Skip to content

व्यस्त असला की माणूस मस्त राहतो…

व्यस्त असला की माणूस मस्त राहतो…


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आताचा एकूणच जगणं हे धकाधकीच, धावपळीच, वेगवान झाल आहे. कोणालाही तसं पाहायला गेलं तर वेळ नसतो. कधी भेटायला जायचं असलं तरी माणसाला आधी कळवावं लागतं इतका माणूस आपल्या कामात व्यस्त झाला आहे. पण हे व्यस्त असताना माणसासाठी फायदेशीर असल्याचे दिसून येते.

हिंदी मध्ये प्रसिद्ध म्हण आहे, “खाली दिमाग शैतान का घर” म्हणजेच माणूस रिकामा असला की चुकीच्या गोष्टींकडे वळण्याचा कल जास्त असतो. काही ना काही खुरापत करणे, कुरघोड्या करणे हेच माणसाचे काम बनते. म्हणून माणसाने नेहमी व्यस्त राहिले पाहिजे. कारण व्यस्त राहिल्याचे बरेच फायदे आहेत.

पण व्यस्त राहणे म्हणजे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या स्वतःला थकवणे नाही. बऱ्याच लोकांचा असा ग्रह असतो की २४*७ काम करणे म्हणजे व्यस्त राहणे ज्यातून त्यांना फायदा होईल. ज्यातून ते त्यांचा दुःख, त्रास विसरू शकतात. पण अतिरिक्त काम करणे यातून नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे व्यस्त राहणे म्हणजे अतिरिक्त प्रमाणात अंग मोडून काम करणे नव्हे.

व्यस्त राहणे म्हणजे आपल्या मनाला सक्रिय ठेवणे, active ठेवणे. अशी गोष्ट करणे जी प्रॉडक्टिव असेल, ज्यातून काही चांगले घडेल. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा व्यस्त असतो तेव्हा आपण वर्तमान काळात म्हणजेच आताच्या क्षणात जगत असतो आणि अशाप्रकारे त्या गोष्टीत गुंतल्याने लक्ष घातल्याने नको असणारे विचार अतिरिक्त चिंता, नकारात्मक विचार आपल्या डोक्यात येत नाहीत.

बऱ्याचदा रिकाम असल्यावर आपण होऊन गेलेल्या गोष्टींच तसेच पुढच्या गोष्टीचं चर्वण करत बसतो. तेच तेच डोक्यात घोळवत बसतो ज्यातून चांगलं काहीच होत नाही नाही. म्हणून त्याला कुठल्या तरी चांगल्या गोष्टीत गुंतवून ठेवणे कधीही चांगलं.

एखाद्या कामात बिझी झाल्याने ते काम करण्याची पुढे नेण्याची प्रेरणाही वाढते. आता व्यस्त राहायचं ज्यातून काही चांगल होऊ शकत अशा गोष्टी कोणत्या? तर आपल्या आयुष्यात पाच areas आहेत, पाच क्षेत्र आहेत. जी आपण maintain केली ज्यात आपण ऍक्टिव्ह राहिलो तर आपला आरोग्य अजून चांगल होऊ शकत.

१. Material (भौतिक काम): भौतिक काम म्हणजे आपण नेहमी करतो ज्यात आपलं ऑफिसचं काम असेल वेळेवर जेवण, पुरेशी झोप घेणं, घरातील एखादी काम असतील, अश्या गोष्टी आपण प्रत्यक्ष करत असतो जी दिसून येतात ती सर्व काम करणे. यामुळे आपलं शारीरिक आरोग्यही चांगलं राहतं तसच आपण मानसिक आणि शाररिक दृष्ट्या व्यस्त म्हणजेच active राहतो.

२. Hobbies( छंद): प्रत्येकाचे काही ना काही छंद असतात, असलेही पाहिजेत. यातून आपली क्रिएटिव्हिटी वाढते. आपण नवीन काही ना काही शिकत राहतो, स्वतःच्या mind ला चॅलेंज करतो. आपला माईंड फ्रेश होतो. मन उत्साही होतं. तसेच मेंदूमध्ये dopamine level वाढते.

३.exercise(व्यायाम): व्यायाम आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. नियमित चालल्याने, तसेच योगा केल्याने ताण कमी होण्यास मदत होते. मन एकाग्र होते. आपलं शरीर फिट राहतं.

४. Relationship (नातेसंबंध): माणूस मुळतः सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे नाती तयार करण ती जपण यातून माणूस अजून समृद्ध होतो. नातेसंबंधांमध्ये आपल्या घरातील लोक, मित्र-मैत्रिणी, इतर लोक यांच्यासोबत बाहेर फिरायला जाणे, सुखदुःख वाटणे यातून मन हलकं होत. एखादा आनंदी क्षण मित्रांसोबत साजरा केल्याने तो आनंद वाढतो.

५. Mental (मानसिक): आपल्याकडे शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्याला फार महत्त्व दिले जात नाही. जे दिलं गेलं पाहिजे. मानसिक आरोग्य जपणे म्हणजे चांगल्या पद्धतीने भावना हाताळता येणे आणि वर्तमानात जगणे. एखादी मानसिक समस्या असेल तर तज्ञ व्यक्तीला भेटणे, त्याच्याबद्दल काळजी घेणे. आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक चांगला कसा ठेवता येईल त्याच्यासाठी काय काय केले पाहिजे यावर लक्ष देणे त्यात ॲक्टिव राहणे.

या सर्व गोष्टी आपल्याला mentally आणि physically active ठेवतात, व्यस्त ठेवतात. त्यामुळे जितका आपण आपल्या कामामध्ये, शारीरिक आरोग्य असेल, मानसिक असेल, तसेच नातेसंबंध, छंद असतील यात बिझी राहू तितका आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला होतो. नवनवीन कल्पना सुचतात, सृजनशीलता येते. अशावेळी निगेटिव्हिटी येण्याचे चान्सेस कमी असतात.

म्हणूनच मनाला आणि शरीराला चांगले आणि productive गोष्टींमध्ये active ठेवा. यामुळे उदासिनतेचा नकारात्मक त्याचा शत्रू आपल्या जवळ येणार नाही. अशा व्यस्त राहण्याने आपण अजून मस्त होऊ.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “व्यस्त असला की माणूस मस्त राहतो…”

  1. अप्रतिम खूप सुंदर लिहिलात लेख

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!