वैचारिकदृष्ट्या कोणाचेही गुलाम बनू नका, याबद्दल तरी स्वतंत्र जगा.
सोनाली जे
भारतीय राज्यघटनेच्या आदेशानुसार कलम 19 नुसार भारतातील प्रत्येक व्यक्तीला भाषा आणि विचार स्वातंत्र्य दिलं आहे. तसंच भारताच्या कोणत्याही भागात संचार करण्याचं स्वातंत्र्य, कोणत्याही भागात वास्तव्याचं स्वातंत्र्य, तसंच कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे.
या एका कलमात किती गोष्टींचा समावेश आला बघा. कायद्याने , राज्य घटनेने च तुम्हाला वैचारिकदृष्ट्या कोणाचेही गुलाम बनू नका, याबद्दल तरी स्वतंत्र जगण्याचा अधिकार दिला आहे.
तरीही मी जे नेहमी सांगत आले आहे की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे .त्याला इतरांची गरज कायमच असते. मग नातेवाईक , मित्र मंडळी , शेजारी, ऑफिस मधील सहकारी , दुकानदार , दूधवाला हे ही या समाजाचे घटक च आहेत.
काही वेळेस असे होते की आपण काही तरी विचार करत असतो आणि त्यात दुसरे कोणी येवून काही सांगते हे असे नाही ते तसे मग आपला आपल्याच विचारांवर असलेला विश्वास डळमळीत होतो आणि असे वाटते की समोरची व्यक्ती बरोबर विचार करते आहे आपण तसेच केले पाहिजे. असे का होते कारण आपले विचार ठाम , पक्के नसतात. किंवा पूर्वी येवून गेलेले अनुभव , पुढे काय होईल याची चिंता यातून आपण जे विचार करतो आहोत ते बरोबर का चूक यात गोंधळ उडतो.
समोरच्या पेक्षा स्वतः जे विचार करता त्यावर ठाम रहा. विचार करताना ते सर्वांगीण करा. आणि तुम्ही जे विचार कराल आणि त्या अनुषंगाने पुढचे पावूल उचललं जाईल.जसे समजा तुम्ही एखादा व्यवसाय करायचे ठरविले तर तुमची वैचारिक पातळी वाढवा. की व्यवसाय सुरू करण्याकरिता त्या व्यवसायाला बाजारात किती मागणी आहे, आपण जे production करणार असू तर त्याला खर्च आणि त्यातून होणारा फायदा यांचे गणित मांडा, व्यवसाय उभा राहून त्यातून फायदा होण्याकरिता किती वेळ लागेल याचा अंदाज ..
आणि असे अनेक विचार करून योग्य निर्णय तुम्ही घेतला . आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीने काही वेगळा विचार केला की अगदी हा व्यवसाय नको ..यापासून काही ही की नुकसान होईल. तर तुमचे विचार डळमळीत होतात . याउलट तुम्हाला तुमचे विचार क्लिअर म्हणजे स्पष्ट असतील.त्यात शंका नसेल , तुमच्या विचारांवर ठाम विश्वास असेल , खात्री असेल तर तुम्ही ते विचार समोरच्याला व्यवस्थित पटवून देवू शकता.आणि जे परिणाम होतील त्याला धैर्याने तोंड देण्याची तयारी असेल तर तुमचे विचार तुम्हाला योग्य दिशेने पुढे घेवून जातील.
कोकीळ नेहमी स्वतः ची भाषा बोलते त्यामुळे ती मुक्त असते. याउलट पोपट हा आयुष्यभर दुसऱ्यांचे विचार , भाषा बोलतो , ते जे बोलतील ते वाक्य बोलतो त्यामुळे तो पिंजऱ्यात अडकतो.
तुम्ही जे विचार करता किंवा मांडता त्यावर इतर अनेक जण त्यांचे विचार हे मांडत असतात च. टीका ही करत असतात. कधी डीमोटिव्हेट करत असतात.मग तुम्ही नाराज किंवा निराश होता.
वैचारिकदृष्ट्या कोणाचेही गुलाम बनू नका, याबद्दल तरी स्वतंत्र जगा.आणि त्याकरिता काही टिप्स : –
१. स्वतः ला अलिप्त ठेवा :
स्वतः चे विचार मांडल्यावर लोकांचे जे विचार , टीका आहेत ते अलिप्तपणे ऐकून घ्यायचे.तसे अलिप्त होणे म्हणने सोपे आहे पण कृती अवघड आहे. पण जर अलिप्त राहून त्यांचे विचार ऐकले तर लक्षात येईल की त्यांचे विचार म्हणजे अचूक च आहेत असे नाही.ते विचार त्यांच्या दृष्टीने केले गेले असतील .त्यांचे मत असेल.तुम्ही त्यावर किती focus करायचा किंवा त्यांचे विचार किती लक्षात घ्यायचे हे तुम्ही ठरवायचे.
एखाद्याची विचार करण्याची क्षमता , त्यांचे अनुभव जसे असतील तसेच ते विचार करणार आणि ते च मांडणार.
२. पटकन react करू नका , respond करा : –
इतरांनी काही ही विचार मांडले तरी तुम्ही त्यावर react होवू नका.तुम्ही react झालात तर त्यांचे विचार , टीका याचा त्रास फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच होणार. लागले तर थोडा विसावा घ्या. वेळ घ्या . समोरच्याने जे विचार मांडले त्याचा ही दृष्टिकोन किंवा विचार , टीका लक्षात घ्या. नक्की काय म्हणायचे आहे ते लक्षात घ्या . टीकात्मक विचार असतील तरी त्याचा सकारात्मक विचार करा. आणि जर आपल्या विचारात , कृतीत बदल , सुधारणा करावी असे जाणवत असेल तर नक्की सुधारणा करावी.
आणि जर तुम्ही समोरच्याचे विचार ऐकून तुमचे च बरोबर आहे असे वाटत असेल तर तुमचे विचार ठामपणे पटवून देण्याची तयारी ठेवा.
३. द्वेष , तिरस्कार आणि टीका :-
काही लोक मुद्दाम, जाणून बुजून तुमच्या विचारांना विरोध करतात किंवा त्यात काही तरी चुका शोधत असतात. टीका करत असतात.हे टीका करणारे लोक बहुदा द्वेष किंवा तिरस्कार करणारे असतात. काही वेळेस तुमचे विचार प्रगल्भ , योग्य असूनही ते त्यांच्यातल्या उणिवा , त्यांना आलेले वाईट अनुभव, त्यांचे प्रॉब्लेम्स , तुमचा द्वेष यातून टीका करतात.
याउलट काही खरे टीकाकार ही असतात , जे त्यांचे आणि तुमचे विचार यावर चर्चा करून टीका करतात ज्याचा उपयोग , मदत तुम्हाला तुमचे विचार अजून जास्त क्लिअर करण्यास किंवा त्यांची दिशा थोडी बदलण्यात म्हणजे योग्य बदल घडविण्यासाठी होतो.चांगले काही सुचविण्याकरिता ते टीका करतात. म्हणून द्वेष आणि सकारात्मक टीका यांच्यात फरक समजून आपले विचार निश्चित करण्याकरिता त्याची मदत घ्या.
४. आत्मविश्वास :
इतरांचे बोलणे , त्यांचे विचार , टीका ऐकून स्वतः मध्ये न्यूनगंड निर्माण करून स्वतः मधला आत्मविश्वास कमी होवू देवू नका.
आम्ही ही लेखक बरेचदा लेख लिहून पाठविले की तज्ञ व्यक्ती एक्स्पर्ट ना तो पाठवून फीडबॅक द्या असे सांगतो ..तर तो फीडबॅक खूप महत्वाचा असतो त्यातून तुम्ही कमीपणा मानून घेवू नका तर तो तुमचे विचार समजून घेवून त्यावर दिलेले मत ,आपल्या विचारात जर गरज असेल तर त्यात सुधारणा ही करावी..सकारात्मक ..positive approach ठेवून बघावे.
तुम्ही इतरांचे विचार जरूर ऐका पण स्वतः चे डोके चालवायचे नाही, विचारच करायचे नाहीत , त्यांचेच विचार follow करायचे असे करू नका. वैचारिकदृष्ट्या कोणाचेही गुलाम बनू नका, तुमचे ही काही विचार , ठाम मते असू द्यात. त्यामुळे तुम्हाला ही सखोल अभ्यास करण्याची , किंवा परिस्थिती , प्रॉब्लेम्स solve करण्याची तुमची क्षमता वाढेल. इतरांचे ऐकून बुद्धीला गंज चढन्यापेक्षा बुध्दी , डोक्या मधल्या विचारांना तलवारी सारखी धार चढू दे. त्यांना योग्य दिशा मिळू देत. ध्येय प्राप्ती करिता त्याचा अचूक वापर होवू देत.
“ऐकावे जनाचे करावे मनाचे ” ! हे सर्वांना परिचित आहेच.
गाढवाची गोष्ट सर्वांना चांगलीच माहिती आहे. एकदा एक शेतकरी बाप आपल्या मुलाला आणि सोबत गाढवाला घेवून बाजाराला चालले होते. गाढव पुढे त्याच्या मागे मुलगा आणि बाप . भर दुपारची वेळ , रणरनते उन्ह .थोडे अंतर गेल्यावर काही लोक पारावर बसले होते ते या तिघांना बघून म्हणले काय बाप आहे भर उन्हात मुलाला चालत घेवून जात आहे.
ते ऐकल्यावर बापाने मुलाला गाढवावर बसविले व आपण मागून चालत जावू लागला , परत थोडे अंतर गेल्यावर काही लोकं वाटेत निघाली होती ती म्हणाली ,अरे अरे काय दिवस आले आहेत .मुलगा आरामात गाढवावर बसून पुढे चालला आहे आणि बाप मात्र चालत .मग ते ऐकून मुलगा उतरला आणि बापाला गाढवावर बसवून तो चालत येवू लागला , थोडे अंतर गेल्यावर परत काही लोक भेटले.
आणि ते म्हणाले अरे रे काय हे बाप आरामात गाढवावर बसून निघाला आणि तो मुलगा मात्र चालत. मग बाप म्हणाला मुलाला ये तू पण बस गाढवावर, असे म्हणून ते दोघे त्या गाढवावर बसून निघाले.थोडे अंतर गेल्यावर एक प्राणी प्रिय व्यक्ती त्यांना ओरडला आणि अरे थांबा थांबा ! किती निर्दय आहात. गाढवावर दोघे दोघे बसून त्याचा जीव घेणार का ?प्राण्याची दया नाहीच तुम्हाला. हे ऐकून ते दोघेही गाढवावरून खाली उतरले आणि त्या दोघांनी गाढवालाच खांद्यावर घेतले आणि चालू लागले.
वाटेत पुढे गेल्यावर परत काही लोक भेटले जे यांच्याकडे बघून फिदी फीदी हसत होते. गाढव कोण आणि माणूस कोण ? असे म्हणत होते. शेवटी शेतकऱ्याने गाढवाला खाली उतरविले आणि तो त्याचा मुलगा आणि गाढव तिघेही चालत जावू लागले. आणि आता यापुढे लोक काहीही म्हणू देत पण आपल्याला वाटते तसेच आपण विचार करायचा आणि आचरण करायचे असे शेतकरी ठरवितो.
म्हणजेच काय तर लोक त्यांच्या परीने बोलत असतात , त्यांचे विचार मांडत असतात. आपल्या मुलाला सायन्स करिता admission घ्यायची असते तो तसा विचार बोलून दाखवतो तर लोक म्हणतात त्याला जमेल का झेपेल का ? त्यापेक्षा कॉमर्स सोपे असते. बाकी लोकांचे विचार ऐका पण जे विचार तुम्हाला योग्य वाटतात , पटतात त्याप्रमाणेच वागा.
प्रत्येकाला उपजतच बुध्दी दिली आहे, वैचारिक क्षमता आहे, प्रोब्लेम solving capacity आहे, विचारांचे स्वातंत्र्य आहे.
वैचारिकदृष्ट्या कोणाचेही गुलाम बनू नका, याबद्दल तरी स्वतंत्र जगा. आयुष्य सुंदर आहे. विचारपूर्वक पण मुक्तपणे जगा. आणि ध्येय पूर्ती करिता योग्य दिशेने वाटचाल करा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


