Skip to content

“वारंवार आत्मविश्वास गमावणारे प्रसंग यांचा सामना असा करून पहा”

“वारंवार आत्मविश्वास गमावणारे प्रसंग यांचा सामना असा करून पहा”


आकांक्षा किरणराव आळणे

(MBBS),


माणसा खूप स्वप्नाळू प्राणी आहे. स्टेटस स्वप्न बघत असतो. स्वप्नांचे विश्व रंगवत असतो आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप खटाटोप ही करत असतो. स्वतःवरचा विश्वास असतो जो स्वप्न बघायला भाग पाडतो आणि डोळे झाकून त्या स्वप्नावर विश्वासही ठेवतो. पण मित्रांना स्वप्न आणि सत्य यात खूप फरक असतो आपण ध्येयाकडे वाटचाल करतो तेव्हा अनेकदा आपल्याला आपला आत्मविश्वास डगमगेल आपल्याला स्वतःवर शंका येईल असे प्रसंग घडत असतात.

पूर्णपणे आपण परिस्थिती शरण जाऊन स्वतःच्या क्षमतेवर शंका घेतो. असे वाटायला लागते की आपण जे स्वप्न पाहिले जे आपले ध्येय आहे ते आपण साध्य करू शकू की नाही अनेक निकट जन, मित्र-मैत्रिणी आणि आपल्या सो-कॉल्ड नातेवाईक जे दुःख सावरण्यासाठी कधी वेळेवर हजर नसतात पण करिअरमध्ये जराशी tough situation आली तर आई-वडिलांना पेक्षा जास्त अधिकाराने विचारपूस करतात.
चालतेच आहे मित्रांनो…!!

“जिंदगी है इतना आसान तो नही होगी
आसान हो तो क्या खाक वो जिंदगी होगी..??”

आयुष्यात तरी ‘डाऊन फॉल फेज'(सतत अपयश,सतत खच्चीकरण करणारे प्रसंग)येणार नाही ही परिस्थिती अटळच आहे. पण आपण प्रयत्न करूयात मित्रांनो थोडासा स्वतःला सांभाळून घेण्याचा.अपयश,हताश करणारी परिस्थिती परिणामतः आत्मविश्‍वास कमी करणारे प्रसंग यांचा सामना करूनच तर माणूस घडतो.

जो व्यक्ती अपयश,मान-अपमान या गोष्टी या चढ-उतरांमधून जातो ह्यांना face करतो तो व्यक्ती खूप तावून-सुलाखून निघालेला असतो आणि आयुष्याच्या कुठलाही कसोटीला तो भक्कमपणे एक हाती सामना करू शकतो.असे व्यक्ती खूप सामर्थ्यवान असतात. म्हणून अपयश अपमानाचे प्रसंग यांचा बाऊ करायचा नाही. पण याचा अर्थ असाही नाही की आपण आपला सुधारणा करायची नाही.

अपयश आले,ऑफिसमध्ये प्रेझेन्टेशन हे पाहिजे तसे झाले नाही सीनियर सोडून मीटिंगमध्ये अपमान झाला,परीक्षेत अपयश आले आणि कॉलेजमध्ये अपमानित झालात या अत्यंत मनावर आघात करणाऱ्या गोष्टी आहेत. अश्या प्रसंगाने नाही म्हटले तरी आत्मविश्वासाला तडा हा जातोच..!!

पण मग आता यावर करायचे काय कुढत बसणे, स्वतःला दोष देणे याचा अंतिम चा निकाल डिप्रेशन, anxiety हाच असतो. म्हणून आपण असा विचार न करता जो काही मूळ प्रॉब्लेम आहे ज्याने आपला आत्मविश्वास कमी झाला आहे त्या प्रॉब्लेम वर आपण work केले पाहिजे. प्रथमतः आत्मविश्वास कोणत्या प्रसंगात कमी होतो ते आपण फाईंड आऊट केले पाहिजे.

अनेक जणांच्या अनेक कारणं असू शकतात. कोणती गोष्ट कोणाचा किती आत्मविश्‍वास कमी करू शकते हे व्यक्तिशः वेगवेगळे असू शकते.
पण सामान्यतः अपयश,अपमान कोणत्या तरी गोष्टीची असुरक्षितता या गोष्टी वारंवार घडल्या तर आत्मविश्वास संपुष्टात येऊ शकतो. त्यामुळे मूळ शोधून काढा त्या गोष्टींवर work करा,सुधारणा करा सातत्याने त्या गोष्टीबाबत कार्यशील रहा.

आत्मविश्वास परत मिळवता येतो फक्त सातत्याने त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून सुधारणेच्या दिशेने कार्य करत रहा. उदाहरणार्थ-अनवी ला स्टेज डेअरिंग कमी आहे. भाषण देणे,एखादा कार्यक्रम सादर करणे, लग्नसमारंभ अशा गोष्टी ती टाळते कारण तिला तो कॉन्फिडन्सच नाहीये. मुला-मुलींचे या स्थितीला अनेकदा आई वडील तेवढेच जबाबदार असतात.

मुलांना पाहिजे तेव्हा धीर दिला जात नाही, मग ते स्वतःला कमी लेखायला सुरुवात करतात, या कारणामुळे देखील अनेक लहान मुलांना लहानपणापासूनच आत्मविश्वासाची कमी असते. असे मूलं कार्यक्रमात मागेच राहतात,भाग घेत नाहीत परिणामी मोठेपणी ही त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी दिसून येते. अनवी च्या बाबतीतही हेच घडत आहे. आता अशी परिस्थिती येऊन ठेपली आहे की तिला social होणे भाग आहे कंपनीमध्ये पण तिला कॉन्फरन्स घेणे प्रेझेंटेशन देणे या गोष्टी भाग आहेत;अटळ आहेत. अशा वेळेस तिने काय करावे??

तर तिने आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. भाषण असेल तर मिरर मध्ये बघून बोलण्याचा प्रयत्न करावा याने बराच कॉन्फिडन्स restore होतो. प्रेझेन्टेशन असेल तर त्या स्लाईड्स तयार आहेत का??कुठे काय कसे मुद्दे मांडायचे आहेत, हे अगोदर प्लांट करून ठेवायचे म्हणजे वेळेवर धांदल उडत नाही.

लग्न समारंभ गर्दीच्या ठिकाणही अनेक जण टाळतात त्याचे कारण म्हणजे एक तर त्यांना गर्दी गोंधळ नको असतो किंवा मग ते गर्दीत जाण्यास अनकम्फर्टेबल असतात. मित्रांनो आपल्याला कल्पना नसते पण अनकम्फर्टेबल वाटणे हा देखील low self confidence चा भाग असू शकतो. अशा सिच्युएशनमध्ये हळूहळू छोटे समूह, छोटे समारंभ attend करायला सुरुवात करावी.

लोकांमध्ये मिक्स व्हायला सुरुवात करावी जेणेकरून तुम्ही कंफर्टेबल feel करू शकाल आणि ही social anxiety,low self confidence यावर मात करू शकाल.तेच-तेच आयुष्य जगण्यात काय अर्थ??? नवीन नवीन गोष्टी शिकण्यात,आकलन करण्यात आयुष्याची खरी गंमत आहे. म्हणून आत्मविश्वास डगमगत आहे असे वाटायला लागले की 3 Idiots वाली trick युज करा.

‘दिल पे हाथ रखो और कहो-all is well, all is well…!! आणि खरच एक दिवस येईलच की तुम्ही म्हणाल- Everything Is Finally Well..!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!