव येवू लागतात तेव्हा मना मध्ये काहूर उठते..काही जवळच्या व्यक्ती काही गोष्टी मोकळेपणाने सांगतात तर काही आपल्यापासून लपवून ठेवतात. पण ज्याला पहिल्यापासून मोकळेपणाने बोलण्याची सवय आहे त्याच्या बाबत हे इतरांकडून वारंवार घडू लागले की तो ही संकुचित मनोवृत्तीचा होवू लागतो. कोणाशी काय बोलायचे काय नाही हे मोजून मापून , अंदाज घेवून बोलू लागतो..व्यक्त करू लागतो..थोडक्यात मोकळी असलेली कवाडे हळूहळू बंद करून घेवू लागतो.
समजू लागते त्या वयात मैत्री म्हणली की ती मैत्री दिलखुलास , मनमोकळे पणाची असते सुरुवातीला.
रमेश आणि उमेश दोघेही घनिष्ट मित्र .सुरुवातीला प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत शेअर करत मग टिफीन असेल , किंवा एकमेकांच्या भावना असतील किंवा शैक्षणिक प्रॉब्लेम्स, पण हळूहळू उमेश ची मैत्री सुरेश बरोबर ही वाढली आणि मग रमेश करिता वेळ देणे त्याला जमेना, तरी ही एकमेक चांगले मित्र समजत होते.पण हळूहळू उमेश जर गरज असेल तेव्हाच भेटत असे रमेशला , फोन ही गरज असेल तेव्हाच , नोट्स पाहिजे असतील तर गोड गोड बोलत असे इतर वेळी काहीच बोलणे नाही , भेटणे नाही तर हे उमेश चे वर्तन रमेश या मित्राला त्रास देवू लागले. जो सुरुवातीला मित्र म्हणून मोकळेपणाने बोलत होता .सांगत होता काही अडचणी आल्या तर सांगत होता पण आता उमेश ने नवीन मैत्री केली त्यामुळे आपल्या जुन्या मित्राला रमेश ला वेळ देवू शकत नव्हता.
त्याच्या समस्या काय आहेत , भावना काय याकडे दुर्लक्ष करू लागला , आणि त्याच्या या बोलण्यात इंटरेस्ट नसायचा, .. फोन नाही , भेट नाही , समोर दिसलो तर बोलणे आणि हे एकदा नाही वारंवार घडू लागले.त्यातून रमेश ची मोकळेपणाची वृत्ती ही संकुचित वृत्ती मध्ये बदलली..आणि तो ही उमेश सोबत खूप मर्यादित गोष्टी बोलू लागला..याचे कारण रमेश ला मात्र सारखी हीच शंका येवू लागते की उमेश चा सुरेश नवीन मित्र झाला म्हणून तो आपल्या सोबत अंतर ठेवून वागू लागला.आणि मग संभ्रम निर्माण झाला की खरेच आपली मैत्री आहे का?? उमेश खरेच आपला ही मित्र आहे का ?
कदाचित उमेश ला ही हा प्रोब्लेम येत असेल की तो रमेश आणि सुरेश या दोघांनाही वेळ देत असेल किंवा दोघांना समजून घेताना कुठे तरी कमी पडत असेल त्यामुळे दुर्लक्ष होत असेल , किंवा रमेश चे तेच तेच प्रॉब्लेम्स , तेच तेच बोलणे याचा ही कंटाळा येवून तो त्याला टाळू लागला असेल. संभाव्यता कोणत्याही असतात. पण यातून जो जास्त भावनिक असतो तो संकुचित मनोवृत्तीचा होवू लागतो..आणि एखाद्या अनुभवातून असे होत नाही पण वारंवार तेच घडले तर मात्र निश्चितच त्याचा परिणाम मन आणि वर्तन या दोन्ही वर होतो.
संकुचित मन राहू नये , इतर कोणाबद्दल काही शंका निर्माण होवू नयेत म्हणून प्रत्येकाने काही गोष्टी आपल्या कंट्रोल मध्ये ठेवल्या पाहिजेत.
१. स्वतः गोष्टी solve करण्याचा प्रयत्न करा…किती ही कोणी जवळचे असले तरी स्वतः विचार करा, नक्की प्रोब्लेम काय आहे हे जाणून घ्या , त्यावर सर्वांगीण विचार करा.लगेचच कोणता निर्णय घेवू नका. आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो…
२. सगळ्या गोष्टी अगदी सुरुवातीपासून मनमोकळेपणाने बोलू नका.. तुम्ही जर सगळ्या गोष्टी सांगत गेलात तर समोरचा तुमचे weak point बरोबर ओळखतो आणि बरेचदा त्यावर मात करण्याकरिता त्याची मदत होण्याऐवजी तो आपला गैरफायदा घेण्यात च होते..किंवा अगदी गैर फायदाच असे नाही पण गृहीत धरतो , जसे दुसरे कोणी मित्र नाही म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगणार, आपल्यावाचून त्याचे अडेल. ..असेही होत जाते.
म्हणून समोरच्याचा अंदाज घ्या थोडा काळ जावू दे त्यानंतर समोरच्यावर विश्वास ठेवून मग मोकळेपणाने बोला.समस्या सांगा..तरी ही त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका.
३. स्वतः ची निर्णयक्षमता वाढवा : – काही वेळेस काही गोष्टीं आपण पहिल्यांदा करत असतो ..स्वतः चे बरोबर आहे का याची खात्री नसते, काही चुकले तर काय होईल या संभाव्य परिणामांना व्यक्ती घाबरत असते. चुकले तर काय याची चिंता सतावत असते. म्हणून मोकळेपणाने आपल्या व्यक्ती सोबत बोलले जाते.. पण ती व्यक्ती ही त्या बाबतीत आपल्याच एवढी नवशिकी असेल तर ती आपल्याला काय guide करणार किंवा काय सल्ला देणार ..म्हणूनच बोला पण जो निर्णय आहे तो स्वतः घ्या..येणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांना , धोक्याचा सामना करण्याची क्षमता वाढवा.
४. आपला मित्र परिवार , नाते परिवार , ऑफिस मधला सहकारी वर्ग , समाजातील संपर्क वाढवा :-
जसे डबक्यात वाढणारे मासे लहानच असतात..तुलनेने नदी मध्ये गोड्या पण्यातले थोडे वेगळे , मोठे असतात, आणि समुद्रातले तर खूपच विशाल असतात..कारण काय तर डबक्यात राहणाऱ्या माशांना पाणी ही मर्यादित आणि खाद्य ही मर्यादित..आणि ते साठलेले पाणी किती काळ तेवढेच राहणार , आणि त्यात घान पडली तर दूषित होणार..याउलट नदी किंवा समुद्र यांचा वाहता प्रवाह , स्वच्छ पाणी यातून त्यांना शुद्ध हवा ही मिळेल आणि खाद्य ही जास्त मिळेल त्यामुळे त्यांची वाढ ही निरोगी आणि सुदृढ होईल.
तसेच काहीसे मनाचे ही आहे..काही मोजक्या लोकांच्या अनुभवात बसलात तर तिथेच गुंतून पडाल याउलट जेवढ्या जास्त लोकांचा सहवास , परिचय , संपर्क तेवढे त्यांचे अनुभव , विचार ,कल्पनाशक्ती , एखादा प्रोब्लेम solve करण्याची त्यांची पद्धत , क्षमता आणि वैशिष्ट्य यांचा अनुभव आपल्याला ही उपयोगी पडतो..आणि अनेक लोकांच्या संपर्कात असल्याने एखाद्या कडून एखादी गोष्ट दुर्लक्षित केली गेली तरी दुसरे अनेक जण असतात जे आपणहून दिशा दाखविणारे ही असतात..तर कधी सल्ला मागितला तर आपले पणाने देणारे..
५. स्व मनावर कंट्रोल ठेवा :: समोरच्या कोणाच्या वागण्याने स्वतः वर , आपल्या विचारांवर आणि मनोवृतीवर परिणाम होवू देवू नका . कोणी ही कसे ही वागू देत आपले वागणे हे जसे आपल्याला सहज वाटते तसेच असावे. तसेच ठेवावे..त्यावर केवळ आणि केवळ आपलाच अंकुश असावा.
जेवढे छोट्या वर्तुळात राहाल तेवढे संकुचित मन हे कायम शंका आणि संभ्रम निर्माण करतं राहील त्यापेक्षा स्वतच्या कक्षा वाढवा, क्षमता वाढवा, तर त्याच त्याच आणि त्रासदायक गोष्टीत अडकून पडण्यापेक्षा नवीन गोष्टी शिकण्यात आणि करण्यात वेळ आनंदाने घालवाल..आपल्या क्षमता वाढविल्या तर अजून जास्त चांगल्या opportunities मिळत जातील .पण आखडूपने वागलात तर लोकांपासून दुर्लक्षित च राहाल .आणि अजून जास्त संकुचित मन होवून सतत बाकी लोकांविषयी शंका आणि त्यांच्या वागण्याचा संभ्रम निर्माण होईल..
यापेक्षा तुम्ही तुमचे आयुष्य मुक्तपणे , मोकळेपणाने जगा , स्वतः चे विचार , भावना , निर्णय यावर इतरांचे विचार , त्यांचे मुड , त्यांच्या गरजा यांचा परिणाम होवू देवू नका.. इतरांना जगायचे तसे जगू देत पण इतरांच्या वागण्यामुळे तुमचे वागणे दोलायमान होवू देवू नका..
प्रत्येकाच्या आयुष्यात ही संकुचित मनाची अवस्था येणारच , कधी नोकरी निवडी चा प्रश्न असेल तर कधी नाती निभावताना किंवा जपताना त्यात निर्माण होणारी संभ्रमावस्था असेल किंवा जवळच्या लोकांवरच्या विश्वासावर शंका असेल ..सगळ्यांचे solution तुमच्या स्वतः कडे आहे.. अनंत आकाश आणि अथांग समुद्र याकडे बघून त्या प्रवाहासोबत मोकळेपणाने आनंदाने पुढे जात रहा..डबक्यात राहिलात तर संकुचित च राहाल..
जीवन सुंदर आहे आपला दृष्टिकोन विशाल ठेवा..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


