अपयश येण्याची १५ मानसशास्त्रीय कारणे पाहूया.
सोनाली जे.
यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण प्रयत्न केले मेहनत घेतली तर यशप्राप्ती नक्कीच होते. याच बरोबर आपले ज्ञान, आपले शिक्षण आणि स्किल डेव्हलप केले की आपल्याला यशाची शिखरे चढण्याची संधीच संधी.
आता ही संधी घेत असतानाही काही वेळेस एखाद्याला अपयश येते तर एखाद्याला यश येते . का होते असे?? २५ ते ४० या वयात एखाद्याकडे नॉलेज आहे शिक्षण असते., खूप स्वप्न, इच्छा , जिद्द असते तरी ती पूर्ण न होण्याची आणि त्यात अपयश येण्याची मानसशास्त्रीय कारण याविषयी थोडासा विचार करूयात.
१. ओव्हर कॉन्फिडन्स –
अतिआत्मविश्वास. आपल्याकडे नॉलेज आहे. शिक्षण आहे. या भरवशावर आपण निर्धास्त असतो पण जेव्हा आपण काम करायला घेतो तेव्हा एक्सपिरीयन्स नसतो. तर काही वेळेस एक्सपिरीयन्स असूनही ओव्हर कॉन्फिडन्स मुळे चुका होतात. आणि अपयश येण्याची शक्यता असते .जसे आपण एखादा scenario क्रिएट करतो की हे नेहमीचेच काम आहे त्यात काय आत्ता चुटकीसरशी करता येईल . आपण काम पण जेव्हा सुरू करतो तेव्हा मटेरियल available नसते ते जमा करण्यात वेळ जातो . मिस मॅनेजमेंट होते. म्हणजेच काय तर आपला अति आत्मविश्वास किंवा ओव्हर कॉन्फिडन्स आपण हे करू ते करू वेळेत करू या. हे मनातले विचार अती आत्मविश्वास परिस्थितीनुसार नसतात. मटेरियल उपलब्ध नसते त्यामुळे कितीही विचार केला असला तरी प्रत्यक्षात त्यामुळे आपण वेळेत काम पूर्ण करू शकत नाही किंवा काम करूच शकत नाही आणि थोडक्यात काय तर ध्येयपूर्ती पास होऊन यशापासून थोडे बाजूला पडतो.
२. Negative thinking and lack of confidence –
रोजचे काम करतानाही मी हे करू शकेन का नाही, मला हे जमेल का नाही या निगेटिव्ह थिंकींग किंवा स्वतःवरचा विश्वास डळमळीत असल्याने मनात एक भीती निर्माण होते. बरेचदा ती गोष्ट पहिल्यांदाच करीत असल्यामुळे सुद्धा मनात एक भीती निर्माण होते आणि आपले चुकले तर बॉस रागवेल व्यवसायात नुकसान झाले तर या विचाराने अपयश येते .कारण कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही मनापासून होते. जर मनात शंका नकारात्मक विचार आत्मविश्वास डळमळला तर अपयश येण्याची शक्यता जास्त असते.
३. धाडसी वृत्ती नसेल तर…
कोणत्याही क्षेत्रात जर धाडसी वृत्ती नसेल तर सामान्य माणसांप्रमाणे जगू लागतात. याउलट जेव्हा असामान्य माणसे सुद्धा सामान्यच होती. केवळ धाडसी वृत्ती मुळे प्रयोगशील वृत्ती मुळे झोकून देऊन काम करण्याच्या किंवा झपाटल्याप्रमाणे काम करण्याच्या वृत्तीमुळे ते सामान्य लोक आयुष्यात यशस्वी झाले. उदाहरण द्यायचे झाले तर शिवाजी महाराजां सारखी मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेले हे व्यक्तिमत्व स्वराज्याच्या ध्येयाने झपाटून उठले आणि स्वराज्य निर्मिती केली. त्यांच्या धाडसी वृत्तीमुळे त्यांनी रचलेल्या व्यूह रचनांचा सैन्यामध्ये आजही अभ्यास केला जातो. थोडक्यात काय तर धाडसी वृत्ती नसते तेव्हा मनुष्य अशा पासून दूर राहतो.
४. पास्ट एक्सपिरीयन्स…
पूर्वी एखादे काम करीत असताना अपयश आलेले असते. त्यामुळे परत तेच काम करताना मनात तोच अपयशाचा विचार येतो किंवा याउलट होते कि मागच्या वेळेला काम करताना हे काम मी दोन तासात चांगले केले होते चांगले जमले होते पण नेमकं काम करताना येत जाणाऱ्या अडचणी होणारे बदल जसे theory पक्की असते. पण प्रॅक्टिकल च्या वेळी गोंधळ उडतात तसे काहीसे त्यामुळे मानसिक संतुलन बिघडते आणि भीती निर्माण होते. कॉन्फिडन्स चा अभाव निर्माण होतो आणि चुका होत जातात .मन स्थिर नसल्याने इतर योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे हे ही सुचत नाही .दडपण येते आणि मग अपयशाची सुरुवात होऊ लागते. अपयश हा नुसता रिझल्ट नसतो त्याची सुरुवात झालेली असते मनापासून.
५. मिळालेली संधी वापरून न घेणे…
बरेच वेळेला आपल्या हेच लक्षात येत नाही की ही आपल्याला मिळालेली संधी आहे एखादा छोटासा बदल ही संधी आहे हे वेळीच ओळखता आले नाही तर प्रगती होत नाही आणि यश मिळत नाही आणि यश न मिळणे म्हणजे अपयशच आहे.
६. अटीट्युड..Attitude..
जेव्हा दोन समान क्वलिफिकेशन्स, एक्सपिरीयन्स असलेल्या व्यक्ती जेव्हा पुढच्या प्रमोशन करता इंटरव्यू देतात. तेव्हा दोघांच्या मधील tough कॉम्पिटिशन मध्ये अटीट्युड हा महत्त्वाचा भाग असतो. किंवा पूर्वी क्रिटिकल कंडिशन मध्ये काम करताना प्रॉब्लेम solving कपॅसिटी आणि प्रॉब्लेम solving capacity अटीट्युड महत्त्वाचं असतं. उदाहरण द्यायचं झालं तर शरमन जोशी यांची थ्री इडियट मधला इंटरव्यू देतानाचा महत्त्वाचा भाग जसे की त्यांच्याकडच्या निगेटिव्ह गोष्टीही पॉझिटिव्हली प्रेझेंट करतो तसेच पॉझिटिव गोष्टीही काही वेळेस निगेटिव्ह ली प्रेझेंट केल्या जातात त्यामुळे हाताच्या अंतरावरील यशही दूर जाते.
७.ओव्हर्थिंकिंग ..over thinking
आपण काम करताना अति विचार करतो की त्यात बरेच दा आपण महत्त्वाच्या गोष्टी किंवा मुद्द्यांकडे दुर्लक्ष करतो. किंवा त्या महत्त्वाच्या आहेत हेच लक्षात येत नाही आणि इतर अनेक गोष्टींचा गांभीर्याने विचार करतो.
८. Under thinking ..
काही महत्वाच्या मुद्द्यांकडे गोष्टींकडे लक्ष देताना बारीक-सारीक गोष्टी कोणत्याही गरजेच्या त्या स्किप होतात .उदाहरण द्यायचे झाले तर कोलंबीया अंतरिक्ष यान अंतराळात पाठवले होते. तेव्हा बाकी सर्व गोष्टी खूप काळजीपूर्वक तपासल्या गेल्या होत्या.पण जेव्हा ते परतीच्या प्रवासाला लागले तेव्हा उड्डाण केल्यावर इंसुलेशन मधल्या छोट्या चुकीमुळे पण त्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्येमुळे कोलंबिया यानाचा अंतराळातच त्याचा स्फोट झाला . यात आपल्या भारताची यशस्वी अंतराळवीर महिला ही होती. पण छोट्याशा चुकीमुळे या यशस्वी अंतराळवीर महिलेची कल्पना चावला हिची ही मोहीम अपयशी ठरली.
९. कुवत किंवा एफिशियन्सी…
आपल्याकडे मर्यादित सोर्सेस किंवा अवेलेबिलिटी, क्षमता नसताना कुवतीच्या पलिकडची अति मोठी ध्येय ही अपयशाला कारणीभूत ठरते.
१०. Short term gain बघण्याची वृत्ती…मानसिकता…
जसे की तात्पुरता फायदा कसा मिळेल याचा विचार करणे अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर कलिंगड ला इंजेक्शन देणे आणि ते लाल दिसणे यातून तात्पुरती विक्री होते .परंतु यामुळे तो त्याच्या प्रोडक्टची विश्वासार्हता गमावतो .आणि कुवत असूनही केवळ वृत्तीमुळे घातक विचारांमुळे भविष्यातील अपेक्षित प्रगती होत नाही.
११. बदलांना स्वीकार करण्याची तयारी नसते …acceptance नसतो…
जसे करून येण्यापूर्वी ऑनलाइन एज्युकेशन किंवा वर्क तेवढे स्टॅंडर्ड मानले जात नव्हते किंवा केले जात नव्हते.. पण कोरोना नंतर बऱ्याच लोकांनी ते एक्सेप्ट केले आणि जे लोक ते एक्सेप्ट करू शकले नाही त्यांची प्रगती खुंटली म्हणजेच काय तर यशापासून दूर हे एका अर्थी अपयशच.
१२. Low self esteem..
स्वतःबद्दलची खात्री मनातूनच नसल्याने संधी स्वीकारण्याची मानसिकता नसते.
१३. Low level of motivations and interest…
एखादी गोष्ट करण्याची प्रेरणा नसते किंवा आवड नसते. इंटरेस्ट नसतो. आपल्याच कोषात राहण्याची वृत्ती केव्हा safe zone मध्ये राहणे .त्यामुळे नवीन गोष्टीकरता प्रेरणा मिळत नाही आणि कोणतेही काम करायचे झाले, तर प्रेरणा ही महत्त्वाची भूमिका निभावते.
१४. प्रेझेंटेशन स्किल्स..
माझ्याकडे नॉलेज आहे , स्किल आहे, एज्युकेशन आहे पण मी हे मांडूच शकत नाही मला बोलताच येत नाही. मुद्दे पटवून सांगता येत नाही. ही तुमची मानसिकता ही तुमची वैचारिकता तुम्हाला अपयशांकडे घेऊन जाते.
१५. Quit…
एकाच वेळी अनेक कामे , अनेक विचार ,( mismanagement of time ).. जसे एका वेळी समोर विविध विषयांची पुस्तके घेऊन बसलो किंवा अनेक पुस्तके एकाच विषयाची घेऊन बसलो तर मन विचलित होते आणि कोणत्याच विषयाचा अभ्यास नीट होत नाही आणि ताण तणाव वाढतो त्यातून काहीच न करण्याची वृत्ती किंवा त्या अभ्यासाची भीती निर्माण होऊन आपण quit करतो.
प्रत्येक प्रश्न करिता ठरावीक वेळ द्यावा लागतो तर पूर्ण पेपर कव्हर करता येतो तसे प्रत्येक गोष्टी करता, कामा करता, ठरावीक वेळ देणे गरजेचे असते नाहीतर आपण एकाच कामात अडकून पुढच्या कामांकडे बघूच शकत नाही.
हीच आणि अशीच अनेक मानसिक कारणे आहेत जी आपल्याला अपयशी ठरवितात.. अपयश पचवून यशाकडे जाण्याकरिता मनाची मशागत करणे गरजेचे असते आणि त्यासाठी नवीन नवीन चॅनेल्सवरून मोटिवेशनल व्हिडिओज, speeches उपलब्ध आहेत.कौन्सेलर उपलब्ध आहेत.. आजकाल बरेच webinars , seminars ऑरेंज केले जातात.. याशिवाय योगा प्राणायाम यांचे ऑनलाइन व्हिडिओज आहेत आणि प्रशिक्षणही दिले जाते. ज्यातून मनाची एकाग्रता वाढवता येते मोटिवेशन मिळते. त्या माध्यमातून आपण अपयशातून यशाकडे वाटचाल करू शकतो.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


Good information