Skip to content

शरीर थकायला वेळ लागतो पण मन सहज थकते..

शरीर थकायला वेळ लागतो पण मन सहज थकते..


मिनल वरपे


काल असा प्रसंग घडला की त्याचं दुःख आवरेनास झालं.. काय करावं.. असच का घडलं.. माझ्याच बरोबर अस का घडते.. यापुढे मी कस वागावं… हे विचार तर माझ्या बाबतीत होते पण त्याचसोबत अजून आजूबाजूचे त्या प्रसंगाशी निगडित असे हजारो प्रश्न हजारो विचार माझ्या मनात गर्दी करत होते.

रात्री हे सगळे विचार करता करता कशी झोप लागली कळलच नाही.. आणि सकाळी जाग आली तेव्हा एका क्षणासाठी सगळ्याचा विसर पडलेला चटकन उठून बसली म्हणलं चला आता पटपट काम आवरूयात.. पण त्याच्याच पुढच्या क्षणाला माझ्या मनाने मला आठवण करून दिली काल जे घडलं त्याची… तेव्हा वाटलं अरे मी स्वप्नात होती की काय..

नक्की माझं मन सांगतेय ते खरं आहे की नाही… स्वप्न असेल तर बरं होईल… पण नंतर जाणीव झाली की सगळं घडलेलं आहे.पण नंतर काहीच करण्याची इच्छा राहिली नाही. नाराज अनुत्साही वातावरण जाणवू लागलं.आणि मला सकाळीच थकल्यासारखे जाणवू लागलं.

म्हणजेच बघाना इतकं सगळं घडल त्यावेळी काम सोडून मी रडत नाही बसली तरीसुद्धा शरीर नाही थकलं… सकाळी जाग आल्यावर शरीराने साथ दिली. चटकन उठून बसली पण मनाने मात्र पुन्हा विचारांची आठवण करून मला त्याचं जागी पुन्हा विचारांमध्ये अडकवल.

याचा अर्थ अगदी सहज लक्षात येतो म्हणजे आपल्याला शरीर पुढे जाण्यासाठी साथ देत असतो पण जेव्हा मनात विचारांची गर्दी असेल आणि ती सुद्धा नकारार्थी तर नक्कीच काहीच सुचेनास होते.. आपण काय बोलतोय ..आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला कळतच नाही.

असे मलाच नाही तर प्रत्येकाला अनुभव येतातच. जेव्हा एखादी मनासारखी, आपल्याला हवीहवीशी वाटणारी गोष्ट घडली तर आपल्या मनात नकारार्थी विचारांना जागा नसते कारण आपल लक्ष हे त्या आनंदात असते., सकारात्मकतेकडे.. असते. ज्यावेळी मन आनंदी असेल मनात सकारात्मक विचार असतात त्यावेळी आपल्याला नविन ऊर्जा मिळते .. नविन ऊर्जा म्हणजेच नविन उत्साह… आपल्याला नवीन वाट दाखवतो.

पण जेव्हा मनाविरुद्ध काही घडले, एखाद दुख आल की तेच मन आपल्याला नकारार्थी विचारांनी इतकं थकवते की आपल्याला पुढचं पाऊल टाकण्याची हिम्मत होत नाही… तो दिवस ती वेळ तो क्षण… अगदीच नकोसा वाटू लागतो. सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जाण्याची इच्छा आपल्याला अजून प्रकर्षाने जाणवते. नवीन ऊर्जा मिळणं तर दूर येणारा नविन क्षण सुद्धा नकोसा वाटू लागतो.

म्हणून इथे आपल्याला हे लक्षात यायला हवं की मन हे जर नकारार्थी विचारांनी थकतेय तर मी असे विचार टाळले पाहिजे. ज्या विचारांनी मला नविन ऊर्जा मिळेल सकारात्मकता मिळेल अशाच विचारांना मी माझ्या मनात थारा दिला तर माझं मन उत्साही राहील… आणि माझं मन हे कायम उत्साही ठेवलं तरच मला जगण्याचा आनंद घेता येईल कितीही वाईट प्रसंग घडले तरी माझे पावलं माघार घेणार नाहीत..

म्हणून शरीर कितपर्यंत साथ देईल…कधी थकेल माहीत नाही पण माझ्यातील सकारात्मक विचारांनी माझं मन मला ऊर्जा देऊन जगण्याची नविन दिशा देईल म्हणून मला माझ्या मनाला नकोत्या विचारांनी थकवायच नाही हे नक्की….



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!